🌺|| श्री विठ्ठल ||
विशेषें आचरावें | लागे संती ॥
भगवान श्रीकृष्ण व्यक्तींच्या आचरणाबद्दल सांगतांना गीतेमध्ये म्हणतात की,
यद् यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥
श्रेष्ठ पुरुष जे जे कर्म आचरण करीतात तेच कर्म इतर लोक करीतात आणि तो पुरुष जो प्रमाण ठरवितो त्याचेच लोक अनुकरण करतात.
याच श्लोकावर भाष्य करतांना माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की,
एथ वडील जें जें करिती ।
तया नाम धर्मु ठेविती ।
तेंचि येर अनुष्ठिती ।
सामान्य सकळ ॥
हे पटवुन देतांना
माउली ज्ञानोबाराय एक दृष्टांत देतांना म्हणतात की,
मार्गीं अंधासरिसा ।
पुढे देखणाही चाले जैसा ।
अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा ।
आचरोनि ॥
आंधळ्यांच्या रांगेतील पुढारी डोळस मनुष्य जसा त्यांच्याप्रमाणेच मार्ग चालतो त्याचप्रमाणे ज्ञान्यांनी स्वतः धर्माचे आचरण करुन अज्ञानी जनांस मार्गास लावावे .
ज्यांना वैकुंठधामाची प्राप्ती करावयाची असेल त्या राजाने आपल्या प्रजेला, गुरुंनी आपल्या शिष्यांना आणी आई वडीलांनी आपल्या मुलाला असाच उपदेश करावा.
जर ते अज्ञानामुळे अशा उपदेशानुसार न वागता काम्य कर्मच परम पुरुषार्थ मानत असतील तर, त्यांच्यावर न रागावता त्यांना समजावुन सांगुन त्यात प्रवृत्त होऊ देऊ नये. जो मनुष्याला भगवद्भक्तीचा उपदेश करुन मृत्युच्या फासातुन सोडवत नाही,
ते गुरु गुरु नव्हे,
स्वजन स्वजन नव्हे,
पिता पिता नव्हे,
माता माता नव्हे ,
देव देव नव्हे आणी
संत संत नव्हे.
म्हणुनच माउली ज्ञानोबाराय म्हणतात,
हें ऐसें असे स्वभावें ।
म्हणोनि कर्म न संडावे ।
विशेषें आचरावें ।
लागे संती ॥
जय जय मुक्ताई 👏👏👏
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment