˙˙जय मुक्ताई ..

Friday, 14 October 2016

व्यास वशिष्ठ शुक गोधंळी

सत्यवती व पाराशर पुत्र कृष्णद्वैपांयण
नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे,फुल्लार विन्दायत पत्रनेत्र।
येन त्वया भारत तैल पूर्ण: प्रज्वालितो ज्ञान मय: प्रदीप:।।
भगवान परमात्माच्या श्वासोश्वासातुन तयार झालेला वेद यावेदाचे चार भाग केले म्हणून महर्षि वेदव्यास
भगवद् प्राप्तीसाठी नानाविध ग्रंथाची निर्मिती व्यासांनी केली
अठरा पुराणे निर्माण केली
व्यासेही अमुप ग्रंथ केले
महाभारतासारखा अद्वितीय ग्रंथ निर्माण केला
महर्षी वाल्मिकीनतंर शतकोटी काव्य वाड़मय व्यासांच्याच नावावर आहे
हा ग्रंथ म्हणजेम्हणऊनि महाभारतीं जे नाही।
ते नोहेचि लोकी तिहीं।
येणे कारणें म्हणिपे पाहीं।
व्यासोच्छिष्ट जगत्रय।।
    भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला रणांगणात दोन घटका गीता सागितंली त्याचे सातशे सुदंर श्लोक व्यासांनी लिहिले
आणि कृष्णार्जुनीं मोकळी।गोठी चावळिली जे निराळी।ते श्रीव्यासें केली करतळीं । घेवों ये ऐसी ॥
असे महर्षी वेदव्यास
मित्रावरूणा ऋषी आपल्या कार्याची सुत्रबद्धता टिकावी म्हणून त्यांना जे संतानप्राप्ती झाली वस् धातु जे श्रेष्ठतत्वाचा सुचक असे वशिष्ठ
वर्णाने गोरे मंत्रविद्या यज्ञविद्या यात पारंगत व पुर्ण ज्ञानी व महान तपस्वी
वसिष्ठांचा विवाह तेजस्वी व संस्कारी जिचे बालपण सावित्रीकड़े गेले अशी कश्यपकंन्या अरूधंती बरोबर झाला
ऋषी वशिष्ठांचा संसारही सुरू झाला त्याचबरोबर स्वतःच्या तपोवनात विद्यार्थाना वेदाची संथा देण्याचे कार्य हि अविरत सुरू होते
तितक्यात इक्ष्काकू कुळाच्या राजाचा निरोप सेवकाकरवी आला
महर्षी वशिष्ठ विद्यार्थ्यांना शिकवायचे मधेच सोडून राजदरबारी घाईघाईने निघाले असता अरूधंती मातेने बघितले व महर्षीना त्या म्हणाल्या
विद्यार्थ्याना शिकवने सोडून आपन राजदरबारी जात आहात
राजमाची आज्ञा आली म्हणून काय झाले?
आपल्याला धन दौलत नकोय
मग हे मधेच शिकवने सोडून?
आणी माझ्या सुखासाठी आपन राजदरबारी जात असाल तर मला ते वैभवही नकोच
माझ्यासाठी आपल्या आश्रमातील झाड़े फळे फुले मला सोन्याच्या टुकड़्यापेक्षा अतिप्रिय आहे
तेंव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले
अरूधंती!
जसा तुला नाशिवंताचा मोह नाही
तसा मलाही नाहीच
परंतु
या सृष्टीची उत्पती,साभांळ व शेवट करणारा विश्वाचा चालक भगवान परमात्मा सगुण साकार रूपात इक्ष्काकू कुळात अवतरीत होतोय
ज्या वेळी देव मातेच्या उदरात असेल तेव्हा मातेला आशीर्वाद देईल
भगवंत प्रगट होतिल तेव्हा त्यांच्यावर संस्कार करून यज्ञोपवित मी देईल
परमात्मा विवाह करून येतील व माझ्या पाया पड़तिल तेव्हा मि आयुश्यमान भवः असा आशिर्वाद देईल
हे भाग्य मला लाभणार आहे
म्हणून मी इक्ष्काकू कुळाकड़े धाव घेतोय
चंद्र व सुर्य यांना हलवणारी शक्ती जेव्हा सगुण साकार होऊन येईल व वशिष्ठ त्या शक्तीला आशिर्वाद देईल
यापेक्षा दुसरे मोठे भाग्य कुठले असेल.....
अशे रघूकूलाचे कुलगुरू महर्षी वशिष्ठ.....
महर्षी व्यासांनी भरपूर वाड़मय निर्माण केले तरीही त्यांचे समाधान झाले नाही
देवर्षि नारदजीची भेट झाली तेंव्हा व्यासांना त्यांनी श्रीकृष्ण लीला वर्णन करून लिहिण्यास सांगितले
आणि कृष्णार्जुनीं मोकळी।
गोठी चावळिली जे निराळी।
ते श्रीव्यासें केली करतळीं ।
घेवों ये ऐसी ॥
या भगवंताच्या लिलानुवाद म्हणजे श्रीमदभागवत महापुराण
सनकादिकांनी ब्रम्हंदेवाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आले नाही तेव्हा भगवान परमात्माने हंस रूपात ब्रम्हंदेवास केलेला उपदेश म्हणजेच
हसंरूपी ब्रम्हा उपदेशी श्रीहरि!चतुश्लोकी चारी भागवत
हेच भागवताचे ज्ञान ब्रम्हंदेवाने नारदजीला दिले
पुढे नारदजीने हेच व्यासांना दिले
व्यासांनी अठरा हजार श्लोकात हेच ज्ञान भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या लिलावर्णन केलेले ज्ञान व्यासपुत्र शुकदेवजी जे जन्मताच संसार त्यजुन जंगलात पळून गेले होते व तपश्चर्या करत बसले होते
तिथे आपले दोन शिष्य पाठवले व
बर्हापीडं नटवरवपुः कर्णयोः कर्णिकारं !
बिभ्रद् वासःकनककपिशं वैजयन्तीं च मालाम !
रन्ध्रान् वेणोरधरसुधया पूरयन् गोप्वृन्दै!
वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद गीतकीर्तिः !!
हा श्लोक ऐकल्यावर शुकदेवांची समाधी उतरली
शिष्यांना विचारले तेव्हा त्यांनी हे श्लोक आमचे गुरूदेव व्यासजीचे आहेत असे सांगितले
शुकदेवजी व्यासांना शरण गेले
भागवत ऐकले, तृप्त झाले
आईच्या उदरातच विषयाला जिकुंन आलेले शुकदेवजी श्रीकृष्ण परमात्माच्या विषयांचे वर्णन करू लागले
हेच भागवत पुढे शुकदेवांनी सात दिवस राजा परिक्षितीला सागितंले
व त्याचा उद्धार केला
असे शुकदेवजी...
या उभय सृष्टीत अनेक पतिव्रता झाल्या
ज्या त्या आप आपल्या स्थानावर अढळ आहेत
तरीही त्यात विशेषतः ज्या ज्या पतिव्रतेचे भगवान परमात्माच्या मुख्य रामकृष्ण अवतारासी संबंधीत आहेत त्या विशेषच आहेत
अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा मंदोदरी तथा!
पंचकम् स्मरे नित्यं महापातक नाशनम्!!
याच न्यायाने भगवान परमात्माचे
दुर्जनाचा येणे करूनी संहार!
पुर्ण अवतार रामकृष्ण!!
अशा पुर्ण अवतारांशी विशेषतः सबंध आलेले तिन मुख्य भगवद् भक्तांचे संत महात्म्ये वर्णन करतात
व्यास वशिष्ठ शुक्र गोधंळी
जय मुक्ताई
सौजन्य-
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment