˙˙जय मुक्ताई ..

Friday, 7 October 2016

मार्गी आदिमाया पुजिली आनंदी

मार्गी आदिमाया पुजिली आनंदी
   नाशिकपासुन चाळीस मैलावर वणी नावाच्या गावी सप्तशृंग असलेल्या पर्वतावरील एका कपारीत आपल्या भक्तांकरीता उभी असलेली हि अष्टदश भुजांची जगजननी
नवनाथांना प्रेरणा देणारी हिच आद्यशक्ती
म्हणूनच हिला नवनाथांची कुलस्वामिनी असे संबोधले जाते
याच शिवशक्ती सप्तशृंगीमातेला मछिद्रंनाथ गोरक्षनाथ अनन्य शरण गेले असता श्री सप्तशृंगी मातेच्या ह्रदयमंदिरातून एक हसर, गोजीर, वृतीत नसलेले, गोड़, गोड़ंस, अत्यंत प्रेमळ व ज्ञानयुक्त असे रूप प्रगट झाले
ते गोड़ रूप म्हणजे
'बालासुदंरी'
पुर्णचंद्रासारखी विलोभनीय मुखशोभा , प्रेमाचे झरे ओसंडून वाहत आहेत असे दोन्ही सतेज नेत्र,संपूर्ण मुखकमल मातृभावाने विकसलेले,केसांवर व चेहरेवर सोनेरी रंगाची चमक,समृद्ध असा केशकलाप,हलदि कुकंवाचा मस्तकी तिलक,गाईच्या दुधाने भरलेला कलश,हिरव्या रंगाचा चुड़ा ल्यालेले गौर उभय हस्त, सुदंर कमलाची माला धारण केलेली,कटी मेखला,पायी पैंजण व अंजिरी वस्त्र परिधान केलेले रूप सप्तशृंगीच्या ह्रदयमंदिरातून बाहेर पड़त मंछिद्रनाथ व गोरक्षनाथासमोर उभे राहिले
ते बालासुदंरी रूपात
शिव व शक्तीच्या पलिकडील ज्ञान ज्यांना प्राप्त झाले ते भगवान दत्तात्रय
नाथ परंपरेच श्रीगुरू
श्रीगुरू देवांच्या आज्ञेवरून
मछिद्रंनाथ व गोरक्षनाथांनी याच सप्तशृंगी निवासीनी समोर ज्ञान प्राप्तीसाठी अनुष्ठाने केली

सप्तशृंगी मातेने नाथांना प्रसन्न होऊन शाबरी विद्येसह सर्व शक्ती प्रदान केल्या
जीवाशीवाची भेट घालून देणारी हि नाथ सप्रंदायातील शाभंवीविद्या
यातूनच पुढे नाथ सप्रंदाय उर्जित अवस्थेला आला

नाथसप्रंदायातूनच पुढे संतपरंपरा निर्माण झाली
हि सप्तशृंगी निवासीनी माता श्री विठ्ठलपंताच्या घराण्याची कुलस्वामिनी
निवृत्तीनाथ,ज्ञानेश्वर,सोपान व मुक्ताई या चारही भावंडांनी येथे काही दिवस वास्तव्य करून
सप्तशृंगीलागी केली प्रदक्षिणा
हिच सप्तशृंगीनिवासीनी साधनेतील सातव्या चक्रावर वास्तव्य करून असते
नामदेव महाराज वर्णन करतात
मार्गी आदिमाया पुजिली आनंदी!

म्हणती धन्य मांदी वैष्णवांची!!
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।

No comments:

Post a Comment