˙˙जय मुक्ताई ..

Sunday, 2 October 2016

सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपा

सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपा

    अनेक जन्माच्या शेवटी फिरून नरदेहरूपी कुभं कालिशक्तीच्या कृपेने लाभला आहे. या कुभंरूपी ब्रम्हांड़ात आठ दिशांना अष्टदैवतेचे अधिष्ठान लाभलेले आहे. आणि नववे जे स्वरूप आहे तिला चित्ती असे म्हणतात,
पिंड़ी तेच ब्रम्हांड़ी
   या न्यायाने या अष्टदिशांची दैवते या शरीररूपी घटात अष्टांगाचे रूपात कार्यरत असतात. चित्तिदेवता हि चित्तात ठाण माड़ुंन बसलेली आहे
अशा या नऊही भगिनीचे कार्य अविरत सुरु आहे. चित्तिशक्ती व विलासिनीशक्ती वर हे विश्वाचे कार्य चालू आहे. या विलासिनी शक्तीला नाथ सप्रंदायातील शाभंवीशक्ती वा शाबरीविद्या असे म्हणतात.
    चित्ती शक्तीला काम क्रोध मद मत्सर दंभ व अंहकार हि सहा बालके आहेत, व विलासिनी शक्तीला दया क्षमा शांती धन ज्ञान व समाधी हि सहा बालके आहेत. असा हा ऐकून बारा भावंडांचा मोठा प्रपंच या मानवी कुभांवर एकसारखे कार्यरत असतो. या चित्तीशक्तीला अजून एक बहीण आहे
ति म्हणजे वासना. हि वासना रूपी मावशी चित्तीशक्तीच्या काम क्रोधादी सहा बलाकाला हाताला धरून अविरत खेळवत असते.
मला घर दे
धनधान्य दे
पुत्रपौत्र दे
थोड़क्यात
"वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य"
    हि वासना नावाची मावशी जन्मभर तर सोडाच मृत्युनंतरही सोड़त नाही. म्हणून तर वासनात्मक देह शिल्लक उरतोच. यासाठी माऊली ज्ञानोबाराय साधकांना उपदेश करतात,

घटीं थोडेसें उदक घालिजे |
तेणें न गळे तरी वरिता भरिजे |
ऐसा परिसौनि पाहिलासि तंव परिसविजे |
ऐसेंचि होतसे||
     या पचंमहाभुतनिर्मित घटात थोडेसे सदगुरू रूपी उदक घाला. मानवी मनात वित्तीनामक ग्रंथी असतात. चित्ती व वासना तेथेच वास करत असतात. यामुळे मानवी कुभांत विचाराचे सतत द्वंद्व सुरु असते. या वासनाशक्तीची हाव कधिही सपंत नाही. या वासनेचा भाऊ मनाला दुबळा करत व्यसनाधिन बनवितो. इतकेच काय खाण्याच्या हव्यासापोटी बेड़ुक आपली जीभ सतत लांब करून किटक पकड़ित असतो. पण त्याचवेळी सापाने त्याला अर्धे गिळलेले असते हे त्याला स्मरण सुद्धा नसते. तसे माऊली म्हणतात,
काळाने आपल्यालाही अर्धे गिळलेले आहे,
दर्दुर सापडे गिळिजतु आहे उभा |
की मासीया वेटाळी जीभा |
तैसे प्राणीया कवणा लोभा |
वाढविती तृष्णा ||
   तेंव्हा या काळरूपी सर्पाच्या तोड़ांत जाऊन त्याच भक्ष्य बनल्यापेक्षा या घटाने सदगुरूला शरण जाऊन शाभंवीमंत्राची सोहं साधना करत आत्मोद्धार करावा. कारण,
काम क्रोध मद मत्सर |
दंभ अहंकार |
याचे बळ फार |
सर्व सुख देई सर्व सुख देई ||
सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा ||
   जिथे उपजताच ज्ञानी असलेले माऊली ज्ञानोबाराय विटेवर पढंरपुरात उभ्या असलेल्या जगदंबेला प्रार्थना करतात, तिथे आपल्या सारख्या सामान्याला जी
पढंरपुरी राहिली |
ड़ोळा पाहिली |
संती देखीली |
वरूनी विठाई वरूनी विठाई ||
    या अंबेला भजायला हरकत नसावी.
जय मुक्ताई
सकंलण- सदगुरूंच्या प्रवचनातुन
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/  https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:

Post a Comment