˙˙जय मुक्ताई ..

Friday, 7 October 2016

थोड़ा तरी परोपकार

 थोड़ा तरी परोपकार
    एक वयोवृद्ध शेतकरी आपल्या उतार वयात आपला शेतात एक फळझाड़ लावत होता
समोरून त्या नगरीचा राजा चालला होता 
या शेतकरी बाबाला बघून राजा थांबला व शेतकर्याला हासतच म्हणाला
शेतकरी बाबा
या वयात हे फळझाड़ लावताय?
या झाड़ाला फळ कधि येणार?
आपले वय तर?
या झाड़ाला फळ लागेपर्यंत आपन जगणार का?
शेतकरी राजाला म्हणाला
राजा
मि आजवर आपल्या पुर्वजांनी लावलेल्या झाड़ांची फळे खात आलोय
मग माझे कर्तव्य नाही का एखादा झाड़ लावून मरावे?
आणि
थोड़ा तरी परोपकार करावा
हे शेतकरी बाबाचे शब्द ऐकून
राजा खुश झाला
व 


शेतकर्याला शभंर सोन्याच्या मोहरा दिल्या
तेव्हा शेतकरी म्हणाला
हे बघ राजा
तु म्हणाला होता ना
या वृक्षाला कधि फळ येणार?
हे बघ तु दिलेल्या मोहरा म्हणजे माझ्या या परोपकाराच्या झाड़ाला आलेले फळ आहे
राजा आता या बोलण्यावर अतिशय खुष झाला
व पुन्हा दोनशे मोहरा दिल्या
तेव्हा शेतकरी म्हणाला
हे बघ राजा
लोकांच्या फळझाड़ाला वर्षातुन ऐकदाच फळे येतात
मि लावलेल्या परोपकाराच्या फळझाड़ाच्या रोपट्यालाच लावताक्षणिच दोनदा फळ लागली
संत महात्म्ये म्हणतात
तुका म्हणे फार ! थोडा तरी परोपकार!!
सोच बदलो देश बदलेगा
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:

Post a Comment