˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 4 October 2016

उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवम्...

उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवम्...
    उत्तराखंड़ मधिल रूद्रप्रयाग जिल्ह्यातील कविल्ठा गावात जन्माला आलेले बालक कालिदास यांचा विवाह विद्योत्तमा नामक राजकुमारी जि स्वतः अत्यंत बुद्धिमान होती तिने विवाहासाठी पन केला होता
जो मला शास्त्रार्थामध्ये आपल्या ज्ञानाने हरवेल मि त्याच्या सोबत विवाह करेल जेंव्हा सर्व शास्त्रार्थी पंड़ित विद्वानाची सभा भरली तेंव्हा जमलेल्या सर्वांना विद्योत्तमा ने हरवले तो अपमान विद्वानांना सहन झाला नाही त्या सर्वांनी येऊन आपले दुःख कालिदासांना सागितंले
कालिदास विद्योत्तमा बरोबर शास्त्रार्थ करण्यासाठी विद्वानांच्या विनंती वरून राजदरबारी आले विद्योत्तमा ने मौन शब्दावलीत आपल्या हाताची मुठ दाखवून उगारत गुढ प्रश्न विचारला असता कालिदासानेही आपल्यावर हात उगारला आहे म्हणून मौनातच आपला हाताची पाच बोटे अलग करत दाखवून उत्तर दिले विद्योत्तमाला वाटले हा विद्वान म्हणत आहे पाच इद्रियं भले अलगद आहेत परंतु हे ऐका मनाद्वारे सचंलित आहेत विद्योत्तमा या उत्तराने समाधानी होत कालिदासाबरोबर विवाहीत झाली पुढे काही दिवसातच तिला समजले कि कालिदास अपनढ आहे तिने कालिदासाचा धिक्कार केला आणि घरातून बाहेर पड़ा आणि आता खरे पंडित बनून याल तेव्हा घरात घेईल
कालिदास घरातून निघाले आपल्या अनपढ अज्ञानाने चित्त विव्हळ झाले होते सरळ जाऊन कालिकामातेच चरण पकड़ले अनेक दिवस कालिकामातेची उपासना करता करता कालिकेचे दास बनले कालिका मातेने तथास्तु म्हणून वरदान दिले ज्ञानप्राप्ती झाल्यावर कालिदास आपल्या घरी आले व घराचा दरवाजा ठोठावत म्हणाले


कपाटम् उद्वाट्य सुदंरी
दरवाजा खोलो सुदंरी
हे शब्द ऐकताच
विद्योत्तमा चकित होत म्हणाली
अस्ति कश्चिद् वाग्विशेषः
  कोई विद्वान लगता है अशा पद्धतीने कालिदासानी आपल्या धर्मपत्नीलाच मार्गदर्शक गुरू मानत साधना करत कालिकामातीची कृपा संपादित केल्यावर त्यांचा नावलौकिक होऊ लागला
सुरवातीला श्रुगं राजाच्या दरबारी त्यांची कवि म्हणून नियुक्ति झाली
पुढे कालिदास उजैन नगरीत विक्रमादित्य राजाच्या दरबारात कवि म्हणून राहिले
नऊ मान्यवर रत्नांपैकी कालिदास ऐक होते
त्यांनी आपल्या जिवनांत अनेक महाकाव्याची रचना केली
रघुवंशम मध्ये रघूकुलातील केलेले वर्णन विलेखनीय आहे
अनेक खंडकाव्य केले
मेघदुत हे ही विशेष काव्य दोन भागात आहे
पुर्वमेघ व उत्तरमेघ
ऋतूसंहार काव्याची रचना हि केली
कालिका मातेच्या कृपेने कालिदास उत्तम प्रकारचे ज्योतिषीही होते
कालामृतम् हे ज्योतिष शास्त्रावरील साहित्य म्हणजेे त्याचा उत्तम नमुना
श्रुतबोधम् शृंगार तिलकम् शृंगार रसाशतम् सेतुकाव्यम् कर्पूरमंजरी पुष्पबाण विलासम् श्यामा दंडकम् ज्योतिर्विद्याभरणम्
त्यांनी शाकुंतल सारखे अनेक शृंगारिक काव्य देखील केले
त्यांच्या साहित्याची अलौकिक विशेष बाब म्हणजे ते अनेक राज्याच्या पदरी राहिले
परंतु
आपल्या साहित्यात त्याचा कुठेही नामोल्लेख आढळत नाही
उत्तर काळात ते भोज राज्याच्या दरबारी महाकवी ठरले
आपल्या धर्मपत्नीने केलेल्या उपदेशालाच पथदर्शक गुरू मानुन साधना करता करता ते संसारी पत्निचे दास न बनता कालिकामातेचे दास झाले व या उभय जगतातील वैदर्भि रितीचे महाकवी ठरले
लिप्ता मधुद्रवेणासन् यस्य निर्विषया गिरः!तेनेदं वर्त्म वैदर्भ कालिदासेन शोधितम् !!

उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवम्
आपली आपन करा सोड़वण
जय मुक्ताई👏🏻👏🏻👏🏻
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:

Post a Comment