दुःखद निधन
मानवी जीवन ईश्वरी उर्जेच महासागर आहे
जेव्हा अंतश्चेतना जागृत होते तेव्हा हि ईश्वरी उर्जा जीवनकला म्हणून प्रकट होते
साहित्य संगीत कला विहिनः साक्षात् पशु पुच्छ विषाणहिनः
साहित्यकार म्हणतात
कुठल्यातरी कलेविना मनुष्य जीवन पशुसमान आहे
हि ईश्वरी उर्जा चेतना रूपाने
स्थापत्य
कला
संगीत
चित्रकला
काव्य
नृत्य
रंगमंच
"मुर्तीकला" याद्वारे प्रगट होते
अशी ईश्वरी देनगी असलेली हि मुर्ती कला प्राप्त झालेल्या ऐका शिल्पकाराने आपल्या उत्कृष्ट कलेच्या बळावर खुप नावलौकिक मिळवला होता
ऐक दिवस तो आपले नित्याचे शिल्पकर्म करत असताना त्याची गाठ ऐका सुप्रसिद्ध ज्योतिषासोबत पड़ली
त्या ज्योतिषाने याच हात बघत भविष्य कथन केले
आज पासुन बरोबर ऐक महिन्यांनी तुझा अमुक अमुक तारखेला इतके वाजता मृत्यू होईल
म्हणतात ना...
"अगा मरू हा बोल न साहती"
मरण हा शब्द ऐकताच तो सुप्रसिद्ध शिल्पकार अतिशय बेचैन झाला
आपले नित्य कर्म सोडून सैरावैरा फिरू लागला
फिरत असताना ऐका सज्जनाची व त्यांची भेट झाली
सर्व मृत्यूवृत्तांत त्या जवळ कथन केला
त्या समोरच्या सज्जनाने त्याला नानायुक्तीने समजावण्याचा प्रयत्न केला
येथे नाही उरो आले अवतार!येर ते पामर जीव किती!!
शेवटी तो शिल्पकार काही मानेना
तेंव्हा सज्जन गृहस्थ त्याला म्हणाला
तु शिल्पकार आहेस ना?
तु कुठलिही मुर्ती घड़वू शकतोस
मग ऐक काम कर...
तु हुबेहूब तुझ्या सारख्याच चार मुर्ती घड़व
आणि
मृत्युसमयी त्या मुर्ती शेजारी जाऊन गुपचुप कुठलेही संभाषण न करता मौन उभा रहा
ठरल्याप्रमाणे थोड्याच दिवसात मुर्ती अगदी हुबेहूब तयार झाल्या
व
मृत्यूची घटिका जवळ येत अखेर तो दिवस ही उजाड़ला
बरोबर बारा वाजता यमदुत त्या शिल्पकाराला नेण्यासाठी हजर झाले
समोर बघतात तर सर्व ऐक सारखेच
शेवटी हताश होऊन यमदुत यमराजाकड़े पुन्हा परत गेले
सर्व वृत्तांत कथन केला
यमराज दुतांना म्हणतात
शभंर गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु ऐका निरपराध मनुष्याला शिक्षा होता कामा नये
हा मृत्युलोकीचा सिद्धांत आहे
मी स्वतः येतो
असे म्हणून यमराज दुतांसह शिल्पकाराच्या घरी आले
ऐक सारखे अनेक मनुष्य बघुन यमराजही गोधंळून गेले
पुन्हा परतून ते ब्रम्हंदेवाकड़े गेले
आपली समस्या सागितंली
ब्रम्हंदेवालाही नवल वाटले
आजवर मि ईतके सर्व मनुष्य जीव सृष्टी घड़विली
परंतू इतके साम्य माझ्याकड़ून कधि घड़लेच नाही
विचार करून करून ब्रम्हंदेवही थकून गेले
शेवटी यमराजासह वैकुंठाला जाऊन भगवान श्रीहरिची प्रार्थना केली
ब्रम्हंदेवाचे गाह्राने ऐकून
चतुरांचा शिरोमनी भगवान परमात्मा त्या शिल्पकाराच्या घरी आले
भगवंताने त्या सर्व मुर्तीची ऐक परिक्रमा केली व ब्रम्हंदेवाला म्हणाले
ब्रम्हांजी !
मि या सपुंर्ण जगताचा पालनकर्ता आहे
तुम्हालाही जन्म माझ्या नाभीकमलातून आहे
आपन सर्व सृष्टीची निर्मिती माझ्या आज्ञेनेच करता
परंतू
मी आजवर युगानूयुगे झाली अशा ऐक सारख्या साम्य असलेल्या मुर्ती बघितल्या नाही
भगवान परमात्मा त्या अज्ञात शिल्पकाराची खुप स्तुती करू लागले
माझी ऐक इच्छा आहे ब्रम्हांजी
मला त्या शिल्पकाराचे दर्शन व्हावे
संत महात्म्ये म्हणतात
स्तुती कुणाला आवडत नाही बर
जनस्तुती लागे मधुर!म्हणती उद्धराया हा हरिचा अवतार!आम्हालागी झाला स्थिर!तेणे तो धरी फार शब्दगोड़ी!!
अहो
ऐखादे सक्षम कार्य करून घेण्यासाठी जेंव्हा अक्षम व्यक्तीकड़ून सक्षम व्यक्तीच्या नकळत केवळ भाड़ोत्री शब्दांचा बैल म्हणून वापर केला जातो
तरीही लोक त्या स्तुतीला भुलून जातात
स्तुती नावाची कन्या आजही आपल्या इच्छित वराचे शोधात वनवन करत फिरतेय
काय करणार बिचारी स्तुतीमाता
"स्तुतीला दुर्जन आवड़त नाही व सज्जनांना स्तुती आवडत नाही"
म्हणून स्तुती माता अजून कुमारीकाच आहे
"दोन अक्षरांचा स्तुती शब्द पण भल्याभल्यांची तुती वाजवतो"
इथे साक्षात वैकुंठनायक भगवान परमात्मा शिल्पकाराच्या कलेची स्तुती करताय
तेव्हा
मानस्तुती अलौकिक!भुलला देख पै तेथे!!
भगवान परमात्माच्या स्तुतीला भुलून ऐरवी शांत व मुर्तीरूपातील कलाकार भगवान परमात्मापुढे येऊन गर्वाने छाती काढून उभा राहीला
भगवान श्रीहरि यमराजाला म्हणतात
यमराजजी
"हे घ्या तुमचे गिह्राइक"
अशा रितीने ऐका जगप्रसिद्ध सुप्रसिद्ध शिल्पकाराचे स्तुती नावाच्या दोनच शब्दाने दुःखद निधन केले
भावपूर्ण श्रद्धांजली
जय मुक्ताई
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment