˙˙जय मुक्ताई ..

Monday, 3 October 2016

तेथे असे देव उभा

 तेथे असे देव उभा

    रामेश्वरी भरलेल्या शिवरात्रीच्या यात्रेला उत्तरप्रदेशातुन एक हरिद्वारचा व दुसरा गौड़देशचा अशे दोन तिर्थवासी यांची भेट झाली. गौड़देशच्या यात्रेकरूला जन्मभुमी व्यतिरिक्त व या सृष्टीत भगवंताशिवाय कोणीही न्हवते. दुसरा हरिद्वारचा गृहस्थी होता. दोघांची मैत्री झाली व एकत्रीत तिर्थयात्रा करत करत पुढे दोघे मथुरेला आले. तिथे अचानक तो  कल्याण नावाचा गृहस्थी अचानक आजारी झाला. तो मित्राला म्हणू लागला मथुरेसारख्या पुण्यदायी तिर्थक्षेत्रात येऊन वास केला तरी शरीर भोग काही सोड़त नाही. तेव्हा तो ब्रह्मचारी मित्र त्याला म्हणाला. चंद्रासारख्या अमृत प्राशन करणारेंना देखिल क्षयरोग लागला मग आपल्या सारख्या मर्त्य जगात वावरणारेंची काय कथा? असे समजावत त्यांने आजारी पड़लेल्या मित्राला तशेच सोडून न जाता सहा महिने त्याच्या बरोबर राहून त्या मित्रांची सेवा केली. पुढे तो मनुष्य आजारपणातुन बरा झाला. आपल्याला कांता, पुत्र, कन्या असुनही कोणीही उपयोगी आले नाही या मित्राचे खुप आपल्यावर उपकार झाले
यातुन उतराई व्हावे म्हणून त्याने आपली उपवर कन्या या ब्रम्हंचारीला द्यावी असे त्याच्या मनात आले. मित्रांना तसे त्याने बोलुन पन दाखविले
ब्रम्हंचारी मित्रांने विरोध दर्शविला. मला घर दार जमीन गाड़ी बंगला काहीही नाही. मी फक्त देवाचा आहे. व देव माझा आहे. हा गृहस्थी अड़ूनच बसला
तुला माझी कन्या देऊन उतराई होणार म्हणून.. ब्रम्हंचारी म्हणाला, हा तुमचा निर्णय तुमच्या घरच्या लोकांना नाही आवडला तर? तेव्हा त्या गृहस्थीने ते मथुरेत उतरले होते तेथे भगवान श्रीकृष्ण मंदीराच्या महाद्वारात जाऊन ब्रम्हंचारीचे हातावर कन्यादानाचे उदक सोड़ले. पुढे तिर्थयात्रा करत करत ते गृहस्थीच्या गावी म्हणजे हरिद्वारला पोहचले. घरी आल्यावर पत्नीला त्याने मी तिर्थयात्रेत आजारी पड़लो व या माझ्या मित्राने माझी खुप सेवा केली. याला या सृष्टीत भगवंताशिवाय कोणीही नाही. मी याच्या सेवेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपली कन्या या ब्रम्हंचारीला देण्याचा मानस आहे. आपल्या पतिचे हे शब्द ऐकताच गृहस्थीच्या धर्मपत्नीने महाकालिचा अवतार धारन केला. पतिला म्हणू लागली,
"एखाद्या पुण्यक्षेत्रात मरन येण्यासाठी स्वतःचे पदरी तितके भाग्य असावे लागते, मी माझी कन्या या भिकारीच्या स्वाधीन करण्यापेक्षा तिला तशी अविवाहित ठेवीन..."  
    शेवटी त्या गृहस्थीच्या मोठ्या मुलांनेही या विवाहास विरोध दर्शविला. तो गृहस्थी शेवटी आपल्या घरच्यांच्या विरोधात न्याय मागण्यासाठी हरिद्वारच्या राजदरबारी गेला. राजाने याचे म्हणणे ऐकून घेतले व तुम्हा दोघा उभय मित्रमध्ये तिसरा कोणी साक्षीदार असेल तर घेऊन या तुम्हाला न्याय निश्चित मिळेल. या दोघां मित्राने राजाला सांगितले
आम्ही पुरान प्रसिद्द पुरूष दगड़ाच्या भगवान श्रीकृष्ण मुर्तीला साक्ष ठेवत सकंल्प सोड़ला होता
राजाला या दोघाच्या बोलण्याचे हसू आले. परंतु
हि बाब त्या ब्रम्हंचारीला फारच जिव्हारी लागली
तो हरिद्वारवरून पायी मथुरेला आला. आणी भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीपुढे सर्व वृत्तांत सांगू लागला. रात्री भगवंताने त्याला दृष्टांत दिला
मी तुझी साक्ष देण्यासाठी हरिद्वारला येतो
परंतु, तु पुढे चाल व मी तुझ्या मागुन चालतो
रस्त्याने जाताना तु मागे वळुन बघू नकोस
तु जिथे मागे बघितले की मि तिथेच मुक्काम करील. सकाळी तो ब्रह्मचारी हरिद्वारच्या दिशेने प्रवास करत निघाला. दगड़ाची मुर्ती चालू लागली
 अगदी हरिद्वार जवळ अर्धाकोस आल्यावर त्याचे मनात सशंयाची किचितंसी कल्पना आली. राजासमोर जायचे आहे. म्हणून त्याने मागे वळुन बघितले तर हरिद्वार पासुन अर्धाकोस दुर भगवान श्रीकृष्ण मुर्ती तिथेच थांबली. तो भगवंताची माफी मागून राजाकड़े जाऊन सांगू लागला. अंबरिषाच्या कैवाराने दुर्वासाचीही प्रतिष्ठा राखली नाही तो भक्त कैवारी भगवान परमात्मा आपल्या भक्तांकरीता साक्ष देण्यासाठी आला आहे. भगवान श्रीकृष्ण मुर्तीरूपाने मथुरेवरून साक्ष देण्यासाठी आला आहे. असे राजाला सांगितले. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. नवलाईची बाब म्हणून राजासह प्रजाजनांना व त्या गृहस्थीचा परिवार त्या पुराणपुरूष भगवान श्रीकृष्ण मुर्तीपुढे येऊन उभे राहिले. त्या ठिकाणी मथुरेतील चतुर्भुज मुर्ती पाहून राजासह प्रजाजन सदगदित झाले. लक्ष्मीपतिच्या सत्कारासाठी तेथे अनेक विद्वान प्राप्त झाले. राजाने आपल्या स्वखर्चाने दोघांचा विवाह लावून लग्नसोहळा पार पाड़ला. साक्षिकरीता प्राप्त झालेली प्रभू श्रीकृष्ण मुर्ती तिथे हरिद्वार पासुन अर्धाकोसावर कायमची राहिली. 
   अशी असते भक्ताची महती. आपल्या भक्तीसामर्थ्याने भगवान श्रीकृष्णास चालावयास लावत तो दगड़ाचा देव हाड़ामासाच्या भक्ताकरीता
"धावे चाले मागे मागे"
  मथुरेहून चालत आला, पुढे मथुरेत तेथील भक्तांनी नवीन मुर्ती स्थापन केली इथे ति श्रीकृष्ण मुर्ती उत्तरदेशात कुण्यातरी भक्ताची वाट पहात हरिद्वारात आजही
"तेथे असे देव उभा"
   याकरिता संत महात्म्ये म्हणतात
सहज त्यांच्या ऐकता गोष्टी |
परमार्थ चित्ती दृढवेल ||
जय मुक्ताई
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/ 
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:

Post a Comment