˙˙जय मुक्ताई ..

Saturday, 8 October 2016

काम नाहीं काम नाही झालों पाही रिकामा

काम नाहीं काम नाही झालों पाही रिकामा

        संत तुकोबाराय या अभंगातून सांगतात की,माझ्याजवळ काहीही काम नाही,मी पूर्णपणे रिकामा झालो आहे. अशी अवस्था तुकोबारायांची होती. 'काम' हा शब्द या ठिकाणी दोन वेळा आलेला आहे.पहिला शब्द मराठी भाषेतला तर दुसरा शब्द संस्कृत भाषेतला.संस्कृत शब्दाचा अर्थ आहे वासना.काही काम शिल्लक नाही,कारण वासना नाही.म्हणून आता,
फावल्या त्या करू चेष्टा।निश्चळ द्रष्टा बैसोनि।
म्हणून मी आता निश्चल द्रष्टा बनून फावतील त्या क्रिया करीत राहीन.निवांत बसणे,द्रष्टा बनून राहणे ही साधीसुधी गोष्ट नाही आहे.पण तुकोबारायांनी तेंही साधले होते.तुकोबाराय म्हणतात मी परोपकार करण्याचा,लोकांना दुःखातून मुक्त करण्याचा पुष्कळसा प्रयत्न केला,परंतु लोकांना दुःखातच आनंद येतो,असा मला अनुभव आला.लोकांना त्या दुःखातून कोणी सोडवावे हें त्यांना आवडत नाही.


नसत्या छंदे नसत्या छंदे।

जग विनोदें विव्हळतसे।
तुकोबाराय पुढे म्हणतात,अवघी दुनिया ही कासावीस झाली आहे,पण विनोदाने झाली आहे.कारण त्यातच त्यांना आनंद मिळत आहे.कल्पना करा,जर आम्हांला काही कारणांकरीता पैशाची गरज पडली आणि आपल्यासारख्या भल्या माणसांनी कोणाला मदत केली तर कोणाला आवडणार नाही? पण हे हिथपर्यंतच ठीक आहे पण त्याच्यापुढे आपण जर ज्या कार्यासाठी मदत केलीय त्या कार्यात हस्तक्षेप केला तर मदत केलीय त्यांना आवडेल का ? नाही ते म्हणतील बाबांनो तुम्ही दूर रहा.सांगायचं असं की लोकांना सांसारिक गोष्टींतच आनंद येत असतो.
म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात,
एकाएकीं एकाएकीं

तुका लोकीं निराळा।
तुकोबाराय एकटे अगदी निराळे होऊन राहिले आहेत.असे रिकामपण आजच्या भाषेत अशी बेकारी ही वेगळीच गोष्ट आहे.खूप चिंतनीय रिकामपण आहे तिथपर्यंत आपली मजल पोहचणे. अशक्यच !
जय मुक्ताई
संग्रहीत चिंतन
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:

Post a Comment