˙˙जय मुक्ताई ..

Sunday, 2 October 2016

संत मुक्ताबाई

संत मुक्ताबाई

   संत मुक्ताबाईंचा जन्म आश्विन शुक्ल प्रतिपदेला सायंकाळी झाला.तो दिवस शुक्रवार होता (शके १२०१) घटस्थापनेच्या दिवशी संत मुक्ताबाईंचा जन्म असल्यामुळे त्यांना आदिशक्तीचा अवतार मानू लागले.



शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेवो पाही।
सोपान तो ब्रम्हा मुळ माया मुक्ताई।

  असं वर्णन संत कान्होपात्रांनी केलय.
ब्रम्हचित्कला मुक्ताबाई आदिशक्तीचा अवतार आहेत.
ब्रम्हमूर्ति संत जगी अवतरले।
उद्धरावया आले दीन जना।।
    असें या भावडांचे वर्णन करण्यात येते. वारकरी संप्रदायात आणि संतवाङमय परंपरेत संत मुक्ताबाईंचे स्थान विशिष्ट दर्जाचे आहे. बाराव्या शतकात कर्मकांड यामध्ये अडकलेल्या समाजात आपल्या अभंगवाणीने चैतन्याची एक फुंकर घालून नैतिकतेचे बळ दिले.समाजात विवेक,वैराग्य आणि अध्यात्म आपल्या हरिपाठातून संत मुक्ताईंनी अगदी सोप्या भाषेत सांगितले.माऊलींच्या निमित्ताने संपूर्ण जगाला ताटीच्या अभंगातून केलेला उपदेश तर आध्यात्मिक उंची गाठणारा आहे.संत निवृत्तीनाथ जरी  माऊलींचे गुरू असले तरी संत मुक्ताई या प्रेरक होत्या.संत मुक्ताईंनी माऊली ज्ञानोबारायांना ताटीच्या अभंगातून मूलभूत प्रेरणा दिलेली दिसते.
तुम्ही तरून विश्व तारा।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा।
   चांगदेवरायांना  उपदेश करताना संत मुक्ताई म्हणतात,
मुक्त होतास तो का बद्ध झालासी।
आपल्या बंधने आण बांधलासी।
    "चांगदेवा तू मुळातच मुक्त होतास मायेच्या बंधनात अडकल्यामुळे बद्ध झालास स्वतःला मायेत अडकवून घेतलेस.त्याच बंधनातून तुला मुक्त व्हावे लागणार. संत मुक्ताईंनी चांगदेवरायांना मूळ स्थानाचे महत्त्व समजावून सांगतांनाच समाजाला ही नामस्मरणाने मुक्त होण्याचा सोपा मार्ग हरिपाठातून दाखविला.
मुक्तपणे मुक्त मुक्ताई पै रत।
हरिनाम स्मरत सर्वकाळ।
   आज आदिशक्ती आईसाहेब संत मुक्ताबाई यांचा प्रगटदिन या अज्ञ जिवाची ही वाटचाल आईसाहेबांच्या कृपाआशीर्वादानेच सुरू आहे.
अवघ्या महाराष्ट्राच्या आध्यात्मिक,सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनपरिवर्तनास ज्ञान आणि भक्तीचा संगम घालून अनुकूल असे संतवाङमय देणाऱ्या,संत मुक्ताई, योगिनी, ब्रम्हवादिनी, आदिशक्ती आहेत. मुक्ताई जीवनमुक्त हा
संसार।हरिपाठे पारावर केला आम्ही।
वारकरी संप्रदायातील ब्रम्हचित्कला संत मुक्ताईंचा  आपल्या चैतन्याचा जिव्हाळा या पेजनी केलेला हा  छोटासा शब्दप्रपंच
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:

Post a Comment