बुडता हाका मारीत ठाव।नाही आणिका वारी।
एकदा एक मनुष्य एका डोहात पडला,बुडतां बुडतां हाका मारून सांगू लागला,की तुम्ही या बाजूने येऊ नका बुडाल.तर हा त्याचा उपकार आहे की नाही ? मोठा डोह आहे हे त्याला समजून आले आहे,म्हणून तो सांगतो आहे की तुम्ही येवू नका.तर आपण म्हणू का तू कां चालला आहेस ? आम्हीं पण येणार.एकाने विष प्राशन केलेल आहे आणि सांगतोय की ह्याने प्राण जाईल,विषाचे सेवन करू नका.तो चांगली गोष्ट सांगत आहे.तुकोबाराय या अभंगाच्या शेवटी सांगतात,
तुका म्हणे न करीं हेका।
गुण घेऊन अवगुण टाका।
हेका धरू नका तो चांगला उपदेश करतोय तर ऐकाच.त्याचे आचरण चांगले असले पाहिजे असा हेका धरू नका.
एखादा विद्वान पंडित आहे परंतु त्याचे आचरण चांगले नाही पण तो चांगले सांगतो आहे पण ते आपण ऐकणार नाही.आपण असं करू तर चांगले गुण घेतले जाणार नाहीत.त्याच्या सांगण्यातील चांगले गुण घ्या अवगुण टाका.हेका धरून बसून नका.ते स्वतः आडवाटेने चालले आहेत तरी आम्हांला उपदेश देत आहेत हा त्यांचा केवढा उपकार आहे.
चालती आड वाटा।
आणिकां दाविती जे नीटा।
न मानी तयाचें उपकार।
नाही जोडा,तो गव्हार।
एखादी चांगली गोष्ट मिळत असेल तर ती घ्या.तो कसा वागतो ही उठाठेव कशाला ? ज्याचे आचरण तो जे बोलतो तसे असेल म्हणजे ज्ञानही असेल. ज्ञानही आहे आणि जोडीला आचरणहि आहे निश्चितच त्याचा परिणाम जास्त होईल यात शंका नाही.परंतु तसे नसेल पण सांगितलेली गोष्ट चांगली समाजपोषक असेल समाजमन घडवणारी असेल तर ती कां घेऊ नये?
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment