˙˙जय मुक्ताई ..

Monday, 17 October 2016

तैसा काळ लोकां खात आहे

तैसा काळ लोकां खात आहे
    आज कोजागिरी पौर्णिमा म्हणजे सदासुणीचा दिवस
आज गृहिणी आपल्या घरी गोड़धोड़ स्वयंपाक बनवतात
एका गृहिणीने सर्व पक्वान्न बनवून झालेवर सर्वात शेवटी भजी बनवायला सुरुवात केली व बरीच भजी काढून पण झाली
हे सर्व दृष्य एक उंदिर लपून बघत होता
अचानक त्या गृहिणीच्या दरवाजाची बेल वाजते
गृहिणी दरवाजाकड़े जाते
कुणीतरी अतिथी त्यांच्याकड़े येतो ति गृहिणी बराच वेळ तिथे बोलण्यात अड़कते
इकड़े इतका वेळ आपल्या ड़ोळ्याने गरमगरम भजी न्याहाळणारा उंदीर मोठे धाडस करून एक भजी पळवतो
जसा उंदीर भजी घेऊन आपल्या बिळात गेला परंतु तिथे गेल्यावर त्या उंदराच्या मनात लगेच विचार आला
आपन एक भजी आणली हे आज रात्रीचे काम झाले
पण उद्या सकाळी काय खाणार?


म्हणून तो उंदीर पुन्हा दुसरी भजी पण पळवून बॅकेंत ठेवतो
आता सकाळची भोजनाची चिंता मिटली असे त्या उंदराला वाटले तितक्यात त्याच्या मनात विचार आला
मग उद्या संध्याकाळी काय खायचे?
म्हणून तो उंदीर पुन्हा ऐक भजी पळवतो व बॅकेंत लपवून ठेवतो
पुन्हा सकाळची चिंता व पुन्हा रात्रीची चिंता म्हणून तो उंदीर एक एक भजी पळवून बॅकेंत लपवून ठेवू लागला
बर बॅकेंत भजी ठेवण म्हणजे भज्यांना जन्मठेपच
हे उंदराच सर्व भजी सग्रंह वरतून एक बोका शांत चित्ताने बघत हसत होता
त्या गृहिणीने तळलेल्या भजीतील शेवटचे भजी उंदीर घेऊन येत असतानाच तो उंदीर भजीसह बोक्याच खाद्य बनला
संत महात्म्ये ओरडून ओरड़ून सांगतात
पहा तो उंदीर घेऊन जाय बोका!

तैसा काळ लोकां खात असे!!
पटले तर खावे भजी
नाहीतर म्हणा
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment