˙˙जय मुक्ताई ..

Monday, 3 October 2016

तुका म्हणे मना पाहिजे अंकुश

तुका म्हणे मना पाहिजे अंकुश |
नित्य नवा दिस जागृतीचा|
 
   मनुष्याने स्वतःच स्वतःच्या मनावर अंकुश ठेवावयाचा असतो.दुसरा कोणी (भगवान् परमात्मा सोडून) त्यावर ताबा ठेवू शकणार नाही.हा प्रयत्न ज्याचा त्यालाच करावयास हवा. त्याकामी आम्हांला रोजच कर्तव्यनिष्ठा राखावी लागेल, संसारासंबंधाने वाटणारा हा देहमोह सोडावा लागेल. यासाठी आत्मकल्याणाची दृष्टी जवळ असायला हवी. मग सारे आपोआप जुळून येते. फक्त यासाठी आमची रोजची जागृति टिकली पाहिजे मनावर अंकुश राहिला पाहिजे. देहाचा स्वभाव जड आहे हे जरी सत्य असले तरी या देहाच्या साधनानेच येणारा नित्य नवा दिवस हा जागृतीचा करायचा आहे , म्हणून आमची दररोजची पहाट ही नव्या विचारांची असावी तर मनावर अंकुश असावाच पण हा ज्याचा त्यानेच ठेवायचा बरका...
मग ठेवताय ना अंकुश!
जय मुक्ताई
ज्ञानोबा तुकाराम
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:

Post a Comment