˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

प्रार्थना

प्रार्थना
   पवित्र समयाचा उपयोग मनाला भगवंताच्या सान्निध्यात नेण्यासाठी करणे
हाच कुठल्याही ईश्वरी प्रार्थनेचा उद्देश असतो
हि प्रार्थना जर संत सगंतीत केली तर मन लवकर एकाग्र होऊन ईश्वराशी थेट अनुसंधान साधले जाते
या प्रार्थनेच्या आर्थानुसंधानातुन हळूहळू ओलावा निर्माण होऊ लागला पाहिजे
   प्रार्थना म्हणजे कवायत नव्हे कारण कवायतीत फक्त क्रिया प्रधान असते ईथे ईश्वरी प्रार्थना करताना मन एकाग्र नाही झाले तर आपली प्रार्थना फक्त कवायतच न होवो
कुठलीही प्रार्थना करताना संत वाणीचे सहाय्य अवश्यक असते
त्यायोगे साधकांची प्रार्थना लवकर फलद्रुप होते
संतवाणीचे एक एक अक्षर सिद्ध असते
त्वमेव माताच्
म्हटल की संतांनी भगवंताशी जोड़लेले नाते क्षणार्धात स्मरण होते
संत सगंतीत आलेला प्रार्थनेचा अविट अनुभव आपल्या घरातील देवघरात प्रार्थना करताना आला पाहिजे
संसारातही चचंल मनाला एकाग्र करण्याची क्षमता फक्त प्रार्थनेतच आहे
या भक्तीतील निर्मळतेत साधनकाळाशी तदाकार होऊ ईश्वरी शक्ती प्रकट करण्याची प्रार्थना हे एकमेव साधन आहे
श्री अंनता मधूसुदना !पद्मनाभा नारायणा!जगव्यापका जनार्दना!आनंदघना अविनाशा!!
सकळ देवाधी देवा
इथपर्यंत प्रार्थना म्हणेपर्यंत अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे की
नेत्री अश्रुचीया धारा!कोठे रोमांच शरीरा!!
या नाम संतांच्या सकंल्पनेतील
प्रार्थना
जय मुक्ताई👏🏻👏🏻👏🏻
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment