˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

jai muktai

आपल्या गरजा विशिष्ट मर्यादित ठेवणारा मनुष्य जीवनाचं समाधान मिळवू शकतो.सत्ता आणि संपत्ती सुख प्रदान करू शकत असती तर जगातले सारे श्रीमंत आणि सत्तासम्राट आज आनंदाच्या वलयात गुरफटून गेले असते.बाह्य साधनसंपत्ती माणसाला इंद्रियांचा दास बनवते हे आजच्या अनेक उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे.मनाची निर्मलता आणि आचारविचारातली शुद्धता हाच शाश्वत सुखाचा मार्ग आहे.म्हणून तर संतांनी दाखवलेला आणि निवडलेला मार्ग धरावा. *जोडोनिया धन उत्तम व्यवहारे।* संतांच्या अनुकरणाकडे आणि आचरणाकडे पहावं,आम्ही संतांना आदरणीय समजतो अनुकरणीय समजलं गेल पाहिजे.ज्यादिवशी आम्ही अनुकरणीय समजून जगायला सुरवात करू तेव्हा आपल्या गरजा नियमित करून गरजेइतकीच संपत्ती मिळवावी आणि *उदास विचारे वेच करी* हा संताचा मार्ग खऱ्या अर्थाने जगलो. भगवान बुद्धांची यासंबधांने एक कथा आहे.एकदा भ.बुद्धांना एका शिष्यांन विचारलं,'भदन्त,रात्री कडाक्याची थंडी असते.आपण वाळलेल्या पानांवर झोपता.आपणाकडे तर उबदार कपडेही नाहीत.अशा स्थितीत आपल्याला झोप येते कां ? भ.बुद्ध हसले ते म्हणाले, *"गाढ झोप येण्यासाठी शय्येची आणि उबदार वस्त्रांची जरूर नसते.मनाची निर्विकारता असली पाहिजे निर्वेध झोप लागते."* त्यांच्या या उत्तरात जीवनाच्या आनंदाच रहस्य सामावलं आहे.संतांच्या जीवनात भौतिक सुखसाधनांची त्यांना जरूर नसते.निरहंकार,निरिच्छता आणि सर्वाभूती स्नेहभाव हीच त्यांची अखंड संपत्ती असते.

No comments:

Post a Comment