˙˙जय मुक्ताई ..

Saturday, 8 October 2016

अनंत हे नाम जया

अनंत हे नाम जया
  भगवान् परमात्म्याचें स्वरूप मनाच्या आणि वाणीच्या पलीकडचे आहे.मनाने त्याचे मनन होऊ शकत नाही.वाणीने त्याला प्रकाशीत करू शकत नाही. 

मनवाचातीत तुझें हे स्वरूप।
म्हणोनिया माप भक्ति केलें।

- म्हणून तुकोबाराय म्हणतात,की परमेश्वराला मोजण्याकरता मी भक्तीचे माप बनविले.बुद्धीच्या मापाने पण तो मोजला जाऊ शकत नाही.परमेश्वर अनंत आहे.त्याला अंत नाही.पण त्या अनंतालाही तुकोबाराय म्हणतात मी भक्तीने मोजतो.भक्तिचिया मापें मोजितों अनंता।
इतरानें तत्त्वतां न मोजवे।
  भक्तीप्रेमाशिवाय त्याला आपण साध्य करू शकत नाही.इतर जे आपण करतोय ती साधनें आहेत.भक्तीप्रेम महत्वाचे.
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:

Post a Comment