˙˙जय मुक्ताई ..

Friday, 14 October 2016

तेथे नांदे देव संदेह नाही

तेथे नांदे देव संदेह नाही
एकदा नारदजी भगवान श्रीहरि विष्णूंच्या दर्शनासाठी गेले
भगवंताने नारदजीचे स्वागत करून पुजन केले
लोक काय प्रश्न विचारतील याचा नेम नसतो परंतु नवल म्हणजे नारदजी भगवान परमात्माला प्रश्न विचारतात
प्रभू!
आपले या सृष्टीत खुप सारे भक्त आहेत
मग आपल्याकड़े भक्तांची यादी असेलच ना?
प्रभू हो म्हणाले
नारदजीनी भक्तांची यादी पहाण्याची इच्छा व्यक्त केली
प्रभूने नारदजीला यादी दिली
त्या भक्त यादित नारदजीचे नाव पहिल्या क्रमांकावर होते
नारदजीना आनंद गगनात मावेना
त्या आनंदातच त्यांनी यादिवर एक नजर टाकली व तिथुन तातडीने निघाले
नारदजीच ते
शांत बसले मग नवलच की...

लगेच हनुमंताच्या समोर हजर झाले
सर्व वृत्तांत सागितंला
बघा हनुमानजी
आपन देवाचे इतके जवळचे भक्त तरी भगवंताच्या भक्त यादित आपले नाव नाही?
तेंव्हा हनुमानजी हसत हसत नारदजीला म्हणतात
मी यादित नाव यावे म्हणून माझ्या प्रभूची सेवा कधिही करत नाही
आणी
नसेलही यादित नाव तर मी केलेली सेवा प्रभूला कदाचित आवडतही नसेल...
पण ऐक आहे
मला प्रभूची सेवा करायला आवडते
इतक्यावर समाधान मानले तर मग त्यानां नारद कोण म्हणेल?
हे बघा हनुमानजी
मला वाटते निदान यादीत शेवटी तरी आपले नाव हवे होते
असे मला वाटते....
तेंव्हा हनुमानजी नारदाला म्हणाले
तुम्हाला प्रभूनी जी यादी दाखवली ति दोन नबंर ची आहे
मुख्य भक्तांची यादी प्रभूकड़े सुरक्षित आहे
हे ऐकल्यावर नारदजी तिथून निघून थेट वैकुंठाला पोहोचले
भगवान परमात्माला पहिल्या क्रमांकाची यादी सबंधाने विचारू लागले
तेंव्हा भगवान म्हणाले
हो नारदाने
हनुमानजीचे वचन सत्य आहे
पहिली यादी आहे माझ्याकड़े..
नारदजी ति बघतात तर त्या यादीत पहिल्याच क्रमांकावर हनुमानजीचे नाव वाचून यादी पुन्हा प्रभूकड़े सोपविली
नारदांचा चेहरा आता मात्र पहाण्यासारखा झाला होता
तरीही प्रभूला विचारतात
प्रभू!
आपन समदृष्ठी आहात तरी मग हा पंक्तिप्रपंच कशासाठी?
तेंव्हा प्रभू म्हणतात
पहिली यादी म्हणजे ज्या भक्तांना मी आवड़तो

दुसरी यादी म्हणजे मला जे भक्त आवड़तात

तुका म्हणे जेथे वसे भक्तराव!तेथे नांदे देव संदेह नाही
आजवर खुप शोधल पण या कोणत्याच यादीत अजून माझ नाव मिळाले नाही
प्रयत्न मात्र जोरदार सुरू आहेत
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment