˙˙जय मुक्ताई ..

Monday, 17 October 2016

ठाकला तो कांही केला उपकार

ठाकला तो कांही केला उपकार
केलें हें शरीर कष्टवूनि।
शरीरपरिश्रमाच्या द्वारे समाजाची सेवा करता आली पाहिजे.आपल्या शरीराने थोडा तरी उपकार केला पाहिजे.संत तुकोबारायांदी आदिकरून संतांनी शारीरिक परिश्रम करूनसुद्धा उपकार केला आहे.
सर्वांना कथाभाग माहीत आहे.परिस्थिती नुसार तुकोबारायांना गरीबीमुळे एका शेतात शेत राखण करण्याचे काम करावे लागले.एक प्रकारे नोकरीच होती ती.पण ती कशा तऱ्हेने केली ? शेतात जायचे आणि *विठ्ठल विठ्ठल* भजन करत रहायचे.शेतमालकाने दोन-तीनदा याबद्दल तुकोबारायांना टोकले देखील.शेतमालकाने निरीक्षण केले होते की,पक्षी पिकावर येऊन बसतात,धान्य खातात पण तुकोबाराय काही पक्ष्यांना उडवत नाहीत.आपल्याच भजनात रममाण असतात.तेव्हा त्या शेतमालकाने तुकोबारायांना शेत राखणीच्या कामावरून काढून टाकले आणि पंचांकडे तक्रार केली.


पंचांनी तपास केला शेत जाऊन बघितल तर त्यांना तपासाअंती असं आढळून आलं की,तुकोबारायांनी राखण केलेल्या शेतात इतर शेताच्या तुलनेत जास्तच पिक आले आहे.असे म्हणतात की,तेव्हा पंचांनी निकाल दिला की जेवढे जास्त पीक आले आहे तेवढे तुकोबारायांना देण्यात यावे.परंतु तुकोबारायांनी मात्र ते स्वीकारण्यास नकार दिला.शेवटी त्याचा उपयोग भगवान पांडुरंगरायाच्या देवळाच्या दुरूस्तीसाठी करण्यात आला.
वाचायला ऐकायला खूप छान वाटत.
चला लागा कामाला...
जग जोगी जग जोगी

जाग जाग बोलती।
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment