˙˙जय मुक्ताई ..

Monday, 17 October 2016

कृपाळू

एका गावात एक वृद्ध दापंत्य राहत होते
त्यांची आर्थिक परिस्थितीही उत्तम होती
दुर्दैवाने त्यांना ऐकही अपत्य न्हवते
त्यांनी सेवानियोजन कार्यालयाला कळविले कि आमचा वृद्धापकाळात साभांळ करण्यासाठी ऐक सज्जन मुलगा पाठवा
संबंधित खात्याने त्यानां कळविले
कि येथे फक्त पदवीधरांची नोदंनी होते
सज्जन वा दुर्जनांची नाही
शेवटी तिथल्या अधिकारी लोकांना त्या वृद्ध दापंत्याची दया आली
व त्यांनी थोड़ासा प्रयत्न करून ऐक मुलांस सर्व समाजावून सागितंले कि या दोघांचा व्यवस्थीत साभांळ कर
नतंर सर्व संपत्ती तुझीच होईल
पण तो सज्जन मुलगा त्या दापंत्याला म्हणाला
आपल्या सर्व अटी मला मान्य आहे

परंतु माझ्याही छोट्याशा चार अटी आहेत
एक- मी अतिशय लाजाळू आहे
ते त्या मुलाला म्हणाले
लाज स्त्रियांना शोभते
पुरूषांनी फक्त वाईट कामाची लाज धरावी
हि अट मान्य झाली
दोन-
मी थोड़ासा पोटाळू आहे
ते म्हणाले
गड़गंज संपत्ती आहे
भरपूर खा
आम्हाला हि अटही मान्य आहे
तिन-
मी थोड़ासा झोपाळू आहे
ते त्या मुलाला म्हणाले
ठिक आहे
चोवीस तासात बारा तास झोपा काढ व बारा तास काम कर
हि अटही मान्य झाली
चार-
मी थोड़ा कामटाळू आहे
त्या वृद्ध दाम्पंत्याने त्या सज्जन मुलाला बाहेरचा रस्ता दाखवला
आता हा सज्जन सर्व मोफत मिळाले तरी इतक्या अटी घालतोय
हा सज्जन कृपाळू होईल?

बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती
अथवा
पाषाणाच्या पोटी बैसला दुर्दर!
त्याचे मुखी चारा कोण घाली!!
असा हा भगवंत
कृपाळू आहे असेही म्हणावे तरी
भक्ता राखे पायापाशी ! दुर्जनाशी संहारी!!
परंतू
समाजाने साध खापरही मिळू दिले
जितका त्रास देता येईल तितका या समाजाने सतांना दिला तरीही आपले श्रीगुरू निवृत्तीनाथांकड़े मागणी मागताना माऊली म्हणतात
जे खळांची व्यकंटी सांड़ो!
तया सत्कर्मी रती वाढो!!
अशी जगाची माऊली म्हणजेच
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment