˙˙जय मुक्ताई ..

Friday, 7 October 2016

ऐंसी चराचरी किर्ती ज्यांची

ऐंसी चराचरी किर्ती ज्यांची

फजिती कोणती?
-सावकार दाराशी येणे
प्रतिष्ठित कोण?
-जो कोणाचा ओशाळा नाही तो
कष्टी कोण?
-चिंताग्रस्त
अंध कोण?
-ज्याला आपली पुढे काय गती होणार ते दिसत नाही तो
वाईट कोण?
-परद्वारा करणारा 

बद्ध कोण?
-विषमता पाहणारा
निगुरा कोण?
-सर्वांशी वैर करणारा
दृष्ट कोण?
-षड़विकारांना स्थान देणारा
सत्संग कोणता?
-विवेक व अनुभूतीने वागणे
वेदांती कोण?
-अद्वैती भान नसलेला
पवित्र कोण?
-एकपत्निव्रती
ड़ोळस कोण?
-सर्वाभुती ब्रम्हं पाहणारा
गुरूमार्गी कोण?
-निर्वैर मतिचा
सर्वमान्य कोण?
-समदृष्टीचा
मुक्त कोण?
-जग एकाच दृष्टीक्षेपात पाहतो तो
जगात धन्य कोण?
-सत्किर्ती ज्याची आहे तो
धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान|
धन्य हा निधान ज्ञानदेव||
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:

Post a Comment