शहाणपणें वेद मुका।
गोपिका त्या ताकटी।
ताकटी- म्हणजे ताक पिणाऱ्या मुली.
गोकुळातील ताक पिणाऱ्या मुली भगवान् परममात्म्याचं खुशाल वर्णन करत होत्या.आपली कामें विसरत होत्या,दूध घ्या दही घ्या म्हणावयाचे तर, *गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे* जिथे अक्कलवंताची अक्कल गुंग होते तिथे गोपी मात्र कृष्ण परमात्म्याचें वर्णन करताना घाबरत नव्हत्या.
म्हणूनच आपल्या सारख्यांना त्याचं वर्णन करायला कुठल्या शहाणपणाची गरज नाही लागत.टाळ नीट वाजवता येवो न येवो,राग आळवता नाही आला तरी चालतय आपल कसही झालं तरी भाव+भक्ती असली की बसं, तुकोबाराय याच अभंगात शेवटी सांगतात,गोपीकांना हे सर्व जमल कसं,
तुका म्हणे भावाविण।
अवघा शीण केला होय।
भाव-भक्तीशिवाय कितीही प्रयत्न केला तरी व्यर्थ आहे.
गोपीनी आपल्या भाव-भक्तीच्या बळाने भगवंतांला आपलसं केल होत.जिथे, *कैसे येथें कैसे तेथे।शहाणे ते जाणती* पण गोपीकांनी ते साध्य केल.गोकुळातलीच ते सावळे, सुंदर,मनोहर, रूप पंढरीत कर कटेवर ठेऊन वाट पाहत आहे.
चला तर मग....
आला कार्तिकीचा हाट
चला वारीला.....
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment