˙˙जय मुक्ताई ..

Friday, 14 October 2016

देव घ्या कोणी देव घ्या कोणी

देव घ्या कोणी देव घ्या कोणी
देव घ्या कोणी देव घ्या कोणी।
आइता आला घर पुसोनी।
    संत तुकोबारायांचा हा अभंग खूप सुंदर आहे.तुकोबाराय या अभंगातून मी देवाला विकायला निघालोय अस म्हणतात.घराघरात जाऊन म्हणतात, देव घ्या हो,देव घ्या हो! पण तरीहि कोणी देवाला घ्यायला पुढे येत नाही.आता काय करावे बाजारात जर मालाला उठाव जर नाही झाला तर,मालाचा भाव पडतो हिथही देवाचा भाव पडला;

आता काय करायचे ? तर तुकोबाराय म्हणतात, देव घ्या फुका - फुकटात घ्या पैसे नका देऊ,पण लोक भलतेच हुशार लोक त्यांना म्हणतात, देव नलगे देव नलगे,सांठवणाचे रूधले जागे* अहो तुकोबाराय आमच्या घरात आधीपासूनच इतके सामान भरलेले आहे की,देवाला ठेवायलाच जागा नाही.म्हणून आम्हांला देव नको.कल्पना करा जर तुकोबारायांना असे उत्तर मिळू शकते तिथे तुमची-आमची काय गत!
आपल्या घरी तुकोबाराय आले देव आला आणि आपले घर सामानाने भरलेले असेल.तर आपण काय करणार ? आपण आपल्या घरात थोडी तरी रिकामी जागा space ठेवूनच द्या.
आपले अंतःकरण मोकळे ठेवू तर ईश्वर तेथे विराजमान होईल.पण आपण अगदी *ठासून* भरलेले असतो.
संत तुकोबाराय जेव्हा येतील देव घेऊन तेव्हा तर घ्याच पण आतापर्यंत नसेल आणला,नसेल पाहिला तर.....
आला कार्तिकीचा हाट....
चला वारीला.....
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:

Post a Comment