विरहणी
साधकाच्या जीवनात अशी एक अवस्था येते की ज्या वेळीं त्याला ईश्वराचा तीव्र वियोग वाटू लागतो.व्यावहारिक भाषेमध्ये म्हणजे जगाच्या लेखी त्याचे वर्णन करणें अशक्यच आहे.तरीही मनुष्याच्या समजुतीसाठी समाधानासाठी काहीतरी भाषा वापरावयाची म्हणून विरहासक्तीच्या भाषेत तो अनुभव मांडला जातो.आणि या अवस्थेत भक्तांला जगतामधली सर्व शीतलता ही तापदायक वाटू लागते.गोड असणारे पदार्थ कडू लागतात.माऊलींच्या सहित अनेक संतानी आपला हा अनुभव अभंगातून जागतासमोर मांडला त्यालाच विराणी म्हणजे विरहणी आसे म्हटले जाते. परमेश्वर हा आपला प्रियकर आहे आणि आपण त्याची प्रेयसी आहोत त्याची भेट झाल्याशिवाय आपल्याला शांती मिळणार नाही ही भावोत्कट अवस्था संतांनी विरहणीच्या रूपानं व्यक्त केली आहे.
माऊलींची,
घनु वाजे घुण-घुणा,वारा वाहे रूण-झुणा।
भवा-तारकु हा कान्हा,वेगीं भेटवा कां।
माऊलींनी आपला अनुभव सांगताना म्हणतात- देहाकडे पहावें तर कधी काहीच दिसत नाही.कधी भलतेच दिसते.आणि कधी देहाच्या जागीं देवाचेंच रूप दिसू लागते.कधी शून्यता,कधी भ्रांति,कधी उत्कंठा अशी ही विचित्र दशा आहे.ही साधकाच्या जीवनातली विरहासक्ती माऊलींनी वर्णन केली आहे.
पडिले दूर देशीं मज आठवे मानसी।
नको हा वियोग कष्ट होताती जीवासि।
माऊली अजून एका ठिकाणी म्हणतात,देवा,तुझा वियोग आता मला असह्य आहे.
साधकाच्या जीवनातली ही अवस्था त्याची ईश्वराप्रती असणारा प्रेम- भाव व्यक्त करते.
शुभ संध्या
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment