˙˙जय मुक्ताई ..

Friday, 28 October 2016

दान करण्याची सवय

दान करण्याची सवय
      समर्थ रामदास स्वामी श्रीराम नामाचे थोर उपासक
स्वामींचा रोज पाच घर भिक्षा मागण्याचा नित्याचा क्रम
ते एकदा एका गावात भिक्षा मागण्यासाठी गेले असता चार घर भिक्षा मागितली व एक घर भिक्षेचे बाकी होते
स्वामी पाचव्या घरासमोर जाऊन *भिक्षामं देही* असा अल्लख दिला
त्या घरच्या गृहिणीने आजवर कधिही स्वामींना भिक्षा वाढलेली न्हवती
तरीही स्वामी नित्य त्या गृहिणीच्या घरासमोर भिक्षेसाठी जात
त्या गृहिणीने आजवर अनेकदा स्वामींना कड़वे बोल सुनावले होते
तरीही स्वामी त्या घरी भिक्षेसाठी जातच होते
दिवाळीचा सण आठ दिवसावर येऊन ठेपला होता
सर्वत्र दिवाळी निमित्ताने घराची साफसफाई मोहीम सुरु होती

   पुर्वीचा काळ मातिच्या भिंती सणासुदीला मातिचा पोचेरा करून भिंती सावरत असत
त्या घरची गृहिणी भिंतीला पोचेरा करण्यात निमग्न होती
आजवर कधिही भिक्षा न वाढलेली गृहिणी आजतर आपल्या कामात अतिशय व्यस्त होती
स्वामींनी भिक्षेसाठी आवाज दिल्यावर ती पुरती वैतागून गेली
सर्व अंग चिखल मातीने भरलेली गृहिणी त्यात अगोदरच वैतागलेली
त्याच अवस्थेत जगदंबेचा रूद्र अवतारात बाहेर आली

स्वामींना म्हणाली
तुम्हाला आजवर मी कधिच भिक्षा वाढलेली नाही तरी तुम्ही रोज माझ्या दारी का येतात????
असे म्हणत त्या दिवशी कधिही दानधर्म न करणारे त्या गृहिणीने आपल्या हातातील पोचेरा स्वामींच्या अंगावर फेकून मारला व म्हणाली
घ्या भिक्षा.....
स्वामींनी तो चिखल मातीने भरलेला कापड़ी फड़क्याचा आनंदाने हातात घेतला व रामनामाचा जप करत निघाले
परंतु
तिथे त्या गृहिणीच्या घराजवळ काही जेष्ठ गावकरी मड़ंळी बसलेले होते
त्यांनी हे सर्व घटना आपल्या ड़ोळ्यानी बघितली होती
स्वामींना नमस्कार करत गावकरी म्हणाले
स्वामीजी!
ति गृहिणी भिक्षा वाढत नाही
तरीही आपन न चुकवता तिचे घरी नित्य नेमाने जातात
स्वामी स्मित हास्य करत म्हणाले
*साधूकड़े भेदभाव नसतो*
जो देईल तो देईल आणि नाही दिले तरी साधुने त्या घरी का जाऊ नये?
बहुतांपरी संकटे साधनांची ।
*व्रते दान उद्यापने ती धनाची* ॥
दीनाचा दयाळू मनी आठवावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥
कुठल्याही प्रकारच्या साधना करतांना नाना प्रकारची संकटे उभी रहात असतात. दानधर्म करायचा, व्रतवैकल्ये करायची, त्यांची उद्यापने करायची या सगळ्या गोष्टी साधना म्हणून केल्या जातात. आणि त्या खर्चिक स्वरूपाच्या असाव्यात असे काही नसते काही तरी दिले हे महत्वाचे

त्यापेक्षा लीन, दीनांवर दया करणारा श्रीराम मनापासून आठवावा
आणी विशेष बाब तर आज घड़ली आहे
आजवर कधिही दानधर्म न करणारी त्या माता माऊलीने आज काहीही का होईना माझ्या झोळीत दान घातले आहे
भलेही क्रोधात मला चिखलाने माखलेला पोचेरा फेकून दान दिला
परंतु
त्यामुळे त्या मायमाऊलीला काही का होईना दान देण्याची सवय तर लागली
समस्तांमधे सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधून पाहे ॥
जिवा संशयो वाऊगा तो त्यजावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥
दान हे दानच असते
त्याच मुल्यमापन होत नाही
असे म्हणून स्वामीजी आपल्या आश्रमाकड़े निघून गेले
आपल्या आश्रमात स्वामीजी पोहोचल्यावर त्यांनी त्या गृहिणीने फेकून अंगावर मारलेल्या कापड़ाचा पोचेरा स्वच्छ साफ करून घेतला

त्या कापड़ाच्या सुदंर असे काकड़े बनविले व आपल्या श्रीराम प्रभूला पहाटे काकड़ा आरती ओवाळली
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment