˙˙जय मुक्ताई ..

Saturday, 15 October 2016

सोळा कळी चंद्र पुर्णिमे पुर्ण बोध

सोळा कळी चंद्र पुर्णिमे पुर्ण बोध

    देव आसुर यांनी समुद्र मथंन केले तेंव्हा जे चौदा रत्न सागरातुन निघाले त्यातील ऐक रत्न चद्रं
चंद्राचा विवाह करून ब्रम्हंदेवाचा पुत्र  प्रजापती दक्षाच्या अनेक कंन्यापैकी सत्तावीस कन्या चंद्राला दिल्या
त्या सर्व नक्षत्र पत्न्यापैकी चंद्र सदा सर्वकाळ रोहिणीशीच रममाण असे
त्यामुळे बाकीच्या पत्नी निराश असत
त्यानी ति तक्रार आपल्या पित्याकड़े केली असता दक्षाने चद्रंमाला सर्व पत्नीना समान साभांळण्याचे सागितंले
परंतु चद्राने ते मानले नाही
त्यामुळे दक्षाने रागानेच चंद्राला क्षयरोगी बनन्याचा शाप दिला
क्षयरोगी बनल्यानतंर चंद्राने भगवान शकंराची खड़तर आराधना केली
भगवान शकंर प्रसन्न होऊन चंद्राला मृत्युलोकातील भिमानदीच्या लोहदंड़ तिर्थात स्नान करण्यास सांगितले


भगवान शिवजी म्हणाले
दक्षाच्या शाप तुला भोगावाच लागेल
तथापि महिण्याचा अर्धा भाग तुझी वाढ होत जाईल
तो दिवस म्हणजे पौर्णिमा

अर्ध्याभागात तू कमी कमी होत जाऊन एक दिवस तुझा पुर्ण क्षय राहिल तो दिवस म्हणजे अमावस्या
भगवान शिवजी तथास्तु म्हणून गुप्त झाले
ज्या ठिकाणी शिवजी गुप्त झाले त्या ठिकाणी अग्निज्वालेप्रमाने ऐक तेजस्वी असे दिव्य शिवलिंग उत्पन्न झाले
त्या शिवलिंगाची चंद्राने विधिवत स्थापना केली व सुवर्ण मंदीर बांधले
चंद्राने शिवलिंग स्थापन करुन शिवमंदिर बांधले 
चद्रंमा म्हणजे सोम
ते ज्योतीर्लिगं म्हणजेच सोमनाथ
नावाने आजही प्रसिद्ध आहे
तेथून चंद्र अगदी धावत धावत भिमानदिच्या तिरावरील लोहदंड़ तिर्थात येऊन स्नान केले व क्षयरोग मुक्त झाला
भगवान शिवजीच्या कृपार्शिवादाने चंद्र भागा म्हणून त्या पवित्र भीमानदीला त्या ठिकाणी चद्रंभागा हे नाव पड़ले
पुढे चंद्राला ज्या ठिकाणी पुनःप्रभा प्राप्त झाली त्या ठिकाणाला प्रभासपट्टण असे नाव पड़ले
असा हा चंद्र फक्त पौर्णिमेलाच पुर्ण होतो
जेंव्हा पौर्णिमेला चंद्राच पुर्ण स्वरूप बघुन चंद्राचा पिता सागर संतुष्ट होतो व सागराला फक्त पौर्णिमेलाच आनंदाची भरती येते
देखोनी आपला कुमर!
उचंबळे तेव्हा सागर!!
सागर जसा आपल्या पुत्राला बघुन उचंबळून येतो
परी मर्यादेचा सागरू।
हा तंवचि तया डगरू।
जंव न देखे सुधाकरू।
उदया आला॥
 त्याच न्यायाने संतमहात्माचा जीव ब्रम्हं ऐक्य बोध उचंबळून येतो
माऊली ज्ञानोबाराय संतांच्या या भावाच वर्णन करताना म्हणतात
सोळा कळी चंद्र पुर्णिमे पुर्ण बोध!
संतजनां उदबोध सागर न्याये!!
संत महात्म्ये पुर्ण बोधावर वावरत सतत दुसर्याला आनंद देतात
 व स्वतःही
नित्यता पूर्णिमा ह्रदयी चद्रंमा!
आलिंगन मेघश्यामा देतु आहे!!
भगवान परमात्मानी गीतामृत अर्जुनाला कुरूक्षेत्राच्या रनांगणावर पाजुन 
मग अर्जुन म्हणे काय देवो!
पुसताती आवड़ी मोहो!
तरी तो सहकुटुंब गेलाजी ठावो!
घेवूनी आपला!!
जसा अर्जुनाचा मोह भगवंताने सहकुटूंब घालवला तसाच आपलाही मोह सहकुटूंब जाण्यासाठीच संत वैकुंठाहुनी अवताराला येत असतात
माऊलीची ज्ञानेश्वरी म्हणजे चंद्रामृतच
माऊली म्हणतात
ज्ञानदेवा मोहो निःशेष निर्वाहो!
रूपी रूप सोहं हो ऐक्य तेजे !!
भगवंताने गीतारूपी अमृत जे अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले
तेच अमृत माऊली ज्ञानोबारायांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या रूपात तुम्हाला आम्हाला दिले आहे
संत महात्म्ये तर म्हणतात
चंद्र अमृत सुखे सेववेल
पण ते चंद्रामृत पिण्यासाठीच संत जीवाला जागे करतात
आज कोजागिरी पौर्णिमा
सुज्ञ मानस आज रात्रभर हरिजागर करतात
आज देवांचा राजा इद्रं व लक्ष्मीमाता रात्री फेरी करतात
व पाहतात
कोण जागे आहे?
को-जागिरी म्हणजे को- जागर्ती
म्हणजेच
कोण जागे आहे?
शेवटी काय संत महात्म्ये हात जोडून पाय पकड़ून सांगतात
आता जागा रे भाईनो जागा

।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।

https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment