तुझ्या नामाचा महिमा तुज न कळे मेघश्यामा।
भक्तांकरीता भगवंतांचे नाव किती सुंदर आहे! सृष्टीतील सुंदरता ही त्याच्या नावाच्या सुंदरतेपुढे काहीच वाटत नाही.त्या मेघश्यामाचं नाव इतक गोड आहे की, त्याचा आमच्या जीवनावर अद्भुत परिणाम होतो. हा भगवंतांच्या नावाचा महिमा भक्त जाणत असतो. पण खुद्द परमात्माच यापासून अनभिज्ञ असतो. म्हणून तर भक्ताला नामस्मरणाशिवाय दुसरे काही आवडत नाही आणि त्यामुळेच नरदेहाचा जन्म प्रिय आहे तो याचसाठीच भले यात गर्भातील यातना असतील. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी तुझ्या नावाचा महिमा तुला कोठून कळणार?
कुमुदिनी काय जाणे तो परिमळ।
भ्रमर सकळ भोगितसें।
तैसें तुज ठावें नाही तुझे नाम।
आम्हीच तें प्रेमसुख जाणों।
भगवंतांच्या नांवात काय शक्ति आहे,काय प्रेम आहे, ते भगवंतांला माहीत नाही; पण त्याच्या भक्तांना माहीत आहे.
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment