˙˙जय मुक्ताई ..

Thursday, 20 October 2016

तुमचेनी बरा दिसतसे

तुमचेनी बरा दिसतसे
मेघ समुद्रापासुन तयार होतात
पण उपयोगाच्या दृष्टीने समुद्रापेक्षा मेघाद्वारे पड़णारे पावसाचाच उपयोग जास्त होतो
परीस स्पर्शाने लोखंडाचे सोने होते
पण जगाचा व्यवहार सोन्यामुळे चालतो
अग्नीचाच दिवा होतो पण प्रकाशासाठी दिव्याचा उपयोग जास्त होतो
त्याच न्यायाने देवाच्याच शक्तीने अर्जुन श्रीकृष्णापेक्षा मोठा वाटतो
कारण


भगवंत स्वतः म्हणतात
मी मोठा आहे पण माझे भक्तांपुढे काहीही चालत नाही
भगवंत महा अतुर्बळी!

अदट दैत्याते निर्दळी!
तो कोड़िंला ह्रदय कमळी!!
म्हणून भगवंत आपल्या भक्तांना म्हणतात
पतित पावन मी तो आहे खरा!

तुमचेनी बरा दिसतसे!!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment