तो हा नाथ संकेतीचा दंशु
आपल्या स्वतःच्या मुलांनी व नातवंडांनी हाकलून दिलेला सुरथ नावाचा राजा शाश्वत सुखाच्या लालसेपोटी सातपुड्यात सुमेधा नावाच्या ऋषींच्या आश्रमात आला. त्या राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सुमेधा ऋषीनी साकार व निर्गुण निराकार शक्तीचे ऐकत्रिकरण करून प्रथम साधनेसाठी घटयंत्र तयार केले. याचा उपयोग जीवनात व्हावा म्हणुन हे तयार केलेले घट यंत्र
पुढे तंत्र यंत्र सिद्ध होण्यासाठी काही मंत्राची रचना ऋषींनी केली. ह्या तंत्रमंत्राच्या शक्तीतून ऋषीमुनींना घटासबंधी एक नविन शोध लागला
हिच परंपरा नाथ संप्रदायाने स्विकारत तिचा पुढे विस्तार केला. तो विस्तार म्हणजेच,
क्षीरसिधु परिसरी |
शक्तीच्या कर्णकुहरी |
नेणो कै त्रिपूरारी |
सागितंले जे ||
हिच परंपरा पुढे मंच्छिद्रनाथांनी मत्सरूपात श्रवण केली पुढे,
तो मत्सेद्रं सप्तशृंगी |
भग्नावया चौरंगी |
भेटला की तो सर्वागी |
संपूर्ण जाला ||
योगेश्वर मंछिद्रनाथ व योगमुर्ती गोरक्षनाथांनी सखोल अभ्यास करून महान मंत्रशक्ती निर्माण केली. याचे एक स्वतंत्र शास्त्र निर्माण झाले ते म्हणजे शाभंवीविद्या या शाभंवीविद्येची तिन मुख्य दैवते म्हणजे महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तिन्ही देवंताची अनेक रूप आहेत. त्यांचे वास्तव या घटात असते. आज नवरात्रीत हेच घट हे माध्यम घरोघरी दिसते. तो मातिचा घट व आपला शरीररूपी घट यात साम्य आहे. नाथंसप्रदायाने सुरु केलेली हि परंपरा म्हणजे,
जे पिड़ीं तेच ब्रम्हांड़ी
स्थापित घटाच्या खाली माती असते, वर कुभं(घट) आहे, त्यावर श्रीफळ आहे
व वरती नऊ पर्णाची माळ सोड़लेली असते, तदवत् या धरतीरूपी मातीवर देह आहे, देहावर मस्तक आहे, देह म्हणजे कुभं श्रीफळ म्हणजेच मस्तक, व नऊ पर्णाची माळ म्हणजे जणू आपला पृष्ठवंशरज्जू आणि त्याठिकाणी असलेले नऊ पुजंके घटापुढिल दिप म्हणजे ह्रदयातील तेवत असलेला ज्ञानदिप, या घटाखालील काळ्यामातीकड़े फक्त माती म्हणून पाहू नये
तर ती कालीशक्ती आहे, याच मातीत पुढे नऊ दिवसांत हिरवेगार अंकुर प्रगट होणार आहे
तेच लक्ष्मीचे रूप आहे, त्या हिरव्यागार रोपातुनच माता सरस्वतीचे दर्शन होते, म्हणजे लक्ष्मी व सरस्वतीचे अधिष्ठान हि कालीशक्ती आहे.
सृष्टीत जमीन व पाणी निर्माण झाले तेव्हाच कालीशक्तीचे अवतारकार्य सुरु झाले. सुर्यशक्तीने पाण्याची वाफ तयार होते, त्यातुन धुक्याची छटा निर्माण झाली, या वाफेतुनच अनेक जीव जंतू निर्माण झाले, भगवान महाविष्णू निद्रिस्त असताना नाभीकमलातून ब्रम्हंदेवाची उत्पती झाली
व भगवान महाविष्णूच्या अंगातून ताम्रवर्णिय अशी एक शक्ती बाहेर पड़ली ति शक्ती म्हणजेच हि कालीशक्ती .
ऋषीमुनींच्या या घटाच्या परंपरेने हेच ज्ञान पुढे गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना दिले, गहिनीनाथांकरवी पुढे निवृत्तीनाथांना लाभले.
भगवान शकंराची पहिली शिष्या आदिशक्ती माता पार्वतीने मायानाथ रूपात व आदिशक्ती मुक्ताईच्या स्वरूपात माऊली ज्ञानोबारायांना ताटिचे निमित्ताने उपदेशीत किचितंसी क्रोधावलेली जमिन, भुसभूशीत केली व पुढे निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना हाच परंपरेचा मंत्रोपदेश केला असा नाथ परंपरेचा ,
पिड़े पिड़ांचा ग्रासु |
तो हा नाथ संकेतीचा दंशु|
परि दावुनि गेला उद्देशू|
महाविष्णू||
आज नवरात्री घटस्थापना दिवस, महान पर्वकाळ म्हणजे, त्रिवेणीसगंमच, व दुग्धशर्करा योग म्हणजे आदिशक्ती मुक्ताईचा प्रगटदिन व वारकरी सप्रंदायातील एक रत्न असलेल्या जगदगुरू तुकोबारायांच्या कृपापात्र शिष्या संत बहिणाबाई यांचा पुण्यतिथी सोहळा त्या निमित्ताने हा अल्पसा शब्दप्रपंच आईसाहेबांच्या चरणी अर्पण.
मस्तक हे पायावरी |
या वारकरी संतांच्या ||
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment