˙˙जय मुक्ताई ..

Wednesday, 5 October 2016

आनंदोत्सव

आनंदोत्सव
    भरत व राजा जनक यांच्यात एक मोठे युद्ध झाले भारताने जनकाची सर्व सपंत्ती युद्धात हरण केली यानंतर आपल्या दरबारी मोठा आनंदोत्सव साजरा करत असताना तिथे अकस्मात देवर्षि नारदजी आले राजा भरत देवर्षिंचा सत्कार करून युद्धात जिकंलेल्या राजा जनकाच्या सपंत्तीचे वर्णन करू लागला असता नारदजी म्हणाले मी आताच येताना राजा जनकाच्या नगरीतुन आलो  जनुकांचा विजय झाला म्हणून तिथेही मोठा आनंदोत्सव सुरु आहे आपणास काही संशय असेल तर स्वतः जाऊन खातरजमा करावी देवर्षि नारदजीचे हे वचन ऐकून राजा भरताला मोठे नवल वाटले राजा भरत व देवर्षि नारदजी राजा जनकाच्या नगरीत आले
पहातात तर काय तिथे सर्व नगरीत प्रत्येक घरांवर गुढ्या उभारण्यात आल्या होत्या सर्व जनकपुरी आनंदाने विजयोत्सव साजरा करण्यात निमग्न होती गर्दीतुन मार्ग शोधत शोधत देवर्षि नारदजी व राजा भरत जनकाला भेटतात व विचारतात आपला युद्धात पराजय झाला तरी आपन आपन आनंदोत्सव साजरा करताय? तेव्हा जनकाचे उद्गार आहेत ईश्वर सर्व प्राणीमात्रांना अत्यंस्थ सुत्राने नाचवित असतो या भवसागरात कर्मनौकेत फिरताना अविद्येनेच सुखः दुःख भोग घड़त असतात आपन स्वर्ग व नरक या कल्पनेच्या पलिकडे गेलो तरच मोक्षप्राप्ती आहे कर्मगतिने देविदेवतांची देखिल फजिती चुकली नाही कर्मगति दारून आहे ब्रम्हंज्ञानाने कर्ममुक्ति होते हि सर्व सृष्टीच जर विलयशिल आहे मग तु युद्धात हरण करून माझे काय जिकुंन नेलेस?
हे राजवैभव, सत्ता,पत्नी,मुल,देह व सर्व प्रपंच गेला तरी यात माझ काय गेले?????? तेव्हा


हे भरता !
राज्यपद,आशा,भय व चिंता सोडून अच्युतपदी निर्भय होऊन रहा
हाच खरा मानवी जिवनाचा आनंदोत्सव आहे
देहिच विदेही भोगू दशा
या आत्मबोधावर आरूढ असलेल्या
विदेही राजा जनकाच्या या उपदेशानंतर भरतही विरक्त होत सुखःदुःख समान मानून राज्यावरिल ममत्व सोडून ब्रम्हंचितंणात मग्न झाला
काहीतरी बोध करी मना?
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:

Post a Comment