व्यभिचार
●●●●●●●
●●●●●●●
साधकभक्तांच्या आध्यात्मिक प्रगतीला पर्यायाने आजच्या आध्यात्मिक विश्वालाच पोखरुन खाणारी किड म्हणजेच हा व्यभिचार...
किंवा
दैवी जीवनाच्या तेजोमय स्वप्नात
भंग तथा बाधा उत्पन्न करणारी ही एक मनाच्या अधिन असलेली देहीक भावना...
तसा हिचा सरळ संबंध हा देहाशीच असतो, पण याचा नियंत्रक मात्र विद्रोही मनाची अवाजवी मानसिकताच असते...
सरळ शब्दांत सांगायचे झाल्यास अनैतिक भावनांनी नैतिक मुल्यांकीत भावनांना दिलेला अक्षरशः गळफास, या नाव ते व्यभिचार...
म्हणजेच आपल्याकडे प्रारब्धवश उपलब्ध असलेल्या नैतिक व्ययसुखात समाधानी न राहता दुसर्याच्या व्यवसुखात एखाद्या पशुयोनीसम केलेला अशास्त्रीय दुर्व्यवहार म्हणजेच व्यभिचार...
मग भलेही तो संमतीने असो वा असंमतीने, असा प्रत्येक व्यवहार हा व्यभिचाराचेच अनावश्यक थोंब म्हणुन समजले जाते.
मुळात ह्याचे बिज सर्वप्रथम मनातच उत्पन्न होते आणि हळूहळू आपल्या शुध्द,सात्विक तथा सदसतविवेक बुध्दीला पुर्णपणे मुर्च्छीत करुन, आपल्या देहालाच आपल्या अनैतिक व्यवहाराला पुर्णत्व देण्यासाठी साधन बनवते, असा हा वासनांकित व्यवहारी म्हणजेच व्यभिचार...
याच्या कचाट्यात सापडुन काही ऋषींना आपले सर्वस्वच गमवावे लागले याची जाणीव आपणास असुनही आपण सर्वच याच्या कचाट्यात सापडतोच हे ही तितकेच सत्य..! याचाच अर्थ मजसकट जवळजवळ सर्वच या व्यभिचाराचे आजरोजी वाहकरुपी शिकारच ना..!
याअनुशंगाने हा व्यभिचार,
जेथे ही आला तेथे दुःख व पापाच्या राशी सोबतच घेवुनच येत असतो हे नेहमी लक्षात ठेवावे. या व्यभिचाराचे बिजारोपन हे संसारातील लोभतत्व आणि असमाधानीपणामुळे वृध्दींगत होते अर्थात याचे उगमस्थान सांगायचे झाल्यास आपल्याच देहाने प्रसवलेला अवाजवी भावनांचा अनैतिक-संसार होय. परिणामी हा व्यभिचार जेथजेथे असेल तेथतेथे मानसिक दुर्बलता हि असणारच यात संशय नाहीच, भलेही मग जीवाची अवस्था कोणतीही असली तरी व्यभिचार त्याचा सहवासाचा परिणाम दाखवतोच.
एकवेळ संसारी जीवामधे विषयांकित भावनेमुळे याचे अस्तित्व उदयाला येवु शकते, ही बाब चोरुन लपुन पचवल्या जाईल पण आध्यात्म आणि परमार्थामधे मात्र व्यभिचार हा नसावाच कारण व्यभिचारासंगे परमार्थ हे सुत्र फलीतच होत नाही आणि ज्या मनी व्यभिचार उत्पन्न झाला ते मन कधीच परमार्थी लागुच शकत नाही कारण व्यभिचार जेथे उपजला तो सर्व व्यवहार हा पुर्वीच सांगितल्याप्रमाणे अवाजवी भावनांचा अनैतिक संसार होवुन जातो. भलेही मग आमच्यासारखा कुणी एखादा वरकरणी दृढ परमार्थी भासत असला पण मनामधे जर व्यभिचाराचे साम्राज्य नांदत असेल, तर अशा आमच्यासारख्या व्यक्तिंचा परमार्थ हा केवळ देखावाच म्हणुन शिल्लक उरतो. यालाच सरळ भाषेत

एकवेळ संसारिकांचा देहीक व्यभिचार हा पश्चातापाच्या अग्निमधे होरपळुन क्षम्य होवु शकतो पण वैष्णव असुनही मनानेच व्यभीचार करणार्यांना कोठेच क्षमायाचना मिळत तर नाहीच पण आमच्यासारख्या दिखावटी ढोंगी वैष्णवांना जन्मोजन्मी माफी लाभतच नाही.
हाच व्यभिचार भामचंद्रावर चालत तुकोबारायांकडे आला होता पण तुकोबाराय अंर्तबाह्य शुध्द स्वरुपात संलग्न असल्यामुळे तुकोबारायांनी या व्यभिचाराला स्वतःची आई संबोधून आल्या पावली परत लावीलेले आपण जाणुन आहोतच की -
जाई वो माते...
तु न करी साह्यास।
आम्ही विष्णूदास...
तैसे नोंहे..!

आता आपणालाही व्यभिचारातुन मुक्त व्हावे असे वाटत असेल तर अंर्तबाह्य शुध्दीचा मार्ग शोधावा.
त्यासाठी आपल्या मनाला आपणच नित्य-सत्य-मित गोविन्द तथा तया नामाचा छंद लावावा -
मना लागलीया छंद।
नित्य गोविंद ते काया॥
तेव्हाच कुठे जीवाला आशा-आकांक्षा विरहीत शुध्द रामनामाची आवड निर्माण होते-
मग रामनाम उपजे आवडी।
सुख घडोघडी वाढु लागे॥
अशाप्रकारे तो सुखस्वरुप परमात्मा आपल्या अंतरी वास करु लागतो, म्हणजेच - हृदयी प्रगटे रामरुप। आणि मनात परमात्मा प्रगट झाला की त्याच्या प्रभाव सहजपणे आपल्या स्थुल देहावरही दिसुन येतो.
मन हे जाले मन हे जाले...
पुर्ण विठ्ठलची जाले...
अंर्तबाह्य रंगूनी गेले विठ्ठलची...
अशा परिस्थीतीत सहाजिकच जिथे अंर्तबाह्य शुध्दस्वरुप परमात्मा तेथे कसला आला व्यभिचार..!
म्हणुन एकच सांगावेसे वाटते की-
जागते रहोऽऽऽ
(चिंतनाचे सर्वाधिकार श्री'माऊली ज्ञानोबा-तुकोबांचे चरणी स्वाधीन)
...जयमुक्ताई...रामकृष्णहरी...👣स्पर्श...
No comments:
Post a Comment