˙˙जय मुक्ताई ..

Thursday, 20 October 2016

विनयेन यथा ज्ञान

विनयेन यथा ज्ञान
    भोज राजाच्या पदरी माघ नावाचे कवी होते
त्या कविवर्यांना आपल्या कवित्वाबद्दल फारच अभिमान होता
ते माघ कवी व भोजराजा ऐकदा सहजच वनात फिरायला गेले असता वाट चुकले पुढे दुरवर चालत गेल्यावर त्यांना ऐक झोपड़ी दिसली
झोपड़ी बाहेर ऐक वयोवृद्ध आजीबाई चरख्यावर सुत काढत होत्या
माघकवी ऐटीत त्या आजीबाईनां विचारतात
ये म्हातारे!
हा समोरचा रस्ता कुठे जातो?
त्या दोघांकडे न बघताच म्हातारी म्हणाली
महाशय


हा रस्ता कुठेच जात नाही यावरून मानस व पशु ये जा करत असतात
माघ कवी एकदम चपापले
म्हातारी विचारते
आपन दोघे कोण आहात?
कवि म्हणाले
आम्ही दोघे यात्रेकरू आहोत
म्हातारी म्हणाली
जगात चंद्र व सुर्य हे दोघेच यात्रेकरू आहेत
आपन दुसरेच कोणीतरी आहात
तेव्हा स्वतःला सावरत माघकवी म्हणाले
आम्ही क्षणभंगुर जीव आहोत
तेव्हा म्हातारी म्हणाली
क्षणभंगुर तर धन व यौवन या दोनच गोष्टी आहेत
आपन कोण आहात?
थोड़ा अभिमान जागृत होत माघकवी म्हणाले
आम्ही दोघे राजे आहोत
म्हातारी म्हणाली
शास्त्रात दोनच राजे सागितंले आहे देवराज इद्रं व यमराज
आपन दुसरेच कोणीतरी दिसता?
तेव्हा कविवर्य म्हणाले
आम्ही क्षमा करणारे आत्मे आहोत
तेव्हा म्हातारी म्हणाली
जगात क्षमा करणारे दोनच आहेत पृथ्वी व आई
तेव्हा माघकवी म्हणाले
आई आम्ही दोघेही तुमच्या ज्ञानापुढे हरलो
तेव्हा म्हातारी म्हणाली
जगात फक्त दोघेच हरतात कर्जबाजारी व चारित्र्यहिन
आता कविवर्य माघ मात्र बोलायचे बदंच झाले होते व भोजराजा शांतपणे हे सर्व बघत स्मित हास्य करत होते
म्हातारी पुन्हा म्हणाली
कविवर्य
मी आपणास ओळखते
ज्ञानाचा इतका अभिमान बरा नोहे
कारण
अभिमान नरकात घालतो
आणी
ज्ञान हे विनयामुळेच शोभुन दिसते
विनयेन यथा ज्ञान
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment