˙˙जय मुक्ताई ..

Sunday, 30 October 2016

फटाक्यांची आतषबाजी

फटाक्यांची आतषबाजी
दिवाळीची चाहुल लागते ति घराघरात साफसफाई सुरु झाली की.
अंतर्बाह्य सफाई झाली की मुलाबाळांना नवनवीन कपड़े खरेदी केले जातात
घराघरात नानाविध पदार्थांचे सुगंध दरवळु लागतात
घरासमोर
दिव्यांची आरास बघायला मिळते
विविध रंगी उंचावर बांधलेले आकाशकंदील सर्वांचे लक्ष वेधुन घेतात
परंतु
दिवाळीचा खरा आनंद असतो तो म्हणजे आतषबाजी
फटाक्यांची लड़ी
याला लड़ी किंवा सर म्हणतात
हि लड़ी 50/100 ते 1000 फटाक्यांची सुद्धा असते
किंवा
यापेक्षा कितीतरी मोठी असु शकते
आपल्या मधात लपून बसून पुन्हा आपल्यावरच हुकूमत गाजवणारे दुराग्रहाचे वा चुकीच्या सवयीचे हे जणु प्रतीकच!
सदगुरू कृपेचा स्पर्ष होता क्षणीच एका मागून एक प्रतिकाराचे आवाज काढत ही सर जळून जाते
तरीही यातील काही फटाके बाजूला उड़ून शिल्लक रहातात
त्यांना शोधून शोधून पुन्हा प्रत्येकाला पेटवावे लागते
तेव्हा
जळताना प्रतिकाराचा आवाज,मान्यतांचा दुर्गंध व अधंश्रद्धेचा धुर निघतो
आता मात्र सपुंर्ण विकार जळाल्यामुळे उरतो तो फक्त निर्मुख आनंदच
हवाई बाण
हे जेंव्हा आकाशात उंच उड़तात
तेव्हा प्रत्येकाच्या मनात दड़ुन बसलेले मोह,लोभ,कल्पना,मत्सर,विचार,महत्वाकांक्षा ,स्पर्धा व इच्छित मिळवण्यासाठी केलेल्या लटपटी,कपटाने हे सारे आप आपले रंग उधळून दाखवतात
मायेच्या या जगाचे रंग मनाला थोडावेळ का होईना भुरळ घालतात
परंतु
जेंव्हा अज्ञान नाहीसे होते तेव्हा मात्र या उधळेल्या रंगातच एकरुप होत अवघा रंग एक होते
याच प्रतिक म्हणजे हवाई बाण
अॅटमबाॅम्ब
हा एकदाच फुटतो त्या नतंर कशाचच अस्तित्व शिल्लक उरत नाही
तेव्हा सदगुरू कृपेने समज होते की अस्तित्व शाश्वत नसून सपुंर्ण विश्वच शुन्यात आहे
सर्वच अॅटमबाॅम्ब उड़वून झाल्यावर समज येते की आजवर मान्यंताच्या वा कर्मकांडाच्या दड़पणाखाली आम्ही किती काळ वाया घालवला
हि समज यायला योग्य वेळ यावी लागते
एकदा का ति योग्य वेळ आली कि सदगुरू कृपेची एक ढिनगी पड़ायचा उशीर की अज्ञानाची,मान्यंताची व खोट्या कर्मकांडाची राख व्हायला किती वेळ लागेल?
मग उरते ति आकाशातील सुदंर शोभा व असीम अशी आतंरीक शांती
सुदर्शन (भुईचक्र)
भगवान परमात्माच्या हस्तावरील बोटाची शोभा म्हणजे सुदर्शन चक्र
आतशबाजीतील
हे निर्जीव चक्र वात पेटवल्यावर स्वतः भोवतीच गोलगोल फिरते
हे जणु अज्ञानी जीवाला संदेश देत आहे की जे काही आहे ते तुझ्यातच आहे
पृथ्वीही गोल आहे
तु परमात्माला कुठे कुठे शोधतोय
सदगुरू कृपेने फक्त तुझ्या शरीरातील आत्मज्योतीची वात पेटवून सोहं शब्दाचा नाद करत स्व आनंद घे
श्रद्धा व भक्तीचे प्रेम उचंबळून येईल

धन्यवादाचे गोलगोल अभिव्यक्ती नृत्य करू लागशील
मग बघ नेत्रदिपक,प्रसन्न व आश्चर्यचकीत करणारी चेतनेची प्रकाश फुले चौफेर वर्षाव करतील
चद्रज्योत
दिव्य व शांत सप्तरंगाची बरसात करणारी ही ज्योत
उच्च चैतन्याचे स्तोत्राचे दर्शन घड़वीते
किती निरागस सप्तरंगातील ही ज्योत जणु आपल्यावर सदगुरू कृपेचा अमृतवर्षाव झाला आहे
याचाच संकेत देत असते
किती शितलता असते या ज्योतीत
प्रेम व आनंदाची आणि मौनाची बरसात होते
कसला मोठा आवाज नाही
धागंड़धिगां नाही
जसा लोखंडाला परीस स्पर्श झाला आहे व त्याचे सोने झाले आहे आणी आता उरलेय ते फक्त जगाला आनंद देणे
या आत्मानंदातच सदगुरू चरणी लिण होत समर्पणाची भावना
आणी
या मंगलमयी भावनेतून शांतपणे सदगुरू प्रती ध्वनी उमटतो
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
दुराग्रहाची लड़ी पेटवून,विचारांच्या हवाई बाणांना ओळखुन,समजेचा अॅटमबाॅम्ब लावून स्वदर्शन घड़वणारे अंतर्यामी सुदर्शन चक्राची जादु तर अनुभवत आयुष्यात निरंतर तेवत राहणारी सदगुरू कृपेची शितल शांत चंद्रज्योत ओळखावी
मग
आनंदी आनंदच
नाहीतर प्रत्येक दिवाळीत हजारो रूपयाचे फटाके फोडून कितीही जगाला शक्ती प्रदर्शन दाखवायला आतषबाजी केली तर क्षणभर भौतिक आनंद वाटेल मग पुन्हा अंधारच की
सदगुरू कृपेने अंतर्मुख साधना करत करत आत्मज्योत चद्रंज्योतीप्रमाने अविरत प्रकाशीत राहो
हिच भक्तिमय सदिच्छा
चैतन्याचा जिव्हाळा परिवार
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment