˙˙जय मुक्ताई ..

Friday, 14 October 2016

त्याहूनी दगड़ बरे देवा

त्याहूनी दगड़ बरे देवा
     भगवान बुद्धांना ऐक शिष्य प्रश्न विचारतात
दगड़ापेक्षा श्रेष्ठ कोण?
भगवान बुद्ध म्हणतात


दगड़ापेक्षा लोखंड़ श्रेष्ठ
लोखंड दगड़ाला फोड़ते
परंतु
लोखंड़ापेक्षाही अग्नी श्रेष्ठ
कारन
अग्नीत लोखंड वितळते
अग्नीपेक्षाही पाणी श्रेष्ठ
कारन
पाणी अग्नीला विझवते
परंतु
पाण्यापेक्षाही वायु श्रेष्ठ
कारन
पाण्यास वायु फिरवतो
पण
वायुस मात्र माणसाची शक्तीच ताब्यात आणू शकते
म्हणून
सर्व प्राणिमात्रात माणूस श्रेष्ठ ठरतो
जसा पाषाणात परिस श्रेष्ठ

रसात अमृत श्रेष्ठ
तसेच माणसातही संतच श्रेष्ठ
ते वायुवर विजय मिळवत साधनेने संत पदाला प्राप्त होतात
साधक असाल तर लवकर समजेल नाहीतर
त्याहूनी दगड़ बरे देवा
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment