˙˙जय मुक्ताई ..

Friday, 7 October 2016

काय चाड़ वरल्या खोड़ी

|| श्री विठ्ठल ||
एका खेड़ेगावातील मंदिरात एक महात्मा वास्तव्य करत होते
म्हणायला त्यांचे वास्तव्य मंदिरात होते परंतु ते जेंव्हा केव्हा बघितले तर मंदिराच्या ओट्यावरच बसलेले दिसायचे
या महात्माच एक वैशिष्ट्य होते
ते म्हणजे जो कोणी पुढे येईल त्याला ते शिव्या घालायचे
त्यांचा स्वभाव माहित झाल्यावर बरेच लोक तर मंदिराकड़े फिरकायचेच बंद झाले
एक दिवस एक माणुस मोठे धैर्य दाखवत त्या महात्माला म्हणाला
महात्माजी
ऐक शंका विचारायाची होती आपल्याला?
महात्मा बोलले
विचार
महात्माजी आपन जो कोणी आपल्या समोर येईल त्याला शिव्याच घालता?
त्यामुळे बहुतेक सर्वच लोक आपणांवर नाराज आहेत
उलट बघा मि कथा, किर्तन, प्रवचन सांगतो
लोकांबरोबर गोड़ गोड बोलतो
लोक बघा माझा किती सन्मान करून वरतून मानधन देखील देतात
लोक माझ्या या गोड़ बोलण्यावर किती प्रेम करता बघा ना?
बराच वेळ शांत बसलेले महात्मा म्हणाले
तुम्ही तोड़ांने रामराम म्हणता

मी तोंडाने शिव्या घालतो
यात मला काही विशेष असा फरक वाटत नाही
समोरच्या मनुष्याला काही समजले नाही म्हणून महात्माजी पुन्हा म्हणाले
तुम्ही रामनाम तोड़ांने घेता कि अंतकरणातून?
मी शिव्या घालतो ते फक्त तोंडाने
अंतकरणातून नाही
या भवसागरात बुड़त असलेल्या समाजाप्रती अंतकरणातिल प्रेमापोटीच शिव्या घालतो
मुलगा भाकर खात नसेल तर
आई आपल्या मुलाला रागावतेच ना?

प्रसंगी वाईटही बोलत असेल
ज्याप्रमाणे नारळाचा वरचा भाग कठीण असतो परंतु आतिल गाभा गोड़च की
फणसालाही बाहेरून काटे असतातच ना?
आणी आत मात्र गोड़
तुका म्हणे काय सालपटाशी काज!
फणसातिल बिज काढूनी खावे!!
सज्जनहो
परमार्थात अंतकरण शुद्ध असावे
बाहेरून सुदंर देखावा नसावा फक्त
परमात्मा तर
"अंतरिची घेतो गोड़ी"
सर्व किमंत आतल्या गोड़ीला असते
तुका म्हणे मोल गोड़ी!
काय चाड़ वरल्या खोड़ी!!
जय जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment