तुका म्हणे सुखा पार नाही
मोहवश झालेल्या अर्जुनाला कुरूक्षेत्राच्या रनांगणावर गीतोपदेश करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
म्हणे परिसणेयांचिया राया |
आईके बापाचा धनंजया ||
अंतकाळी जो माझे स्मरण करतो तो निसशंय मला प्राप्त होतो.
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् |
यः प्रयाति स मदभावं याति नास्त्यत्र संशयः ||
भागवत धर्माचतिल वैष्णव संतांच्या मार्गावर चालत सत्याचा पंचा अंगावर ओढुन अंहिसेची काठी घेत अंतकाळी ज्यांच्या मुखातून "हे राम" अंतिम शब्द निघाला. जगदगुरू तुकोबाराय वर्णन करतात,
अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा |
तुका म्हणे सुखा पार नाही ||
त्या महात्मा गांधीजींची आज जयंती.
"कोणी निंदा कोणी वंदा आमुचा स्वहिताचा धंदा"
आमच्या संतांच्या शब्दांना प्रमाण मानत माऊली ज्ञानोबारायही पुष्ठी देतात,
आणि मरणी जया जे आठवे |
तो तेची गतिते पावे |
म्हणौनी सदा स्मरावे |
मातेची तुवा ||
आयुष्यभर संसार करू व अंतकाळी भगवंताचे नाम घेऊ हे इतके सोपे असते तर ???
याजसाठी जप याजसाठी तप |
व्यासेही अमुप ग्रंथ केले ||
अंतकाळी भगवंताचे स्मरण होण्यासाठी सतत भगवंताचे नामाचे स्मरणात असावे. ही अनमोल असी सत्याची व "अंहिसो परमोधर्म" शिकवण देणारे साबरमतिचे संत राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या चरणी माऊलीच्या वैष्णवांचे कोटी कोटी प्रणाम
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment