महाजनो येन गत: स पन्था:तेचि संत तेचि संत
संत या शब्दाचा जो अर्थ समाजमनात रूढ आहे तो संयुक्तिक वाटत नाही.संसारी जीवनातून निवृत्त झालेला आणि परमार्थिक जीवनात रमलेला विरक्त,लोकविन्मुख माणूस म्हणजे संत,हा समज झाला आहे.संत म्हटलं की लोकांच्या नजरेसमोर भगवी वस्त्रे,हातात जपमाळा आणि केवळ परमार्थाच्या मागे लागलेला व समाजालाही त्याच मार्गाने जाऊन ऐहिकतेकडे पाठ फिरवायला सांगणारा संन्यासी हाच अर्थ मनात येतो. आपले संत हे एकातांपेक्षा समाजातच अधिक रमणारे होते.समाजाकड पाठ फिरवण्यापेक्षा समाजप्रेमामुळं त्यांच्या विचारात आणि जीवनदृष्टीत करूणा, वात्सल्य, क्षमाशीलता, संयम, चिंतनशीलता यांचे रंग आलेले असतात.आपण समाजापेक्षा वेगळे आहोत या सामान्य संसारी लोकांपेक्षा आपली पातळी अधिक आहे असे या खऱ्या संतांच्या मनोवृत्तीला हा विचार कधीच स्पर्श करू शकत नाही.संत जगाचे आघात सहन करतात पण त्याची परतफेड प्रेमाने करतात.
तुका म्हणे तेचि संत।सोशी जगाचे आघात।
आघात सहन करणं हा त्यांचा दुबळेपणा नव्हे.सहिष्णुता आणि क्षमाशीलता ही संतांची शस्त्रे आहेत.वाट चुकलेल्यांना आपुलकीनं वाट दाखवणं हे संतत्वाचं लक्षण आहे.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती।
जड-जीवांचा उद्धार हेच संतांचे काम हाच त्यांचा हेत.
तेणेचि पंथे चालो जाता।न पडे गुंता कोठे काही।
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment