बहिणी म्हणे फड़कती ध्वजा
भागवत धर्माचा ज्यांनी पाया घातला ते
विश्वमाऊली ज्ञानोबाराय भगवंतांला प्रार्थना करतात, "देवा,मी एक सामान्य पतित जीव आहे ही गोष्ट खरी,
तैसा मी एक पतित |
परी तुझा मुद्रांकित ||
परंतु तुझा मुद्रांकित भक्त आहे. पतकाचे वा झेंड्याचें कापड़ अथवा फडकें तें काय?
पण त्याच्या प्रतिष्ठेसाठी राजाला कष्ट करावे लागतात. राजाच्या सहीचें चिटोरें ते केवढें
परंतु साध्या कागदावर सरकारी मुद्रा असली तर त्याची किमंत किती वाढते.
राजाज्ञेचीं अक्षरें आहाती ।
तियें चामा एका जया पडती ।
तया चामासाठीं जोडती ।
सकळ वस्तु ॥
पण राजाच्या स्वतःच्या किंमतीइतकी त्याची किंमत ठरते. तीच स्थिती माझी आहे. मी तुझे यश फडकविणारा झेंडा आहे. मी तुझी आज्ञा जाहीर करणारें तुझे आज्ञा-पत्र आहे. त्याची प्रतिष्ठा सांभाळणें तुला भाग आहे.
वांचूनि सोनें रुपें प्रमाण नोहे |
एथ राजाज्ञाचि समर्थ आहे |
तेंचि चाम एक जैं लाहे |
तेणें विकती आघवीं ||
देवा, मी पतित आहे परंतु तुझा मुद्रांकित आहे
तुला जसे तुझे बिद्र साभांळायचे आहे ,
तसेच आम्हाला सुद्धा तुझे मुद्रांकित म्हणून हि भागवत धर्माची पताकाचे चिरगुट जतन करायचे आहे. हे जतन करणे सोपे नाही
परंतु तुझ्या आशिर्वादने प्रयत्न करू
पुढे ह्याच भागवत धर्माच्या पताकाचा विस्तार करत पजांबापर्यंत झेंडा लावला तो भगवंताचे भक्त नामदेव महाराज
तेणे केला हा विस्तार
याच भागवत धर्माच्या इमारतीचे जनार्दन एकनाथ खांब झाले
सर्वात महत्त्वाचे कार्य केले ते जगदगुरू तुकोबारायांनी
या भागवत धर्माची वैराग्यरूपी ध्वजा रक्षण करताना भंड़ारा ड़ोगंरावर एकांतात आलेल्या स्त्रीला
जाई वो तो माते न करी सायास |
आम्ही विष्णूदास तैसे नोहे ||
असे वैराग्यमुर्ती तुकोबाराय या भागवत धर्माच्या कलशस्थानी ठरले
घोटविन लाळ ब्रम्हंज्ञान्या हाती
अथवा
धन्य म्हणविन इहलोकी लोकां |
भाग्य आम्ही तुका देखीयेला ||
म्हणत
म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी |
गेला तो विमानी बैसोनीया ||
याच जगदगुरू तुकोबारायांच्या कृपापात्र शिष्या खांदेशातील संत बहिणाबाई आपल्या सदगुरूच यथार्थ वर्णन करतात
बहिणी म्हणे फड़कती ध्वजा |
भागवत धर्माचे अनुयायी झाल्यावर प्रत्येकालाच या परंपरेतिल काही गोष्टीच जतन करायलाच लागते. सुरुवातीला विविध रंगी वस्त्र परिधान करत पाढंरे शुभ्र वस्त्रात सदगुरूंच्या दर्शनाला पहिल्यांदा गेलो, तेव्हा गुरूजी म्हणाले, बाबा पांढरी वस्त्र परिधान केलीत खरी, पण या पांढऱ्या वस्त्राला फार लवकर ड़ाग पड़तात हं.. अगदी छोटासा ड़ाग सुद्धा या पाढंरे वस्त्रावर खुलून दिसतो, तेव्हा आता हे पाढंरे वस्र अंगीकार केलेत ना? आता यावर ड़ाग पड़ूच देऊ नका, परंपरा जतन करा
तेव्हा खरे अर्थाने संतांच्या ध्वजेचे वा परंपरेचे आपन पाईक म्हणून घेऊ, आणी संतांनी हे जतन केले म्हणून त्यांची पुण्यतिथी होते.
आज संत बहिणाबाई पुण्यतिथी निमित्ताने हा शब्दप्रपंच
सकलंण- पुण्यतिथी सोहळा किर्तनातून
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment