˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

सुंदरता

।।सुंदरता।।
आम्ही हिमालयात जाऊन आलो,मी आणि आमचे सहकुंटुंब पृथ्वीवरील स्वर्ग काश्मीरला जाऊन आलो.आम्ही या हिवाळ्यात abroad ला म्हणजे परदेशात जाणार आहोत.असे संवाद हमखास ऐकायला मिळतात.जो तो आपआपल्या कुवतीप्रमाणे भूतलावरील सौदंर्यस्थळे सुंदर ठिकाणे पाहतात.सुंदरता अर्थातच अवर्णनीय असते.शब्दांत बांधू नाही शकत की डोळ्यात साठवू नाही शकत, ना दुसऱ्याला शब्दांतून व्यक्त करून सांगता येत खूपच सुंदर एवढचं सांगू शकतो.
सुंदरता बऱ्याच प्रकारची सांगू शकतो.
नात्यांची सुंदरता
निसर्गाची सुंदरता
माणसाची सुदंरता
शब्दांची सुंदरता
विचारांची सुदंरता अशा बऱ्याच कल्पना केल्या तरी संतांनी ही सुंदरता दुसरीकडेच पाहिली.
कारण हे सर्व सुंदर आहे.पण त्याच्या सुंदरतेविषयीची संतांची कल्पना त्याहून सुंदर आहे.ह्याचे कारण काय ? आत्म्याच्या सुंदरतेची बरोबरी जड वस्तूची सुंदरता कशी काय करणार ? आत्मा हा सुंदर आहे आणि तो सुंदर असला की अवघे चराचर सुंदर आहे. संतांनी आत्म्याची सुंदरता पाहिली.ती आत्म्याची सुंदरता आम्हीही पाहू शकतो.फक्त त्या दृष्टीची गरज आहे ती ही सर्व सुंदरता पहायला.भगवान् परमात्म्याने ती प्रत्येकाला दिलेली आहे.गरज आहे तीचा शोध घेण्याचा.मी तर शोधायला निघालोय.....
कारण आत्मदर्शनाशिवाय आनंद नाही.


No comments:

Post a Comment