˙˙जय मुक्ताई ..

Monday, 3 October 2016

महाराष्ट्राची साडे तीन शक्तिपीठे

महाराष्ट्राची साडे तीन शक्तिपीठे

     आपल्या पुराणांप्रमाणे जगतजननी -  आदिमाता ही आदिशक्ती, आदिमाया, या रुपांमध्ये पूजिली जाते.
   जगन्मातेची सर्व रूपे ही महाराष्ट्रामध्ये चार प्रमुख देवतांमध्ये एकवटली आहेत :
१.  तुळजापूरची तुळजा भवानी
२.  कोल्हापूरची महालक्ष्मी
३.  माहूरची रेणुकादेवी
४.  वणीची सप्तशृंगी
 
 ही देवींची रूपे म्हणजे ओंकारांच्या मात्रा आहेत असेही समजले जाते
जसे ,
तुळजा भवानी -  अ कार
महालक्ष्मी - आ कार
रेणुका देवी - म कार
सप्तशृंगी - म् कार (अर्ध मात्रा )
यामुळेच तुळजापूर, कोल्हापूर व माहूर ही पूर्ण पीठे तर वाणी हे अर्ध पीठ समजले जाते. तसेच वणीच्या देवीमध्ये या तिन्ही देवीचे सामर्थ्य एकवटले आहे असेही सांगितले जाते.
    या देवतांची पूजा, नवाक्षर मंत्राचे पठण आणि शक्तीयंत्र यांची आराधना हा चंडी उपासनेचा भागही समजला जातो. नवरात्रीमध्ये नवाक्षर मंत्राचेही आवर्तन केले जाते.
    या मंत्रामध्ये योगामध्ये सांगितलेली कुंडलिनी जागृत करण्याचे सामर्थ्य आहे असे मानले जाते
या सर्व देवता ब्रम्हप्रकृतीची विविध रूपे असल्याचेही मानले जाते.त्यामुळे ब्रम्हमाया, ब्रम्हशक्ती, ब्रम्हज्ञान आणि ब्रह्मस्थिती या चार देवतांच्या अंगी सामावल्या आहेत असे म्हटले जाते.
    त्याचप्रमाणे शक्तीपुराणानुसार नंदा , माया शाकंभरी, शक्ती भीमा आणि शक्तीज्ञान या अनुक्रमे तुळजाभवानी, महालक्ष्मी, रेणुकादेवी आणि सप्तशृंगी यांच्या रुपात सामावल्या आहेत असेही सांगितले जाते
सौजन्य:
ही पोष्ट व्हॉट्सप संग्रहीत आहे

।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/ 
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:

Post a Comment