˙˙जय मुक्ताई ..

Sunday, 30 October 2016

नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशी
नरक चतुर्दशी ची घटना तेवढीच द्वापरयुगातल्या कृष्णलिलेशी निगडीत आहे.
वराह अवतार प्रसंगी पृथ्वीचा उद्धार श्री भगवान विष्णु यांनी केला. आणि त्याच पृथ्वीच्या गर्भात ज्या ठिकाणी जानकी माता ( सीता ) यांचा जन्म झाला त्याच ठिकाणी नरकासुराचा जन्म झाला. जनक राजा यांनी सोळा वर्षे त्याचा संभाळ केला नंतर पृथ्वी माता नरकासुराला घेऊन गेली पुढे भगवान विष्णु यांनी त्याला प्राग्ज्योतीषपुरचा राजा बनविले .विदर्भ नगरीची राजकुमारी माया हिच्या बरोबर त्याचा विवाह झाला.त्यावेळी विष्णु भगवंताने दुर्भेथ नावाचा रथ भेट दिला.
नरकासुराला संगती फार वाईट लागली, वाईट राक्षसांची मैत्री झाली तो दुष्ट बनला. या मुळे वशिष्ट ऋषी यांनी त्याला तु भगवान विष्णु यांच्या हातून मरण पावशील असा शाप दिला. त्याने आपल्या तप सामर्थ्यच्या बलावर ब्रम्हदेवांना प्रसन्न केले व वर मागून घेतला की देवता असुर राक्षस आदी मला मारू शकत नाहीत.
असा वर प्राप्त करून घेतला.
हयग्रीव,सुंद यांच्या मदतीने देवराज इंद्र आदि देवगनांना त्रास देण्यास सुरवात केली, इंद्रावर विजय प्राप्त केला, वरुणाची छत्री, आदितीचे कुंडल घेऊन पळाला फार अत्याचार करू लागला.
शेवट इंद्र देवाने भगवान विष्णु कड़े धाव घेतली आणि सर्व सवीस्तर सांगितले . त्यावेळी भगवान विष्णु यांनी सुदर्शन चक्राने नरकासुराचे दोन टुकडे केले वध केला.
तो आजचा दिवस पृथ्वी दुभंग पावली आणि नरकासुराला आपल्या गर्भात घेतले आणि भगवान विष्णु यांस म्हणाली वराह अवताराच्या वेळी मला आपला स्पर्श झाला त्या वेळी नरकासुराचा जन्म झाला आज त्याचा शेवटही आपल्याच हातून झाला .
कारण त्या युगात ह्याच दिवशी दुष्ट,व्यभिचारी व अत्याचारी राक्षस नरकासुराच्या नरक यातनेतून संपूर्ण मानवजातीची सुटका झाल्याने, भुलोकी श्रीकृष्णासहीत अगदी सर्वच लोकांनी पहाटे सूर्योदया पूर्वी अभ्यंग स्नान करुन, नववस्त्रे परिधान करून, हर्षोल्हासात शोभेची दारु उडवून, आनंदाने दिपोत्सव साजरा केलेला दिवस म्हणजे आजच्या अश्विन मासे चतुर्दशीचा दिवस, जो त्या घटनेच्या स्मरणार्थ आजही तितक्याच प्रेरणेने अखंड भारतात सर्वच भारतीयांकडून परंपरागत अगदी तशाच प्रकारे पूर्वापार साजरा केला जातो हे खरचं विशेष व उल्लेखनीय होय.
ह्याच दिवशी श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामा च्या मदतीने नरकासुराचा निःपात करुन त्याच्या बंदीवासात अडकलेल्या सोळा हजार एकशे तरुण स्त्रीयांची मुक्तता करुन त्यांना सामाजिक मानसन्मान मिळण्यासाठी त्यांनी त्या सर्वांशी विवाह करुन त्यांचा उध्दार केला होता. अशा प्रकारे त्या काळात स्त्रीयांप्रती श्रीकृष्णांनी दाखविलेली उदारता व महानतेचे स्मरण म्हणून ही आजची चतुर्दशी सर्वच स्त्रीवर्गातही अगदी आत्मियतेने साजरी केली जाते.
आणि खरोखरच धर्मशास्त्रा नुसार दरवर्षी आजच्या दिवशी पहाटेच्या वातावरणात पृथ्वीतलावर कृष्णलहरी जास्त क्षमतेने कार्यरत असल्यामुळे आज पहाटेचे सूर्योदयपूर्व आपण उरकलेले अभ्यंग स्नान व औक्षण संपूर्ण वर्षभरात आपल्या तब्येतीला अतिशय प्रभावी व परिणामकारक ठरणार आणि तसेच कोणत्याही नरक त्रासातून आपण सही-सलामत सुटणार ह्याची खात्री बाळगा आणि आनंदाने म्हणा,
आली माझ्या घरीही दिवाळी.
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।

नरक चतुर्दशी

 नरक चतुर्दशी
   नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्‍या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करतात


नरकासुर वध
आश्विन वद्य चतुर्दशी
‘श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे – पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून भगवान श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.
यासाठी भगवंताचे नाम
लावुनी मृदंग श्रुती टाळ घोष 

 करावा व
गाता येईल तेणेची गावे!

येरा हरि हरि म्हणावे!!
नाहीतर
भजन करणे ओगांळवाणे!

नरका जाणे चुकेना !!
जय मुक्ताई

फटाक्यांची आतषबाजी

फटाक्यांची आतषबाजी
दिवाळीची चाहुल लागते ति घराघरात साफसफाई सुरु झाली की.
अंतर्बाह्य सफाई झाली की मुलाबाळांना नवनवीन कपड़े खरेदी केले जातात
घराघरात नानाविध पदार्थांचे सुगंध दरवळु लागतात
घरासमोर
दिव्यांची आरास बघायला मिळते
विविध रंगी उंचावर बांधलेले आकाशकंदील सर्वांचे लक्ष वेधुन घेतात
परंतु
दिवाळीचा खरा आनंद असतो तो म्हणजे आतषबाजी
फटाक्यांची लड़ी
याला लड़ी किंवा सर म्हणतात
हि लड़ी 50/100 ते 1000 फटाक्यांची सुद्धा असते
किंवा
यापेक्षा कितीतरी मोठी असु शकते
आपल्या मधात लपून बसून पुन्हा आपल्यावरच हुकूमत गाजवणारे दुराग्रहाचे वा चुकीच्या सवयीचे हे जणु प्रतीकच!
सदगुरू कृपेचा स्पर्ष होता क्षणीच एका मागून एक प्रतिकाराचे आवाज काढत ही सर जळून जाते
तरीही यातील काही फटाके बाजूला उड़ून शिल्लक रहातात
त्यांना शोधून शोधून पुन्हा प्रत्येकाला पेटवावे लागते
तेव्हा
जळताना प्रतिकाराचा आवाज,मान्यतांचा दुर्गंध व अधंश्रद्धेचा धुर निघतो
आता मात्र सपुंर्ण विकार जळाल्यामुळे उरतो तो फक्त निर्मुख आनंदच
हवाई बाण
हे जेंव्हा आकाशात उंच उड़तात
तेव्हा प्रत्येकाच्या मनात दड़ुन बसलेले मोह,लोभ,कल्पना,मत्सर,विचार,महत्वाकांक्षा ,स्पर्धा व इच्छित मिळवण्यासाठी केलेल्या लटपटी,कपटाने हे सारे आप आपले रंग उधळून दाखवतात
मायेच्या या जगाचे रंग मनाला थोडावेळ का होईना भुरळ घालतात
परंतु
जेंव्हा अज्ञान नाहीसे होते तेव्हा मात्र या उधळेल्या रंगातच एकरुप होत अवघा रंग एक होते
याच प्रतिक म्हणजे हवाई बाण
अॅटमबाॅम्ब
हा एकदाच फुटतो त्या नतंर कशाचच अस्तित्व शिल्लक उरत नाही
तेव्हा सदगुरू कृपेने समज होते की अस्तित्व शाश्वत नसून सपुंर्ण विश्वच शुन्यात आहे
सर्वच अॅटमबाॅम्ब उड़वून झाल्यावर समज येते की आजवर मान्यंताच्या वा कर्मकांडाच्या दड़पणाखाली आम्ही किती काळ वाया घालवला
हि समज यायला योग्य वेळ यावी लागते
एकदा का ति योग्य वेळ आली कि सदगुरू कृपेची एक ढिनगी पड़ायचा उशीर की अज्ञानाची,मान्यंताची व खोट्या कर्मकांडाची राख व्हायला किती वेळ लागेल?
मग उरते ति आकाशातील सुदंर शोभा व असीम अशी आतंरीक शांती
सुदर्शन (भुईचक्र)
भगवान परमात्माच्या हस्तावरील बोटाची शोभा म्हणजे सुदर्शन चक्र
आतशबाजीतील
हे निर्जीव चक्र वात पेटवल्यावर स्वतः भोवतीच गोलगोल फिरते
हे जणु अज्ञानी जीवाला संदेश देत आहे की जे काही आहे ते तुझ्यातच आहे
पृथ्वीही गोल आहे
तु परमात्माला कुठे कुठे शोधतोय
सदगुरू कृपेने फक्त तुझ्या शरीरातील आत्मज्योतीची वात पेटवून सोहं शब्दाचा नाद करत स्व आनंद घे
श्रद्धा व भक्तीचे प्रेम उचंबळून येईल

धन्यवादाचे गोलगोल अभिव्यक्ती नृत्य करू लागशील
मग बघ नेत्रदिपक,प्रसन्न व आश्चर्यचकीत करणारी चेतनेची प्रकाश फुले चौफेर वर्षाव करतील
चद्रज्योत
दिव्य व शांत सप्तरंगाची बरसात करणारी ही ज्योत
उच्च चैतन्याचे स्तोत्राचे दर्शन घड़वीते
किती निरागस सप्तरंगातील ही ज्योत जणु आपल्यावर सदगुरू कृपेचा अमृतवर्षाव झाला आहे
याचाच संकेत देत असते
किती शितलता असते या ज्योतीत
प्रेम व आनंदाची आणि मौनाची बरसात होते
कसला मोठा आवाज नाही
धागंड़धिगां नाही
जसा लोखंडाला परीस स्पर्श झाला आहे व त्याचे सोने झाले आहे आणी आता उरलेय ते फक्त जगाला आनंद देणे
या आत्मानंदातच सदगुरू चरणी लिण होत समर्पणाची भावना
आणी
या मंगलमयी भावनेतून शांतपणे सदगुरू प्रती ध्वनी उमटतो
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
दुराग्रहाची लड़ी पेटवून,विचारांच्या हवाई बाणांना ओळखुन,समजेचा अॅटमबाॅम्ब लावून स्वदर्शन घड़वणारे अंतर्यामी सुदर्शन चक्राची जादु तर अनुभवत आयुष्यात निरंतर तेवत राहणारी सदगुरू कृपेची शितल शांत चंद्रज्योत ओळखावी
मग
आनंदी आनंदच
नाहीतर प्रत्येक दिवाळीत हजारो रूपयाचे फटाके फोडून कितीही जगाला शक्ती प्रदर्शन दाखवायला आतषबाजी केली तर क्षणभर भौतिक आनंद वाटेल मग पुन्हा अंधारच की
सदगुरू कृपेने अंतर्मुख साधना करत करत आत्मज्योत चद्रंज्योतीप्रमाने अविरत प्रकाशीत राहो
हिच भक्तिमय सदिच्छा
चैतन्याचा जिव्हाळा परिवार
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

धनत्रयोदशी

धनत्रयोदशी. 
     आजच्या दिवशी धनाची पूजा करावी असे म्हणतात. वास्तविक पाहता संपत्तीची पूजा लक्ष्मीपुजनाच्या दिवशी करण्याची प्रथा आहे. मग आजच्या दिवशी नेमकी कुठल्या धनाची पूजा करणे अपेक्षित आहे?? याचे उत्तर म्हणजे आरोग्याधनाची!! कारण आजच्या दिवशीच समुद्रमंथनातून ‘धन्वंतरी’ या आरोग्यरत्नाची प्राप्ती झाली.म्हणूनच आजचा दिवस हा आम्ही सारे वैद्य ‘धन्वंतरी जयंती’ म्हणून साजरा करतो. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने यावर्षीपासूनच हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ म्हणून घोषित केला आहे ही अतिशय समाधानाची बाब.
भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे आद्यप्रवर्तक होत. त्यांना ‘शल्यतंत्र’ (Surgery) या शाखेचे प्रमुखदेखील मानले जाते. समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या या रत्नाचे वर्णन पुढीलप्रमाणे आले आहे – घननीळ वर्णाची ही देवता चतुर्भुज असून त्यांनी शंख, चक्र, जलौका व अमृतकुंभ धारण केले आहेत.यातील चक्र हे आयुध रोगांच्या नाशाचे प्रतीक आहे. शंखध्वनी हा भारतीय संस्कृतीने पवित्र मानला आहे. वातावरणशुद्धी, मानसिक स्थैर्य व शांतते करता हा नाद उपयुक्त आहे. शंखभस्मासारख्या कल्पाच्या माध्यमातून आयुर्वेदीय चिकित्सेत शंखाचा वापर होतो.जलौका म्हणजेच जळू ही रक्तमोक्षण व पर्यायाने आयुर्वेदातील पंचकर्माचे प्रतिनिधित्व करते. अमृतकुंभ म्हणजेच दीर्घायुष्य. आयुर्वेदीय चिकित्सेने दीर्घायुष्य प्राप्त होते असे येथे सुचविले आहे.
हरिवंशाच्या पहिल्याच पर्वात अशी कथा आली आहे की भगवान विष्णूंनी धन्वन्तरीना असा वर दिला की; द्वापारयुगात जेव्हा विष्णु कृष्णस्वरुपात अवतरतील तेव्हाच काशी अधिपती दिवोराजाच्या रुपात धन्वन्तरीदेखील अवतरतील व आयुर्वेदास अनन्यसाधारण महत्व येईल!! या वराप्रमाणेच काशीराज धन्वाच्या पुत्राच्या स्वरुपात भगवान धन्वन्तरी अवतरले. या दिवोदासाने वाराणसीची पुनर्स्थापना करून नालंदा,विक्रमशिलेसारखी विश्वविद्यालये नावारुपास आणली.या ठिकाणी संपूर्ण जगातून हजारो विद्यार्थी ज्ञान मिळविण्यास येवू लागले.मात्र बख्तियार खिलजीसारख्या यवन आक्रमकाने ही विश्वविद्यालये उध्वस्त केली. ही विद्यापीठे इतकी प्रचंड होती त्यांची ग्रंथालये जळण्यासाठी काही महिन्यांचा काळ लागला!! अशा आक्रमणांमुळे आयुर्वेदाचा अतोनात ह्रास झाला….हा या देशाचा इतिहास आहे.
काशीराज दिवोदासाने केवळ विद्यापीठे स्थापन केली असे नाही तर त्याने सुश्रुतासारख्या अनेक शिष्यांना स्वतः शिकविले. ’सुश्रुतसंहिता’ हा धन्वन्तरी संप्रदायाचा ग्रंथ मानला जातो.
आजच्या दिवशी धन्वंतरीच्या प्रतिमेची वा मूर्तीची पूजा करून धने-गुळाचा नैवेद्य दाखवावा व आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या आयुरारोग्यासाठी तसेच आयुर्वेदाच्या पुनरुत्थानासाठी प्रार्थना करावी.आपणा सर्वांस; खास करून माझ्या सर्व वैद्य बंधू-भगिनींना धन्वंतरी जयंतीच्या आणि राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या अनंत शुभेच्छा!!
ओम् धं धन्वन्तरये नमः|
व्हॉट्सप सौजन्य
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।

फराळ दिवाळीचा

फराळ दिवाळीचा
घरांची साफसफाई झाली 
व 
अंगणात पणतीचे दिवे लागले
कि
घरा घरात सुगंध दरवळु लागतो आणि
चाहुल लागते ती फराळाच्या नाना पदार्थाच्या सुगंधाची
दिवाळी म्हटल की कशातही हात अखड़ता घ्यायचा नाही
हि जणू आपली परंपराच
दिवाळीत बनवला जाणारा एक पदार्थ म्हणजे
*चिवडा*
आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या स्वभावाची लोक येतात
याचे प्रत्येकाला गोड़,तिखट,खारट व आंबट अनुभव येत असतात
तरीही आपन कुणा एकाचा तिरस्कार करत नाही
षड़रसाच उत्तम प्रतिक म्हणजे चिवडा
या आपल्या भोवतालच्या लोकवलयाच्या षड़रसाचा स्वाद असणारा हा चिवड़ा
अगदी खायला तर खुसखुशीत,चटपटीत,हलका व अनोखाही
*चकली*
संसाराच्या मोहमायेच्या चक्रात आपन अड़कलोय
त्याच सर्वोत्तम प्रतिक म्हणजे हि चकली
तिला खमंगपणा पण आहे

बोलणारे काटे देखील आहे
मायेचा पसारा पोकळ असतो
पण
गमंत म्हणजे या संसाररूपी चक्रव्युहात आपन अड़कुन जसे जन्म मरणाच्या गोलगोल घिरट्या मारत असतो
यातून बाहेर पड़ण्यासाठी मार्ग शोधत असतो
अशी ही मोहमायेच प्रतिक असणारी गोलगोल चकली
*करंजी*
हिचे रंगरूप वेगवेगळ्या प्रकारचे
लहान, मोठी,पाढुंरकी व लालसर वा खमंग सारणाची
तेल वा तुपात तळलेली व कड़ा कुरतड़लेली हि करंजी
बाहेरून दिसायला जरी आकाराने ओबडधोबड असली तरी आत मात्र अंतरगात गोड़ीच गोड़ी असते
आपल्या जिवनात भेटलेले माणसं वरवर कशेही दिसत असले तरी अंतर्यामी मात्र करंजीच्या सारणा सारखे गोड़च गोड़ आहेत लाड़ू हे तर पुर्णतेच प्रतिक


गोल गोल लाड़वा शिवाय जसा फराळ अपुर्ण वाटतो
तसेच मानवी जीवन सुद्धा इश्वर प्राप्तीविना अपुर्णच आहे
लाड़ु हा पुर्णरूपात आहे
पृथ्वी गोल आहे
मनुष्याला जन्म मिळालाय तो पृथ्वीलक्ष प्राप्त करण्यासाठी
पृथ्वी गोल आहे व परिपूर्णही आहे
तसा हा दिवाळीच्या फराळातील लाड़ुही गोल आहे
पृथ्वीही गोड त्याप्रमाणे लाड़ुही गोड आहे
हा परिपूर्णतेचा संदेश देणारा लाड़ू
अंतर्बाह्य गोडच गोड़
अशी हि गोड़ गोड़ फराळाची आत्मज्ञानाची गोडगोड़ दिवाळी
या दिवाळीत षड़रसाचा स्वाद देणारा चिवडा,
मायेचा पोकळपणा दाखवणारी चकली,
अंतरंगातील गोड सारणाची करंजी

परिपूर्ण लाड़ू
अशा तिखट-गोड आयुष्याच गोड़ गोड देणारे पदार्थाची चव चाखुया
इतकेच फराळाचे पदार्थ तयार झाले
गॅस संपला आता
बाकीचे नतंर बघु तयार झालेवर
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

Friday, 28 October 2016

शुभेच्छा दिपावळीच्या

शुभेच्छा दिपावळीच्या
●●●●●●●●●●●●●●●
     किती हास्यास्पद बाब आहे ना, ही दिपावळीच्या शुभेच्छांची..!
आपण सहज शुभेच्छा द्यायच्या म्हणुन आपल्या हितचिंतकांना देत असतो,पण कधी यावर विचार केलाय तरी का की खरच आपली पात्रता तरी आहे का अशा दिपावळीच्या शुभेच्छा देण्याची..?
अहो केवळ प्रथा म्हणूनच शुभेच्छा देण्याची आपली परंपरा मुळीच नाहि तर देण्यासाठी ती वस्तु आपल्याजवळ उपलब्ध असायला हवी ना..!
      म्हणजेच आधी स्वतः त्या शुभ ईच्छांची भांडारे सर्वप्रथम आम्ही ओतप्रोत आत्मसात करायला हवी तद्वतच् अनुभवायला सुध्दा हवी आणि मगच त्यातुन खुशाल वाटायला हवी...
तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण
पण...
     आम्हाला फक्त बाजार भरवायची सवय जडलेली असल्यामुळे, शुभेच्छांचाही व्यवहार करण्याआधी आम्ही क्षणभरही सारासार विचार करीत नाही...
   आमच्या नयनांनी मनात साठवलेला कित्येक जन्मांतरीचा वासनेचा घनघोर काळोख मिटवण्यास, आम्ही स्वतः समर्थ नसतांना दुसर्‍यांचा मार्ग ज्ञानसंपदेने प्रकाशीत करणार्‍या बाष्फळ शुभेच्छारुपी तत्वज्ञानाच्या गोष्टींचा दुसर्‍यांवर कितीही वर्षाव केला तर अशा अव्यवहार्य शुभेच्छांमधुन काय साध्य होईल..?
आमच्या मनात कामक्रोधरुपी षडरिपुंच्या अंधःकाराने थैमान माजवलेले असतांना आमच्या शुभेच्छांनी दुसर्‍यांच्या मनात सात्विक उजेडाचा दिप कसा पेटवल्या जाईल..?
आमच्या विचारांना अविवेकाच्या काजळीचे ग्रहण लागलेले असतांना आमच्या अवाजवी शुभेच्छांनी इतरांच्या बुध्दीमधे सद-सदविवेकाचे तेज कसे व कोठुन प्रकाशित करता येईल, सांगा ना..!
अहो...
    आमच्या या देहाला जर स्मशानात जळुन कोळसा व्हायचे नक्की असेल तर केवळ आमच्या देहिक शुभेच्छांनी इतरांना क्षणभंगूर ज्योतीमय सुखाचा मृगजळाभासीत प्रकाशही का दाखवावा..?
म्हणुन
     माऊलींनो कुणालाही दिपावळीच्या शुभेच्छा देण्यापुर्वी आपल्या मधील सार्वभौम अज्ञानमयी अंधःकार समुळ नाहीसा करण्याचा प्रयत्नाला लागणे कधीही क्रमप्राप्त होईल.
    आमच्या संतमालिकेतील प्रत्येक संतांनी स्वःचा अंधःकार नाहीसा केल्यानंतर जनसामान्यांच्या उध्दार करणारा ज्ञानदिप तेववण्यासाठीच्या शुभ ईच्छा सर्वांसाठी आयुष्यभर व्यक्त केलेल्या आहेतच आणि त्याच शाश्वतही आहेत.
म्हणून...
केवळ कोरड्या शुभेच्छांचा दिप प्रज्वलित करण्याऐवजी,
प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदिपः अशा व्यापक ज्ञानदृष्टीने परिपुर्ण असलेला व्यासमयी शुभेच्छांचा दिपक या दिपावळीत पेटवूया,कदाचित अशीच दिपावळी संतांनाही तर अपेक्षीत नाही ना..!

...जयमुक्ताई...रामकृष्णहरी...👣स्पर्श...

परी न संड़ावे दोन्ही वार

 परी न संड़ावे दोन्ही वार
भारतीय सणांच्या मागे अध्यात्म तर आहेच
पण विज्ञान देखिल आहे
लहान असताना दिवाळी सणाला आजी उटने लावून स्नान घालायची
आजीचे दर्शन घेतले की आजी अगदी तोड़ंभरून आशिर्वाद द्यायची
पुता,मातीचा दिवा हो,कापसाची वात हो.
आता त्या बालीश वयात खेळायचे दिवस
आणी
आजीचा आशिर्वाद थोडासा विचित्रच वाटायचा

आजीच्या आशिर्वादावर विचार करायला त्या वयात तरी शक्य न्हवतेच
परंतु
जेव्हा विज्ञानाचे चार पुस्तक शिकवले गेले व थोड़ीशी का होईना अध्यात्मिक संगती लाभली तेव्हा कुठे ड़ोसक्यात उजेड पड़ला की
पणतीमधील वात तेवण्यासाठी ती तेलात बुड़ालेली असावी लागते आणी त्याच वेळी तिचे एक टोक बाहेरही असावा लागते तेव्हा कुठे ती वात प्रकाश देते

मानवी जीवनही या पणतीतील वातीप्रमाने असायला हवे
तुम्हाला या संसाररूपी जगतात रहावच लागेल
इथे राहीला तरी त्या पासून अलिप्त रहा
जर भौतिक जगतातील संसाररूपी तेलात पुर्णपणे बुड़ून गेलात तर आत्मज्ञानाची ज्योत कशी पेटणार?
संत महात्म्यानी व विज्ञानानी आणि दिव्याने हाच तर संदेश दिला आहे
संसारात जरूर रहा
पण
दिव्याच्या वातीप्रमाने एक टोक कोरड़े असुद्या
कधी तरी सदगुरू भेटतीलच आणि आपला दिवा ज्ञानाग्नी पेटवतीलच पण आत्मवातीच एक टोक संसाराव्यतिरिक्त कोरड़े असेल तरच ना?
म्हणूनच
सुखे करावा संसार!परी न संड़ावे दोन्ही वार!!
आणि
संसारी असावे असुनी नसावे!भजन करावे वेळोवेळा!!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

आत्मज्ञानाची दिवाळी

आत्मज्ञानाची दिवाळी
हिंदुस्थान म्हणजे उत्सव प्रिय देश असेही म्हणले तरी वावगे ठरणार नाही
इथे सणांची मोठी रेलचेल असते
त्यातल्या त्यात सर्वात मोठा सण म्हणजे दिपावली
खरतर दिवाळीचा सण हा दर वर्षी च येत असतो
पण
या सणातील चैतन्य मात्र प्रत्येक वर्षी आपल्या ह्रदयाला नव्याने स्पर्श करत असते
मागंल्याची भावना मनामनात घर करू लागते
इतकेच काय घराची साफसफाई करताना आपन स्वतःच शुद्ध होऊ लागतो
आणि


अंगनात तेवणारा दिवा तर याच मागंल्याच,शुद्धतेच आणि स्नेहभावाच प्रतिक
या दिपज्योती मधे पीत व लाल असे दोन रंग असतात
म्हणजे
आपल्याला सामान्य मनुष्याला ते दोन रंग दिसतात
तरीही आपन म्हणतो
ज्योत एकच आहे
गंगा व यमुना हि नदीला जशी दोन नावे दिली तरी पाणी एकच असते
इतकेच काय प्राण तर एकच असतो तरीही एकाच प्राणाचे प्राण ,अपान व समान असे तिन भाग आपन कल्पितोच की?
दिव्याची ज्योत आपल्या चर्मदृष्ठीने दोन रंगाची दिसत असली ज्योत मात्र एकच असते
त्याच न्यायाने जीव व शीव दोन्ही वेगळे दिसत असले तरीही सदगुरूनी दिलेल्या आत्मदृष्टीने पाहिले तर ते एकच आहेत
त्यासाठीच तर
अंतरी तेजज्ञानाचा विवेकदीप उजळी
हिच तर खरी आत्मज्ञानाची दिवाळी
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

प्रेम

प्रेम
     मित्रांनो, प्रेम तुम्हांला खुणावील तेव्हा त्याच्या मागून चालू लागा. त्याच्या वाटा खडतर चढणीच्या असतील प्रेमाने तुमच्यावर पाखर घातली म्हणजे त्याला शरण जा.त्याच्या पंखात पोलादी पाती लपली असतील ती तुम्हांला जखमी करतील.प्रेम तुमच्याशी संवाद करील त्यावेळी त्यावर विश्वास ठेवा.भयाण येणारा वारा जसा बगिचा उद्धवस्त करतो तसा प्रेमाचा स्वर तुमची स्वप्ने उधळून लावील.कारण प्रेम तुम्हांला जस राजवैभव देईल तस सुळावरही नेईल.तुमच्या अंतकरणाच्या उंचीला ते पोहचेल, सूर्यप्रकाशात थरथर नाजूक डहाळ्याना कुरवाळील.तस ते तुमच्या मुळापर्यंत जाईल आणि गदगदून तुमची मनोभुमी थरकापिवील.धान्यांचे पांचुदे बांधावे तासे ते तुम्हांला आवळून धरील.झोडपून तुम्हांला नागव करील,दळून काढील,पीठ करील तीबींल तुम्हांला खिळखिळे करील.मग ते तुम्हांला ईश्वरी ज्वालेच्या निखाऱ्याशी नेईल तेव्हाच त्याच्या पावन भोजनाचे तुम्ही खाद्यान्न तुम्ही व्हाल.हे सगळ प्रेम कशासाठी करील ? तर त्यामुळेच तुमच्याच अंतःकरणाची रहस्ये तुम्हाला उमगतील.आणि त्याच जाणिवेने ईश्वरी चैतन्याचा एक अंश तुम्ही होऊन जावं पण जीवलगानों भयाच्या आहारी जाऊन प्रेमाकडून शांतीचीच आणि सुखाची आकांक्षा कराल तर आपले नागवेपण झाकून प्रेमाच्या यातनाघराकडे तुम्ही पाठ फिरवावी हेच बरं.मग जग ऋतूरंगहीन होऊन जाईल.तुम्ही हसाल पण त्यात तुमचं सुखसर्वस्व नसेल.तुम्ही रडाल पण त्यात तुमच दुःखसर्वस्व नसेल.प्रेम काय देत तर केवळ स्वतंःचच दान देत प्रेम काय नेत ?

तर केवळ स्वतःलाच विन्मुख करतं.प्रेम तुम्हांला झडपणार नाही की स्वतःही झडपणार नाही कारण प्रेम स्वयंपूर्ण आणि स्वयंतृप्त आहे.प्रेम करताना तुम्ही म्हणू नका की,ईश्वर माझ्या हृदयात आहे,म्हणा मी ईश्वराच्या हृदयात वस्तीला आहे.कधीही मनात आणू नका की प्रेमाचा मार्ग मी आखून काढील,तुम्ही पात्र असाल तर प्रेमच तुम्हांला मार्गदर्शन करत जाईल.आपण सिद्धिस जावं ही एकच ईच्छा प्रेमाला असते.प्रेम करत असताना इच्छा आणि वासना तुमच्यापाशी असतील तर त्या कशा असाव्यात वितळलेल्या बर्फाच्या वाहत्या झऱ्याने रात्रीच्या प्रहराला गाणी ऐकवावीत तशी तुमची इच्छा असावी.नितांत कोमल संवेदनाने होणार दुःख तुम्ही जाणून घ्याव अशी इच्छा असावी.स्वतःमधील प्रेम जाणीवेने जखमी व्हावं स्वेच्छा रक्त व्हावू द्यावं आणि त्याचा आनंद मानावा अशी तुमची इच्छा असावी.पंख फाकलेल्या चित्तानं पहाटेची जाग यावी.आणि प्रेमपूजनासाठी नवा दिवस उगवला याबद्दल तुम्ही ईश्वराचे आभार मानावे.दुपारच्या निवांत समयी प्रेमाच्या निर्भरतेच चिंतन घडावं.आणि कृतज्ञ अंतकरणाने तुम्ही सांयकाळी घराकडे परतावं हृदयस्थ प्रेयसीसाठी प्रार्थना करीत.स्तवनगीत ओठावर घोळवीत तुम्ही झोपेकडे वळावं.आणि नितांत प्रेमाच्या कुशीत विसावं.
जय मुक्ताई
संग्रहीत चिंतन एका महात्म्याच्या अॉडिओतून.
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

विठोबाचे राज्य आम्हा

विठोबाचे राज्य आम्हा
द्वापारयुगात भगवान श्रीकृष्णाचे प्राकट्य झाल्यापासून 
आश्विन वद्य द्वादशीला गाई-वासराची मिळुन पुजन करण्याची प्रथा सुरू झाली
या दिवशी सांजवेळी गाई-वासरांना ओवाळतात
आजच्या दिवशी
त्यांना सुग्रास चारा खायला दिला जातो
आज गाई-वासरांना ओवाळण्यासाठी पितळाची निरंजनी वा आरती नसते
तर
मोळ नावाच्या गवताची एक कण्याची तिन टोकाची आरती बनवून तिने ओवाळतात
दुसरे दिवशी दोन कण्याची आरती
तिसरे दिवशी तिन कण्याची आरती
चौथे दिवशी चार कण्याची आरती

दिवाळीच्या पाड़व्याला पाच कण्याची आरती करून या पाचही दिवस गाई-वासरांना ओवाळतात


ओवाळताना
दिन् दिन् दिवाळी!गाई म्हशी ओवाळी!!
गाई म्हशी कोणाच्या बळीरामाच्या
दे आई खोबरेची वाटी!नाहीतर घालिन पाठित काठी!!
अशी आजच्या दिवशी ओवाळण्याची परंपरा आहे
तसे पाहिले तर आज एकादशी आहे
परंतु
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या सखोल माहितीवरून तिथीचा क्षय झालेमुळे आज एकादशीलाच द्वादशी पण आलीय अशी माहिती मिळाली आहे
आपण त्या तिथीच्या भानगडीत पड़त नाही
असो
वारकरी मड़ंळीना शक्यतो पंचांगाची कधि जरूर हि पड़त नाही
कारण
आज एकादशी असो वा त्रयोदशी असो?
हरिदासांना तर
*विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिवाळी*
चला मग आपनही कुठे कमी नाहीच
आता गाईच नाही राहिल्या तर वासर कुठून आणायचे?
आजवर दिवेच लावत आलोय
आज या महापर्वावर लावु दिवे मग?
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

समर्थाचियें पंगती भोजनें....

🌺|| ते हे माय ज्ञानेश्वरी ||
माऊलीं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत कुठही अर्जुनाला काहीच कळत नव्हते किंवा तो आत्मज्ञानसंपन्न झाला नव्हता असे म्हटलेल नाही. अर्जुनाचा अधिकार फार मोठा आहे,
परिसनयाच्या राया |
ऐके बा धनजंया ||
आता पर्यंत जितके ऐकणारे झाले त्यांचा अर्जुन राजा आहे. माऊलीनी अर्जुनास आत्मचर्चेच्या संदर्भात पार्थ असे संबोधले आहे. कारण तो नुसता पृथ्वीचा पार्थ नाही तर पृथ्वीची व्यापकता व सोशीकता त्याच्या व्यक्तीत्वात आहे. म्हणून तो पार्थ.
पार्थ कसा आहे तर तो पार्थासारखाच आहे. तो कोणत्याही विषेशनाच्या घरट्यात बसनारा नाहीये. महाकाव्याच्या घाटावरून फिरनारा तर मुळीच नाहीये. कल्पनाच्या पंखावर बसून उगाचच स्वैर भराऱ्या मारून डोऴे दिपवनारा तर मुळीच नाहीये. तो आपल्या जाणीवा प्रामाणिकपने तपासनारा नितळ साधक आहे. युद्ध हे त्याचे फक्त निमित्त असावे. त्याच्या जिवनातील संघर्ष फार वेगळा आहे. जो आजही तुमच्या माझ्यात नित्य सुरू आहे. तो म्हणजे कोणत्या वेळी नेमके काय करायचे. म्हणून तो आपल्या देहालाच कुरूक्षेत्र समजतो. सैन्यालाच विकार समजतो. धृतराष्ट्राला विषयात बघतो. याचे निमित्त आपण आहे याचे त्याला भान आहे. परंतु निमित्त हेच सर्वस्व मानल्याने पार्थाची मुळची जागा हरवली. त्याच्या आत्मरूपापासुन तो वेगळा पङला. या वेगळे पनास तो सर्वस्व मानु लागला. यामुळे त्याचे आत्त्मभानच हरवुन बसला. यासाठी भगवंताला अर्जुनास अठरा अध्यायाची अठरा योग सागायंची उचित वेळ आली ति कुरूक्षेत्रावर.

देखा नवल तया प्रभूचें |
प्रेम अद्भुत भक्तांचे |
जे सारथ्य पार्थाचें |
करीतु असे ||
जेणे गीता उपदेशीली |
किंवा
अर्जुना सकंट पङता जडभारी |
गीता सांगे हरि कुरूक्षेत्री ||
तोची अवतार धरी अंलकापुरी |
ज्ञानाबाई सुदंरी तारावया ||
काल च्या चिंतनाने ते हे माय ज्ञानेश्वरी अध्याय ६ "आत्मसंयम योग" पुर्ण झाला आज रमा एकादशी च्या शुभदिनी ७ वा अध्यायास "ज्ञान विज्ञान योग" सुरवात करुया.
आपल्याला फक्त ऐकच करायचय,
"वाचावी ज्ञानेश्वरी"
कारण
समर्थाचियें पंगती भोजनें |
तळिल्या वरील्या एकचि पक्वान्नें |
तेवीं श्रवणें अर्थें पठणें |
मोक्षुचि लाभे ||
जय जय मुक्ताई👏👏👏
https://www.facebook.com/te.he.mai.dnyaneshwari/

नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत

 नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत
नित्यता अच्युत तिष्ठतसे ।।
विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज सांगतायत.
ज्या स्थानात निवासात नित्य हरिकथा नियमाने प्रेमाने नामस्मरण होते त्या वैष्णवांच्या घरामध्ये नित्य दिवाळी असते.तेथे भगवंताचे वास्तव्य असते.
   आज दिवाळी आली की भेटवस्तू जुन्या होई पर्यन्त दिवाळी संपून जाते.एखाद्या दिवाळीला आपल्या प्रियजनांना काही भेटवस्तू देऊ नका बघा कशी दिवाळी त्यांच्या डोक्यात बसते.

धन दारा पुत्रजन ।

बंधु सोयरे पिशुन ।
सर्व मिथ्या हें जाणून ।
शरण रिघा देवासी ।।
म्हणून संसारात आल्यावर आषाढ़ी कार्तिकी पंढरीची वारी करा.
त्या आनंदासी जोड़ा नाही.
प्रत्यक्ष श्रीहरि तेथे कटेवर कर ठेऊनि उभा आहे आपणास हात कटेवर ठेऊनि सांगत आहे .
भवसागर तरता काय करीतसे चिंता ।
पैल उभा दाता कटी कर ठेऊनिया ।।
संतसंगती करा वैष्णवांच्या सानिध्यात जीवन जगा.
दामोदर कार्तिक मास चालु आहे शक्य होईल ते आवडीने नामस्मरण करा. आणि मग त्या सुखाला पारावारा रहानार नाही.
संत तेच सांगतात
विठोबाचें राज्य आम्हां नित्य दिवाळी
आज रमा एकादशी व गोवत्स द्वादशी
तर मग करा कार्तिकी वारीची तयारी
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

तै पर्वकाळ दिवाळी दसरा

तै पर्वकाळ दिवाळी दसरा
माझे भाग्य येती घरा!तै पर्वकाळ दिवाळी दसरा!तेथे तिर्थे येती माहेरा!जेवी सासरहुनी कुमारी!!
एकनाथ महाराज भागवतात वर्णन करतात
मातीच्या पणतीत तेल घालुन दिवे लावून म्हणजे दिवाळी नाही
या नाशिवंत देहावर नवनवीन वस्त्रे घालुन सुवर्ण अंलकाराने शरीराला सजवून गावभर फिरणे म्हणजे दिवाळी नाही
ऋण काढुन सण करणे हि सुद्धा दिवाळी नाही
सगेसोयरे , मित्र व आप्तेष्ठांना जमा करून गोड खारट पदार्थ खाणे म्हणजे दिवाळी नव्हे
परंतु
हेच सगळे सोयरे मात्र अंतकाळी
बांधुनीया देती यमाचिये हाती!

भुषणेही घेती काढूनीया!!
ज्या दिवशी यमाच्या तावड़ितून सोड़वणारे खरे संत भेटतील व आपल्या घरी येतील
तोच दिवस खरा दिवाळी व दसरा होतो

व तिथेच सर्व तिर्थे धावत येतात
जशा मुली सासरहुनी माहेरी धावत येतात
तै पर्वकाळ दिवाळी दसरा
आज हरिदिनी
उद्या वसुबारस
याच तिथीला गोवत्सद्वादशी म्हणतात
दिवाळ सणाच्या पुर्वसंधेला भक्तीपुर्ण शुभेच्छा
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

विश्वाचें आर्त माझे मनीं प्रकाशलें

विश्वाचें आर्त माझे मनीं प्रकाशलें।
अवघे चि जालें देह ब्रम्ह।
सर्वांच्या हृदयातील आर्तता,सर्वांचे दुःख माझ्या हृदयात उमटत असते.हे संपूर्ण विश्व माझेंच शरीर आहे,आणि तेंहि पुन्हा ब्रम्हमय आहे,असेआ मी अनुभवतो असे माऊली या अभंगातून सांगतात.सर्वांना आवडणारें प्रेम मीच होऊन बसलो आहे.आपला प्रेम-भंग होऊ न,आपले मनोरथ सुफलित व्हावे,याविषयीं त्या त्या प्राण्याला जी जी तळमळ वाटते ती ती सर्व मलाच वाटते.
    मला क्षुद्र म्हणून काही भेटतच नाही.जें भेटतें ते आकाशासारखे विशाल आणि महान भेटते.मग तो क्षुद्र मानलेला जंतु का असेना असंख्य आकाशें एकमेकांना भेटून राहिली आहेत,असें माझें अद्भुत दर्शन आहे माझ्यासाठी जणू आकाशांची खाणच उघडली आहे.


आवडीचे वालभ माझेनि कोंदाटलें।

नवल देखिलें नभाकार गे माये।
      ऋजु कुटील नाना वेष धारण करून तो परमात्मा परमेश्वर लीला करून राहिला आहे,असे म्हणतात.पण माझ्यासाठी कुटील किंवा वाकडें कुठेच नाही.जें आहे ते ऋजु नीटच आहे.वरवर कामक्रोधादिकांनी किंवा द्वेष ईर्षा असूयादिकांनी प्रेरीत होऊन वागताना कुणी दिसले,तरी त्यांच्या त्या विकारांच्या मुळाशी शुभाकांक्षाच भरलेली आहे,असे मी त्यांच्या हृदयात प्रवेश करून पाहून घेतलें आहे.विकारांच्या मुळाशी असलेली ब्रम्ह-प्रेरणा -विकारांची ब्रम्हाकारता-ओळखल्यामुळे मला सहजच सर्वाविषयी सहानुभूती वाटते.अस माऊली म्हणतात.
बाप रखुमादेवी वरू सहज नीटु झाला।

हृदयी नीटावला ब्रम्हाकारें।
संग्रहीत चिंतन
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

तत्वज्ञान

तत्वज्ञान
ऐक अतिशय उंच व प्रशस्त बहुमंजिली हवेली होती
कोणी एक प्रवासी त्या महालाजवळुन जात होता
इतकी मोठी इमारत बघून तो प्रवासी साहजिकच आश्चर्यचकित झाला
मुख्य प्रवेशद्वाराजवळ तो प्रवासी पोहचला तर आजुबाजुला बघितले आता जाण्याची परवानगी घ्यावी म्हणून त्याने बघितले तर प्रवेश द्वाराजवळ कोणीही दिसले नाही
त्या भव्यदिव्य महालाचे
मुख्यद्वार फक्त लोटलेले होते
थोड़्याश्याच प्रयत्नाने दरवाजा ढकलून तो प्रवासी आत आला
आता बघतो तर इतक्या मोठ्या दिवाणखान्यात कोणीही नाही
तो प्रवासी उच्चशिक्षित होता
चांगला शिकला सवरलेला होता
त्याने सर्वत्र शोध घेतला तेंव्हा एका कोपर्यात एक पाटी लावलेली त्याला दिसली
तिथे लिहिले होते
या जिन्याने वरती जा
तो प्रवासी वरती आला आणी तेथील दृष्य बघितले तर त्याचे ड़ोळे अक्षरशः दिपून गेले
तो सारखा एकटक पहातच राहीला

सर्व पाहून फिरून झाले परंतु त्याला तिथेही कोणीच दिसले नाही
तिथेही ऐका बाजूला लिहून ठेवले होते
ड़ाव्या बाजूला वळा
तो दरवाजा ढकलून तिथे गेला तर तिथेही कोणीच नाही
तिथेही लिहून ठेवले होते
उजवीकडे वळा
तो तिथेही गेला परंतु तिथेही कोणीच नाही
तिथेही लिहिले होते
पायरी चढुन वरती या
तो वरती गेला तर तिथेही कोणीच नाही
असा तो प्रवासी त्या इमारतीच्या शेवटच्या शिखरांपर्यंत पोहचला
तिथे सर्व फिरला कटांळला व बघतो तर तिथेही लिहिले होते
आता या पायरीवरून खाली उतरा
तो प्रवासी थोड़ा त्या पायरीवरून खाली उतरला
तिथेही कोणीच नाही
फक्त लिहिले होते
उजवीकडे वळा
पुन्हा ड़ाविकड़े
पुन्हा एका ठिकाणी सुचना लिहून ठेवली होती
या पायरीवरून खालच्या दालणात या
तिथे तो गेला तर तिथेही तशीच परिस्थिती
खुप भरकटत फिरला प्रवासी
अखेर तो तळमजल्यावर आला
तिथेही खुप प्रशस्त दालन होते
बराच वेळ तिथे तो बघत राहीला
परंतु त्याला इतक्या मोठ्या इमारतीत कोणीही भेटले नाही
बिचारा प्रवासी फलक वाचून वाचून अक्षरशः बेजार झाला होता
अखेरीस एका ठिकाणी त्याला पुन्हा फलक दिसला
इकडे तिकडे का व्यर्थ फिरतोस चल बाहेर निघ.....
अशी अवस्था तत्वज्ञानाची काही लोकांनी सध्या करून ठेवलीय
समजल तर छानच
आणि
नाहीच समजल तरी येणारे दिपावली सणाच्या आपणास हार्दीक हार्दिक शुभेच्छा
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

याजसाठी केला होता अट्टाहास

याजसाठी केला होता अट्टाहास।
शेवटचा दिस गोड व्हावा।
     मनुष्याचा संपूर्ण दिवसभराचा व्यवहार आणि आजन्म प्रवास चाललेला असतो तो कशासाठी ? दिवसभर चाललेल्या या आटाआटीचा काय हेतु ? कशासाठी एवढा व्याप,धावपळ काबाडकष्ट ? तर शेवटचा दिस गोड व्हावा म्हणून हे सर्व करावयाचे.आयुष्यभर कडू विष पचवायचें कां ? तर ती शेवटची घडी,तें मरण पवित्र व्हावें म्हणून.ज्याप्रमाणे दिवसाचा शेवटचा क्षण सायंकाळी येतो आजच्या दिवसाचे संपूर्ण कर्म जर पवित्र भावनेने केलेले असेल तर रात्रीची प्रार्थना गोड होईल.तो दिवसाचा शेवटचा क्षण जर गोड झाला तर ते त्या दिवसाचे कर्म सफल झाले.

तेव्हा मनाची एकाग्रता होईल.प्रत्येक दिवस अंतिम म्हणून जगता आला,पाहिजे प्रत्येक गोष्ट,छोट्यातली छोटी बाब सुद्धा प्रामाणिकपणे व्हायला हवी.आनंद देत वाटचाल सुरू हवी.म्हणजे झोपताना लागलेली निद्रा ही गोड असेल.तिला उद्याचं माहीतच नसत.
अस जगता आल तर नक्कीच शेवटचा दिवस गोड..
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

दान करण्याची सवय

दान करण्याची सवय
      समर्थ रामदास स्वामी श्रीराम नामाचे थोर उपासक
स्वामींचा रोज पाच घर भिक्षा मागण्याचा नित्याचा क्रम
ते एकदा एका गावात भिक्षा मागण्यासाठी गेले असता चार घर भिक्षा मागितली व एक घर भिक्षेचे बाकी होते
स्वामी पाचव्या घरासमोर जाऊन *भिक्षामं देही* असा अल्लख दिला
त्या घरच्या गृहिणीने आजवर कधिही स्वामींना भिक्षा वाढलेली न्हवती
तरीही स्वामी नित्य त्या गृहिणीच्या घरासमोर भिक्षेसाठी जात
त्या गृहिणीने आजवर अनेकदा स्वामींना कड़वे बोल सुनावले होते
तरीही स्वामी त्या घरी भिक्षेसाठी जातच होते
दिवाळीचा सण आठ दिवसावर येऊन ठेपला होता
सर्वत्र दिवाळी निमित्ताने घराची साफसफाई मोहीम सुरु होती

   पुर्वीचा काळ मातिच्या भिंती सणासुदीला मातिचा पोचेरा करून भिंती सावरत असत
त्या घरची गृहिणी भिंतीला पोचेरा करण्यात निमग्न होती
आजवर कधिही भिक्षा न वाढलेली गृहिणी आजतर आपल्या कामात अतिशय व्यस्त होती
स्वामींनी भिक्षेसाठी आवाज दिल्यावर ती पुरती वैतागून गेली
सर्व अंग चिखल मातीने भरलेली गृहिणी त्यात अगोदरच वैतागलेली
त्याच अवस्थेत जगदंबेचा रूद्र अवतारात बाहेर आली

स्वामींना म्हणाली
तुम्हाला आजवर मी कधिच भिक्षा वाढलेली नाही तरी तुम्ही रोज माझ्या दारी का येतात????
असे म्हणत त्या दिवशी कधिही दानधर्म न करणारे त्या गृहिणीने आपल्या हातातील पोचेरा स्वामींच्या अंगावर फेकून मारला व म्हणाली
घ्या भिक्षा.....
स्वामींनी तो चिखल मातीने भरलेला कापड़ी फड़क्याचा आनंदाने हातात घेतला व रामनामाचा जप करत निघाले
परंतु
तिथे त्या गृहिणीच्या घराजवळ काही जेष्ठ गावकरी मड़ंळी बसलेले होते
त्यांनी हे सर्व घटना आपल्या ड़ोळ्यानी बघितली होती
स्वामींना नमस्कार करत गावकरी म्हणाले
स्वामीजी!
ति गृहिणी भिक्षा वाढत नाही
तरीही आपन न चुकवता तिचे घरी नित्य नेमाने जातात
स्वामी स्मित हास्य करत म्हणाले
*साधूकड़े भेदभाव नसतो*
जो देईल तो देईल आणि नाही दिले तरी साधुने त्या घरी का जाऊ नये?
बहुतांपरी संकटे साधनांची ।
*व्रते दान उद्यापने ती धनाची* ॥
दीनाचा दयाळू मनी आठवावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥
कुठल्याही प्रकारच्या साधना करतांना नाना प्रकारची संकटे उभी रहात असतात. दानधर्म करायचा, व्रतवैकल्ये करायची, त्यांची उद्यापने करायची या सगळ्या गोष्टी साधना म्हणून केल्या जातात. आणि त्या खर्चिक स्वरूपाच्या असाव्यात असे काही नसते काही तरी दिले हे महत्वाचे

त्यापेक्षा लीन, दीनांवर दया करणारा श्रीराम मनापासून आठवावा
आणी विशेष बाब तर आज घड़ली आहे
आजवर कधिही दानधर्म न करणारी त्या माता माऊलीने आज काहीही का होईना माझ्या झोळीत दान घातले आहे
भलेही क्रोधात मला चिखलाने माखलेला पोचेरा फेकून दान दिला
परंतु
त्यामुळे त्या मायमाऊलीला काही का होईना दान देण्याची सवय तर लागली
समस्तांमधे सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधून पाहे ॥
जिवा संशयो वाऊगा तो त्यजावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥
दान हे दानच असते
त्याच मुल्यमापन होत नाही
असे म्हणून स्वामीजी आपल्या आश्रमाकड़े निघून गेले
आपल्या आश्रमात स्वामीजी पोहोचल्यावर त्यांनी त्या गृहिणीने फेकून अंगावर मारलेल्या कापड़ाचा पोचेरा स्वच्छ साफ करून घेतला

त्या कापड़ाच्या सुदंर असे काकड़े बनविले व आपल्या श्रीराम प्रभूला पहाटे काकड़ा आरती ओवाळली
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

आप आपना घात करू

आप आपना घात करू
भगवान शकंराचे वास्तव्य म्हणजे स्मशानभुमीतच
शिवाय दररोज अंगाला चिताभस्म लावत असत
आणी ते दुरवरून रोज आणण्यासाठी वेळ जात असे म्हणून भगवान शंकराच्या एका भक्ताने तपश्चर्या करून प्रभूची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली
तेव्हा भगवान महादेवाने त्या भक्ताला चिताभस्म आणण्यासाठी सांगितले
तो रोज भगवान शकंरासाठी दुरवर जाऊन चिताभस्म आणू लागला
परंतु ऐक दिवस त्याला चिताभस्म घेऊन येण्यास फारच लागला
व भगवान शकंराची पुजा पण अड़ून पडली
तो भक्त उशीरा आला तेव्हा महादेवांनी त्याला उशीरा येण्याचे कारण विचारले
चिताभस्म लवकर मिळतच नाही असे त्यांचे सागितंल्यावर भगवान शकंराने त्या भक्ताला वरदान दिले कि तु ज्याच्या ड़ोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल

   हे वरदान मिळालेवर वेळेवर चिताभस्म येऊ लागले
तो भक्त एक दिवस चिताभस्म घेऊन आल्यावर त्याची वक्रदृष्टी मातापार्वतीवर पड़ली
माता पार्वतीचे सुदंर स्वरूप पाहून त्या भक्ताची नियतच बदलली
मला तर वरदान प्राप्त आहे
मग मी जर शकंराच्याच ड़ोक्यावर हात ठेवला तर ते भस्म होतील

स्वरूप सुदंर पार्वती मलाच मिळेल
असा मनात विचार केला
आणि
एक दिवस भगवान शिवजी ध्यानस्थ असताना भगवान शिवजीच्याच ड़ोक्यावर हात ठेवण्यासाठी तो भक्त येऊ लागला
समाधी अवस्थेत असलेल्या भगवान शिवजीनी अंतरज्ञानाने जाणले

आपले आराध्य भगवान श्रीहरि विष्णूचे स्मरण केले
चतुरांचा शिरोमनी असलेले भगवान श्रीहरि विष्णूनी आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी सुदंर अस्या स्रीचा अवतार धारण केला
भगवान विष्णूचा एकमेव शक्ती अवतार म्हणजे मोहिनी अवतार
तो हाच
मोहिनी अवतार घेऊन भगवान त्या शिवभक्तापुढे प्रकट झाले
मोहीनीचे सौंदर्य बघून तो शिवभक्त एका क्षणात पार्वतीचे सौंदर्यही विसरून गेला
त्या भक्तांने त्या मोहिनीला विवाहाची मागणी घातली
तेव्हा ति स्वरूप सुंदरी म्हणाली
माझा एक नवस आहे की माझ्या होणारे पतीने विवाहा अगोदर माझ्या सोबत नृत्य घरावे
तो भक्त म्हणाला
मी तयार आहे
कामातुरा भय ना लज्जा
तो भक्त त्या सुदंरी बरोबर नृत्य करू लागला
ति जसे हावभाव करेल तसेच हा पण हावभाव करू लागला
तिने कमरेवर हात ठेवले की हा ही कमरेवर हात ठेवायचा
नृत्य अगदी रंगात आले दोघेही नृत्यात बेधुंद होऊन गेले व अकस्मात त्या सुदंरीने आपल्या ड़ोक्यावर हात ठेवला
आणि ह्या भक्तानेही आपल्या मस्तकी हात ठेवताच जागेवरच भस्म झाला
भगवान शिवजीचा भक्त असुनही संत महात्म्ये म्हणतात
मोहीनीचे संगें भस्मासूर गेला
आपणही भगवंताचे भक्त आहोत
आपल्याही ज्ञात अज्ञात शक्ती भगवान परमात्माने दिलेली आहे
आता त्या ईश्वरी शक्तीचा वापर किती व कसा करायचा हे आपले आपण ठरवायचे
या संसार चक्रात सतत दुसर्याचे ड़ोक्यावर हात ठेवता ठेवता असंही नको व्हायला की एक दिवस आपन आपल्याच ड़ोक्यावर नजरचुकिने हात ठेवून आपनही भस्मासूर होणार नाही ना?????
म्हणून की काय संत महात्म्ये वेळोवेळी जीवाला जागे करतात
सावध होई बापा
कारन
मिळालीही असेल एखादी ईश्वरी शक्ती तर तिचा समाजहितासाठी सदुपयोगच व्हावा
नाहीतर
आपनच आपल्या ड़ोक्यावर हात ठेवून भस्म झाल्यावर जगाचे काहीच नुकसान होत नाही मात्र आपलाच भस्मासूर होतो म्हणजेच
आप आपणा घातकरू!

शत्रू झालो मी दावेदारू
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

Monday, 24 October 2016

म्हणसी बिभिषण शहाणा?

म्हणसी बिभिषण शहाणा?
   हनुमानजी लंकेत गेले तेव्हा रामभक्त बिभिषणाची भेट झाली
बिभिषणाने आपला थोरला बंधु रावणाला नानाप्रकारे समजावले
दुसर्याची धर्मपत्नी हरण करणे पाप आहे
तरीही रावणाने ऐकले नाही
उलट रावणाने बिभिषणाच्या लाथ मारत लंकेतून बाहेर काढले
बिभिषण सागराच्या पैलतीराला असलेल्या प्रभू श्रीरामाला शरण आले
हनुमानजी म्हणतात
प्रभू!
आपल्या भक्ताच्या उद्धार करावा.
भगवान श्रीराम प्रभु बिभिषणाचे मनोगत अंतरज्ञानाने जाणत लंकेवर स्वारी करायच्या कितीतरी दिवस अगोदर बिभिषणाचा राजतिलक करतात
पुढे राम रावन युद्ध होते
रावन कुभंकर्ण मेघनाथ सर्व योद्धे मारले जातात
प्रभू श्रीराम लंकेवर विजय मिळवल्यावर लंका बिभिषणाला देतात
लंका राज्य बिभिषणा!केली चिरकाळ स्थापना!!
व सीतामातेला घेऊन अयोध्येत येतात
ईकडे अयोध्येत रामराज्य सुरु होते
     पुढे लंकेत एक घटना अशी घड़ते कि राम रावन युद्ध झाले तेव्हा कुभंकर्णाची पत्नी गरोदर होती
तिला मळकासूर नावाचा मुलगा झाला
बिभिषण समाधानाने राज्य करत होता
मळकासूर दहा बारा वर्षाचा झाल्यावर त्याच्या आईने त्याला सागितंले की तुझा काका बिभिषण याने तुझ्या वड़िलांना व दुसरे काका रावण यांना रामाकड़ुन मारून घेतले व हे राज्य हस्तगत केले
आईने हि करून कहाणी सागितंलेवर मळकासूर अतिशय क्रोधीत झाला व वनात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला
अनेक वर्षे खड़तर तपश्चर्या करून ब्रम्हंदेवाकड़ून अनेक वर प्राप्त केले
मला कोणाही पुरुषाच्या हातुन मरण नको
हा वरही मागून घेतला
इच्छीत वरप्राप्ती नंतर मळकासूराने लंकेवर स्वारी केली
संपूर्ण लंका नगरी अक्षरशः एकट्याने हादरून सोड़ली
बिभीषण तर पुर्ण घाबरून गेला
कसा तरी लंकेतुन जीव घेऊन पळाला व अयोध्येत श्रीराम प्रभुकड़े आला
प्रभू!
आपन मला लंकेचे राज्य दिले

आपल्या समोरच माझ्याच पुतण्याने ते हिरावुन घेतले
रामप्रभूनी फक्त स्मित हास्य केले
अंतर्यामी जाणल या मळकासूराने ब्रम्हंदेवाकड़ून कोणते वर मागून घेतले आहे
मळकासूर मला
स्रीच्या हातुन मरण नको हे ब्रम्हंदेवाकडे मागायच विसरला होता
रामप्रभू सीतामाईला रथात घेऊन लंकेला येतात
रामप्रभू लंकेत आल्यावर
समोरून मळकासूर युद्धासाठी आला
थोड़ावेळ युद्ध चालले
प्रभूनी अचानक सीतामाईच्या हातात धनुष्यबाण दिला
एकाच बाणात सीतामाईने मळकासूराचा वध केला
प्रभूनी पुन्हा लंका बिभिषणाला दिली
संत महात्म्ये म्हणतात
म्हणशी बिभिषण शहाणा?
रामासी भेटला !परी राम नाही झाला!!
काही तरी बोध करी मना
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

मुक्त वक्ता तरच मुक्त श्रोता

मुक्त वक्ता तरच मुक्त श्रोता
     शुकदेवजी राजा परिक्षितीला श्रीमदभागवत कथा सांगत होते
परिक्षिती सर्वांगाचे कान करून श्रवण करत होते
कथेचा सहावा दिवस पार पड़ला
तरीही राजा परिक्षितीला स्वशरीराचा मोह सुटत न्हवता
शुकदेवजी राजा परिक्षितीला एक कथा सांगतात
फार दिवसापुर्वी ऐक राजा जगंलात शिकारीसाठी गेला असता वाट चुकला
बघता बघता काळोख पड़ला
रात्र पड़ली होती
त्या राजाने
थोड़ावेळ इतरत्र शोध घेतल्यावर दुरवर जगंलात एका झोपडीत दिवा लागलेला दिसला
राजा तिथे पोहचला

बघतो ते ति एक आजारी पारध्याची झोपड़ी होती
तो पारधी वृद्धापकाळाने थकलेला वाटत होता
तो चालूही शकत न्हवता
त्याची मलमुत्राची व्यवस्थाही तिथे जवळच केलेली होती

उदरनिर्वाहासाठी मृतजनावंराचे मांस तिथे झोपड़ीतच एका दांड्याला अड़वलेले होते
तिथे पारध्याची झोपड़ी अतिशय घाणेरड़ी व दुर्गंधीयुक्त आणि अंधारामय होती
त्या राजाने आजारी असलेल्या पारध्याला एक रात्र तिथे रहाण्याची परवानगी मागितली
तेव्हा तो पारधी म्हणाला
सरकार!
आपन इथे राहू शकणार नाही.
तेव्हा राजा म्हणाला
आजच्या रात्रीचा प्रश्न आहे
मी सकाळी सुर्योदयापुर्वीच निघून जाईल
असे म्हणून तो वाट चुकलेला राजा तिथे त्या झोपडीतच थांबला
परिक्षिती शुकदेवजिंना म्हणाले
मुनीवर!
तो राजा मला मुर्ख वाटतो....
तेव्हा शुकदेवजी म्हणतात
परिक्षिती!
तो मुर्ख राजा आपनच आहात...
या नश्वर असलेल्या शरीररूपी मलमुत्राच्या पिशवीची आपणास गेले सहा दिवस श्रीमदभागवत कथा ऐकताय तरी आसक्ती सुटत नाही????


कथा सागंणारे शुकदेवजी होते
ज्याच्यां अगांवर साध वस्रही न्हवते

मरणाच्या भितीने
ऐकणारा राजा परिक्षिती होता
बरोबर कथेच्या सातव्या दिवशी परिक्षितीला आत्मज्ञान झाले
व शारीरिक बधंनातुन मुक्त होण्यास तयार झाला
संत महात्म्ये म्हणतात
श्रवणे परिक्षिती तरला भुपती!साता दिवसा मुक्ती झाली तया!!
आपल बरयं बुवा
कितीही कथा ऐका?
कोणाचंही ऐका?
आपन मात्र जैसे थे.....
तुका म्हणे असता जैसे तैसे बरवे
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

Friday, 21 October 2016

धर्मसत्ता व राजसत्ता रामराज्य

धर्मसत्ता व राजसत्ता रामराज्य
    लंकेवर विजयश्री मिळाली व प्रभू अयोध्येत आल्यावर राज्याभिषेक सोहळा मोठ्या शाही थाटात सपंन्न झाला
आणि अयोध्येत रामराज्य आले
दुसरे दिवशी राजदरबार भरला
हनुमानजी प्रभूच्या दर्शनासाठी दरबारात पोहचले
प्रभू श्रीराम सीतामाईसह सिहांसनावर बसलेले आहेत
लक्ष्मणजी व शत्रूघ्नजी भगवंताच्या दोही बाजूला उभे आहेत
समोरच एका सिहांसणावर महर्षी वशिष्ठ व तपोनिधी विश्वामित्रासह अनेक मान्यवर ऋषी मुनीं बसलेले आहेत
हनुमानजी मात्र मनात चिंतातुर वाटत होते
त्यांचे ड़ोळे सारखे दरबारात कुणाचा तरी शोध घेत होते
बराच शोध घेतल्यानतंर शेवटी हनुमानजीना राज सिहांसणाच्या पाठीमागे प्रभू श्रीरामाच्या ड़ोक्यावर राजछत्र धरून उभे असलेले भरतजी दिसले


हनुमानजीचे विशाल नेत्र आश्रूनी भरून आले
भरतजीचे चरण स्पर्श करत हनुमानजी भरतजींना पुढे सन्मुख येण्यासाठी वारंवार विनंती करतात
परंतु भरतजी ति विनंती मान्य करत नाही
शेवटी हनुमानजी प्रभूलाच विनंती करतात
प्रभूजी
भरतजी सिहांसणाच्या पाठिमागे का?
आपण त्यानां सन्मुख बोलवावे
तेव्हा रामप्रभू हनुमानजींना म्हणतात
हनुमान!
भरत आहे तिथेच बरोबर आहे
तेव्हा हनुमानजी म्हणतात
प्रभू!
तुम्ही इतके निष्ठूर आहात?
तेव्हा रामप्रभूचे उद्गार आहेत
हनुमान!
भरत आता काय करत आहे?
हनुमानजी म्हणतात
प्रभू!
आपल्या मस्तकावर राजछत्र धरून भरतजी उभे आहेत
तेव्हा रामप्रभू म्हणतात
हनुमान!
माझ्या ड़ोक्यावर भरतजी सारख्या संतकृपेचे राजछत्र आहे म्हणूनच हे खरे अर्थाने रामराज्य आहे
राजगादीवर शासकाने बसावे पण राजगादीला छत्रछाया हि संताची असावी
राजसत्तेला धर्मसत्तेचा आशिर्वाद व मार्गदर्शन हिच खरी रामराज्याची समर्पक व्याख्या
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

भगवंताचा शोध

पन्नास रुपयांचे पेढे,पंधरा रुपयांचा नारळ,दहा रुपयांचा हार ,एक रुपया चप्पल सांभाळण्याराला आणि पाच रुपये दान पेटीत .एवढे करुन आपण देवापर्यंत पोहोचतो का?याचा आपण नेहमी विचार करावा .यावरुन एक कहाणी ऐकलेली आठवली.
त्याचा संदर्भ गुरु ग्रंथ साहिबमध्ये येतो .
ती कहाणी ऐकली आणि मनावर कायमची प्रभाव ठेवून गेली .
कहाणी आहे राजा रणजीतसिंग यांची .त्यांची जगज्जेता होण्याची इच्छा होती व तसा त्यांचा पराक्रमही होता .लहोरी जिंकून ते आपल्या सेनेसह राज्यात परत येत असताना एक जंगल लागले .जंगलात एक म्हातारी तेव्हां जमीनीवरील दगड उचलून समोरच्या बोराच्या झाडावर मारीत होती व बोरे पडल्यावर त्याचे ढीग करुन ठेवीत होती .तिला राजेसाहेब जात असल्याची काहींच कल्पना नव्हती .तिचे दगड मारणे चालूच होते .तशात तिने मारलेला एक दगड रणजीतसिंग यांच्या कपाळावर लागला आणि रक्ताची धार वाहू लागली .सैनिक सतर्क झाले व मारण्याराचा शोध घेउ लागले .त्यांना दगड मारणारी म्हातारी दिसताच तिला पकडून त्यांनी महाराजांसमोर उभे केले .म्हातारीला परिस्थिती लक्षात आली .ती गयावया करुन म्हणाली ,"महाराज आपण इथे असल्याचे मला माहित नवहते.रोजच्या प्रमाणे मी बोरे गोळा करीत होते .रोज ही बोरे विकून जे पैसे मिळतात त्यावर माझ्या कुटुंबांचे उदरभरण होते .मी आपल्याला जाणून बुजून नाही मारले .मला क्षमा करावी महाराज ".असे म्हणून तिने रणजीतसिंगांचे पाय धरले .सेनापती व सेना आता म्हातारीला देहदंडाची शिक्षा महाराज देतील याची वाट बघत होते .रणजीतसिंगांना म्हातारीच्या परिस्थितीची जाणीव झाली .ते सेनापतीकडे वळून म्हणाले ,"एक सोन्याच्या मोहरा भरलेली थैली घेउन या." थैली आल्यावर ती त्यांनी म्हातारीला दिली व तिला जाण्यास सागितले.सेनापती व सेनेला आश्चर्य वाटले .न राहवून सेनापती महाराजांना म्हणाले,"महाराज आपण त्या म्हातारीला कठोर शिक्षा करायचे सोडून तिला मोहरांचे इनाम का दिले महाराज ?"त्यावर महाराज उत्तरले,

"अरे दगड मारल्यावर ते बोराचे झाड जर गोड बोरे देते तर रणजीतसिंगाने त्याहून काही कमी देणे शोभले असते का?"
आपल्या जीवनात सुद्धा असे प्रसंग येतात .तेव्हां आपण देखील आपली सद्सद्विवेकबुद्धी जागी ठेवून वागले पाहिजे .
धर्म नीतीचा करीता व्यवहार ।

सौजन्य व्हॉट्सप
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।