˙˙जय मुक्ताई ..

Thursday, 20 October 2016

कठीण योगाहूनी क्षेम

कठीण योगाहूनी क्षेम
देवमाता अदितीचा पुत्र इद्रंदेव
स्वर्गलोकीचा राजा
दैत्यराज पुलोमाची सुपुत्री शचीमाता म्हणजे इद्रांणी
देवंताचे गुरू बृहस्पती
एकदा गुरू बृहस्पती इद्रंदेवांवर काही कारणाने नाराज झाले
तेव्हाच वेळ साधुन असुरांनी देवलोकावर अकस्मात आक्रमण केले असता ब्रम्हंदेवांकड़े मदत मागण्यासाठी इद्रंदेव गेले असता ब्रम्हंदेवांनी इद्रंदेवाला एका परिपूर्ण ब्रम्हंज्ञानीची सेवा करण्यास सांगितले
यामुळे आपणास विजयश्री प्राप्त होईल
ब्रम्हंदेवाचे कथनानुसार इद्रंदेवानी त्या ब्रम्ह्ज्ञानीची सेवा सुरु केली
परंतु त्यांच्या लक्षात आले की ये ब्रम्हंज्ञानीचे माता पिता असुर आहेत व या ब्रम्हंज्ञानीचे पण आसुरावर प्रेम आहे
त्यामुळे इद्रंदेवाद्वारे केलेली सेवा व होमहवन सर्व असुरांना मिळू लागले
यामुळे इद्रंदेवाची सेवा भंग झाली
इद्रंदेवांनी क्रोधित होऊन त्या ब्रम्हंज्ञानीची हत्या केली
अशारितीने


इद्रंदेवाकड़ून ब्रम्हंहत्या घड़ल्यावर ति ब्रम्हंहत्या भयानक दानव रूपात प्रगट झाली व पाठलाग करू लागली
ब्रम्हंहत्या घड़ल्यामुळे इद्रंदेवाला इद्रंपद सोड़ावे लागले
आता इद्रंपद रिकामे झाले होते
मृत्युलोकांत चद्रवंशातील राजा पुरूरवाचा नातू नहुषु राजाने बिनचूक शभंर यज्ञ केले होते
इद्रंपदावर योग्य व्यक्ती असावी म्हणून सर्व देवतांनी धर्मात्मा नहुषु राजाची नेमनुक केली
नहुषु राजाला इद्रंपद भुषवण्याचा योग आला
आता नहुषु राजा इद्रंपदी विराजमान झालेवर सर्व ऋषी व गधंर्वाकड़ून शक्ती मिळाली व स्वर्गीय भोग प्राप्त झाले
एक दिवस अकस्मात नहुषुची दृष्टी साध्वी शचीमातेवर पड़ली
शचीमातेच सौंदर्य बघून नहुषु कामाधं झाला व तिला प्राप्त करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करू लागला
नहुषुची वाईट नजर बघून साध्वी शचीमाता म्हणाली
महाराज
आपण मला नेण्यासाठी असे वाहन आणावे की जे आजवर कोणीही वापरले नाही
म्हणतात ना
कामातुरा भय,लाज, ना विचार!

शरीर असार तृणतुल्य!!
खूप विचार केल्यावर नहुषुला ऐक कल्पना सुचली
त्याने ऐक पालखी ठरवली व त्या पालखीला भोई म्हणून ऋषी मुनींना लावले
ते राजास पालखीतुन घेऊन जात होते
परंतू
या कामांध झालेल्या राजाला इतकी घाई झाली होती की
तो ऋषींना झपाझप चला म्हणून सांगु लागला
असंही सागितंले जाते की नहुषु राजा ऋषींना पालखीत बसून मारू पण लागला
ऋषीवर क्रोधीत झाले
ते म्हणाले
याला इतकी घाई झाली आहे
हा कुठे चागंल्या कामासाठी चालला आहे
राजाची घाई वाढतच गेली
शेवटी ऋषी क्रोधीत होऊन नहुषु राजाला शाप देतात
तु सर्प होशील
माऊली ज्ञानोबाराय म्हणतात
नहुषुचा इद्रंपदी बसण्याचा फक्त योग आला पण क्षेम नाही झाला
नहुषु स्वर्गाधिपती जाहला!

परी राहाटी भांबावला!
तो भुजंगत्व पावला !
नेणसी कायी!!
म्हणून
कठीण योगाहूनी क्षेम!वमलिया होय श्रम
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment