˙˙जय मुक्ताई ..

Thursday, 20 October 2016

याति कुळ माझें गेलें हारपोनि

याति कुळ माझें गेलें हारपोनि
   माऊली ज्ञानोबारायांची ही गवळण कोणाला ज्ञात नाही असा एकही भक्त भेटणार आहे.या गवळणीत गोपीची अवस्था ईश्वराच्या प्रती असलेली भेटीची उत्कंठा ही भक्तीच्या प्रांगणातील एक वेगळी पातळी दाखवते.
हा संवाद आहे.दोन सखी मधला.
गवळण म्हणते, "मी त्या गोपाळाला वरले आहे."
सखी बोलते,"त्याला वरून काय करशील ?त्याला ना जात ना कुळ."
गवळण सांगते,"मी त्याला मनातून वरलें आहे त्यामुळे त्याक्षणींच माझेही जातकुळ संपलेले आहे.आता तुम्ही मला कितीही शिकवलत तरी तुमच्या शिक्षणाचा मला काय उपयोग ??
"अग! पण हे लोक तुला वाळीत टाकतील,आणि संसारातले सुख विसरलीस ते तु गमावून बसशील."
यावर गवळण सुंदर उत्तर देते,

"पण सुख उपभोगायला सुखाची चाड असेल तर ना ? मला चाड आहे ती फक्त आणि फक्त भक्ति-प्रेमाची.ते तर गोडच गोड,आणि ते मी अंगभर लेइलेली आहे.त्यामुळे तुमच्या कोणत्याही धाकाने आता तो कसा दूर होणार?"
भगवान् परमात्म्याची भक्ती करायची तर गोपींचा भाव डोळ्यांसमोर ठेवायचा,त्यांच्या भाषेत देव आणि दहीं एकच होते.ईश्वराचा असा ध्यास गोपीकांना होता.
आमचा ध्यास काय सांगावा कीर्तनात बसलो तर विठ्ठल-विठ्ठल भजन म्हणणे ही जमत नाही.परमात्म्याला वरणें तर दूरची गोष्ट.
बाप रखुमादेवी-वरू जीवींचा जिव्हाळा।कांही केल्या वेगळा नव्हे गे माये।
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment