˙˙जय मुक्ताई ..

Friday, 21 October 2016

या नाम साधू

या नाम साधू
     भगवान वेदव्यासांचे अवतार जयदेवजी एका निर्जन जगंलातुन जात होते थोड़ीशी संपत्ती जवळ होती
चार चोरांनी जयदेवांना लुटून संपत्ती हरण केली व त्यांचे हात पाय तोडून अंधारातच ऐका विहीरीत टाकून चोर निघून गेले
दैवयोगाने उन्हाळाचे दिवस असल्याने विहीरीत पाणी न्हवते जयदेवजी त्याही अवस्थेत विहीरीत भजन करत राहीले
पुढे काही दिवसानंतर त्या देशीचा राजा वनात शिकारीसाठी आला तेव्हा भजन ऐकायला आले
शोध घेतला असता दिव्य तेजपुंज साधू जयदेवजी दिसले
राजाने त्यांना विहीरी बाहेर काढून आपल्या नगरीत नेले
जयदेवजी भगवद् कथा करू लागले त्या राजाने जयदेवजीकरवी अनुग्रह घेत त्यांना आपले गुरू केले
एक दिवस जयदेवांना राजाने प्रश्न विचारला सर्वात मोठे पुण्य कोणते? जयदेवजी म्हणाले
साधुचा सन्मान करणे यासारखे श्रेष्ठ पुण्य जगतात दुसरे नाही
या जयदेवजींच्या संत वचनावर विस्वास ठेवत राजा साधुचा उचित सन्मान करू लागला
एक दिवस चार चोर साधु वेशात त्या नगरीत आले
हे चार चोर म्हणजे ज्यांनी जयदेवजीचे हात पाय तोडून विहीरीत टाकले तेच हे चार चोर
जयदेवजी राजाला म्हणतात
राजे साहेब!
या चार साधूंवर त्यांच्या सदगुरूची विशेष कृपा आहे
आपन त्यांचा योग्य सन्मान करावा
चार मोठे साधू अनायासे आपल्या नगरीत आलेले बघून राजाने त्यांचा उचित मानसन्मान केला
परंतु
राजा जयदेवजी समोर त्या साधू वेशातील चोरांचा सन्मान करत असताना अचानक जमिन दुभंगली व चारही चोरांना भुमिने आपल्या पोटात घेतले
हे दृष्य बघत असताना जयदेवांचे साधू ह्रदय कळवळले
त्यांनी भगवान परमात्माचा धावा केला
भगवान प्रकट झाले
जयदेवजी म्हणाले
भगवान!
तु तुझ्या शत्रूंना मोक्षप्राप्ती देतो

माझ्या शत्रूंना नरक का?
तेव्हा भगवान म्हणाले
जयदेवा!
माझ्या भक्तांचा कोणीही अपराध केला तर मला सहण होत नाही
यांनी तुमचे हात तोडून विहीरीत टाकले


जयदेवजी भगवंताला म्हणतात
प्रभू!
यांनी माझे फक्त हातपायच तोड़ले
याचीं चौघाची माझ्यावर विशेष कृपा आहे म्हणून तर मी जिवंत आहे व आपले भजन करू शकतो
भगवन्
आपन कृपा करावी

या चौघांनाही मुक्ती द्यावी
भगवान परमात्मानी जयदेवांचे सागंण्यावरून त्या चौघांनाही मुक्ती दिली
या नाम साधू
माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात
अगा वरी फोड़ावयाचि लागी !
लोहो मिळो कां परिसाचिये अंगी!
का जे मिळतिये प्रसंगी!
सोनेच होई!!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment