˙˙जय मुक्ताई ..

Thursday, 20 October 2016

गंगास्नान प्रतिबंध

गंगास्नान प्रतिबंध
अरण्यात वैशंपायन ऋषी कथा सागंत होते
कथा श्रवण करण्यासाठी सर्व पाड़ंव बसले होते
कथा स्थानाजवळच परम पावन गंगा वहात होती
वैशंपायन ऋषीनी ऐक दिवस कथेत सागितंले कि
माणसाला 25,000 हजार शत्रू गंगेचे स्नान करू देत नाहीत

50,000शत्रू दान करू देत नाहीत
आणि
1,00,000 शत्रू भजन करू देत नाहीत
नियोजित वेळेनुसार प्रवचन आटोपले
परंतु
वैशंपायन ऋषीनी सागितंलेला पंचवीस हजार शत्रू गंगेचे स्नान करू देत नाहीत हा प्रवचनातील मुद्दा भिमदादाला पटला नाही
भिमदादा दुसरे दिवशी सकाळी पुन्हा प्रवचनाला न येता पहाटे चार वाजताच कुणालाही कल्पना न देताच गंगेवर हजर झाले
पहाटे ब्रम्हंमुहूर्तावर सुरू झालेले गंगास्नान करून लाखो भाविक आप आपल्या मार्गाने निघून जात होते पण

कुणालाही स्नानासाठी अड़थळा आला नाही
हे भिमदादा गंगेच्या किनार्यावर बसून दिवसभर पहात होते
सुर्यास्त झाल्यावर भिमदादा आपल्या निवासस्थानाकड़े निघून गेले
दुसरे दिवशी पुन्हा सर्व पाड़ंव वैशंपायन ऋषीच्या कथेला आले असता भिमदादाने ऋषीवर्यांना प्रश्न विचारला
गुरुजी!
परवा आपन प्रवचनात ऐक सिद्धांत सांगितला
काल मि दिवसभर गंगेच्या किनार्यावर उभे राहून प्रचिती बघितली
लाखो लोक पवित्र अश्या गंगामातेच स्नान करून जात होते
कुणालाही स्नानासाठी अड़थळा आला नाही

कोणीही स्नान न करता विन्मुख गेले नाही
आपन तर कथेत सांगितले कि 25,000 शत्रू गंगा स्नानास प्रतिबंध करतात
तेव्हा
वैशंपायन ऋषी म्हणाले
भिमा!
मि फक्त व्यास महर्षीनी सागितंलेल्या पुराणातील श्लोकाचा अर्थ सागितंला
नमोस्तुते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र!

येऊन त्वया भारत तैलपुर्णः प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदिपः!!
ज्यांची बुद्धी विशाल आहे
ज्यांचे कमलनेत्र प्रफुल व विस्तृत आहे
ज्यांनी महाभारत रूपी तेलयुक्त,ज्ञानमय श्रेष्ठ असा दिप प्रज्वलित केला
असे भगवंताचेच अवतार
व्यासो नारायण
खोटं कसे बोलतील?
त्यानां तर
अच्युतुर्वदनो ब्रम्हा द्विबाहुरपरो हरिः!

अभाललोचनः शंभुर्भगवान बादरायणः
अशी तिन्ही देवांची उपमा आहे
थोड़ावेळ वैशंपायन ऋषीही मौन झाले व भिमदादाला विचारातात
भिमदादा
काल तु गंगा मातेचे स्नान केलेस का?
तेव्हा मात्र भिमदादाचा चेहरा पड़ला
भिमदादा वैशंपायन ऋषींना म्हणतात
गुरुजी
मी लोक पाहण्याच्या नादात दिवसभरात गंगास्नान केलेच नाही
तेव्हा वैशंपायन ऋषी म्हणाले
म्हणजे व्यास महर्षीचे वचन सत्य आहे
काल 25,000 शत्रूंनी आपणास गंगास्नान करू दिले नाही
जय मुक्ताई
काही तरी बोध करी मना
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment