˙˙जय मुक्ताई ..

Thursday, 6 October 2016

तोची संत साधु ओळखावा निका

तोची संत साधु ओळखावा निका

स्नान कोणते?
-निर्मळ राहणे
अमंगल कोण?
-ज्यांचे मन गढूळ
शहाणा काय मिळवतो?
-अढळपद
मुर्खाची गती काय?
-नरक
भलेपणा कोणता?
-सर्वांशी मिळुन राहणे
बुरा कोणता?
-विश्वाचा वैरी तो बुरा
तपस्वी कोण?
-सत्य दृढ धरतो तो
अतपस्वी कोण?
-जो लबाडी करतो
मर्द कोण?
-इद्रियंजय करणारा
नामर्द कोण?
-इद्रियांचा गुलाम होणारा
बोध कोणता?
-समबुद्धी
अबोध कोणता?
-विषम पाहणे
धर्मी कोण?
-दयाळू
अधर्मी कोण?
-सर्वांशी कठोर तो
संन्याशी कोण?
-कल्पना निमाली तो
संसारी कोण?
-मोहपाशात गुतंतो तो
उदार कोण?
-माझे काहीच नाही असे मानणारा
संत साधु कोण?
-सर्वाभुती पाहे एक वासुदेव
"तोची संत साधुसंत ओळखावा निका"
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment