˙˙जय मुक्ताई ..

Monday, 17 October 2016

विद्वान

विद्वान
राजा भोज पुर्वीपासूनच विद्वानांचा आदर करणारा राजा
विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन !
स्वदेशे पुज्यते राजा विद्वान सर्वत्र पुज्यते !!
याच न्यायाने भोज राजाच्या नगरीत ऐकदा दोन विद्वान आले आहेत असे सेवकाकरवी राजाला समजले
राजाने दोघानंही विद्वानांना आमंत्रित करून वेगवेगळ्या ठिकाणी दोघांची उतरण्याची व्यवस्था केली
राजा त्या दोघां विद्वानांना वेगवेगळे भेटतो
पहिल्या विद्वानाला राजा प्रश्न विचारतो
आपल्या दोघांपैकी विद्वान कोण आले
तेंव्हा पहिला म्हणाला
महाराज!
तो दुसरा गाढव आहे
राजाला त्याचे उत्तर ऐकून समाधान वाटले व राजाने त्याला दरबारात स्नेहभोजनासाठी निमंत्रीत केले
भोज राजा दुसय्रा विद्वानाच्या भेटीला गेला व
त्यालाही प्रश्न विचारला


आपल्या दोघांपैकी विद्वान कोण आहे?
तेंव्हा तो दुसरा विद्वान म्हणाला
महाराज
तो दुसरा विद्वान बैल आहे
याचेही उत्तर ऐकून भोजराजा अतिशय खुष झाला
व त्यालाही आपल्या दरबारी स्नेहभोजनासाठी निमंत्रीत केले
दोघेही विद्वान भोजराजाकड़े आल्यावर राजाने त्या दोघांचा सत्कार करून त्यानां भोजनासाठी बैसवीले
दोघांनाही विद्वानांचे ताट सेवकाकरवी वाढून आले
परंतू ते ताट रूमालाने झाकलेले होते
समोर जेवनाचे ताट आल्यावर
विद्वानांनी स्तोत्र म्हणायला सुरुवात केली
स्तोत्रपाठ झाल्यावर ताटीवरील रूमाल काढून बघता तर ऐका विद्वानाच्या ताटात सरकी पेड़ं वाढलेली होती

दुसरे विद्वानाचे ताटात हिरवे गवत वाढलेले होते
हे समोरचे दृष्य बघून दोघेही विद्वान अतिशय संतप्त झाले

राजाला या प्रकारचा जाब विचारू लागले
तेंव्हा भोज राजा अतिशय नम्रपणे त्या विद्वानांना उत्तर देतात
यातिल ऐक ताट बैलासाठी आहे
व ऐक ताट गाढवासाठी आहे
ऐक सुभाषितकार म्हणतात
आठ जण ऐकमेकांचा द्वेष करतात
सुभाषित आठवत नाही आता
आपण केलेली इच्छा इंद्रियांना इच्छीते विषय प्राप्त न होणे
तेंव्हा जी वृत्ती उत्पन्न होते
तिला द्वेष असे
माऊली ज्ञानोबाराय म्हणतात
आणि पसरिला अभिलाषु!
अपूर्णु होय तोची द्वेषु!
एवढं कामक्रोधाहुनि आधिकु!
पुरूषार्थ नाही!!
म्हणून तर
सर्वाभुती समभाव असणारे महात्म्ये विद्वानच नाही तर संत ठरले
जय मुक्ताई👏👏👏
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment