˙˙जय मुक्ताई ..

Saturday, 8 October 2016

पुण्य करीता होय पाप

|| श्री विठ्ठल ||
संसार म्हटले कि नफा तोटा आलाच
ऐक वंश परंपरेने मच्छीमारी करणारे बांधवाला आपल्या धंद्यात खुप मोठे नुकसान झाले
तो हताश होऊन आपल्या प्रारब्धालाच दोषी ठरवत ऐका निर्जन ठिकाणी एकांतात चिंताग्रस्त अवस्थेत बसून होता
तितक्यात धर्मराज युद्धीष्ठिर त्यामार्गाने जात असताना ति व्यक्ती दृष्टीस पड़ली
धर्मराजाने त्या व्यक्ती जवळ जाऊन आदराने विचारपुस केली
असता त्या व्यक्तीने आपल्या नशिबात आलेल्या दारिद्र्याचा पाढा वाचला
धर्मराज्याचे साधु अंतकरण कळवत द्रवित झाले
धर्मराजाने त्या जीवनालाच निराश झालेल्या मनुष्याला काही सुवर्ण मोहरा देऊन त्याचे सात्वंण केले
ती जीवन हताश झालेली व्यक्ती धर्मराजाच्या चरणी साष्टांग दड़ंवत करत म्हणाली
मायबाप
माझ्यावर कुटूंब पालनाची जबाबदारी आहे

  मला माझ्या अड़चणीच्या काळात कुणीही सगे सोयरे मित्र मड़ंळीनी मदत केली नाही
आपन अगदी देवासारखे माझ्या आयुष्यात आलात
मी अजन्मा आपला ऋणी राहील
धर्मराज आपल्या मार्गाने निघून गेले
ईकडे त्या व्यक्तीने त्या मोहरांचे ऐक नविन जाळे खरेदी केले
व आपल्या व्यवसायासाठी समुद्र किनारी आला
त्याच्या ड़ोळ्यासमोर धर्मराजाची मुर्ती दिसत होती
त्याने मासेमारीसाठी पहिले जाळे पाण्यात टाकायचे अगोदर मोठ्याने जयघोष केला
"धर्मराज युद्धिष्ठीर की जय हो"
असे प्रत्येक वेळी पाण्यात जाळे टाकताना त्याचा धर्मराजाचा जयघोष सुरु होता
पाण्यातून अनेक मासे त्याच्या जाळ्यात अड़कून आपला प्राण गमावत होते
तिकडे जितके जीव मरतील त्याची
चित्रगुप्त आपल्या वहीत धर्मराजाच्या नावाने नोंद करत होता
महाभारताच्या शेवटी धर्मराज युद्धिष्ठीरांचे अवतार कार्य सपंवण्याची वेळ आली तेव्हा ति चित्रगुप्ताची वही बघून स्वतः यमराज धर्मराज युद्धिष्ठीरांना नेण्यासाठी आले
युद्धिष्ठिरजी
आपन साक्षात धर्म आहात
परंतु आपल्या केलेल्या दानामुळे असंख्य जीवाचे प्राण गेले आहे
त्यामुळे आपल्याला थोड़ावेळ तरी नरकात याव लागेल
स्वतः साक्षात यमधर्माचा अवतार असलेले धर्मराज युद्धिष्ठिर त्यांची
"पुण्य करिता होय पाप"
हि कथा
मग आपल??????
तुका म्हणे नाही विस्वास ज्या मनी!
पहावे पुराणी विचारूनी!!
जय जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment