˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

अवमूल्यन

अवमूल्यन
इग्रंजाचे काळातील नोट आताच्या काळात एखाद्याने व्यवहारात दाखवली तर लोक म्हणतील
हि नोट कधीचीच बंद झालीय

आता तिचे अवमूल्यन पण झाले आहे
परंतु
संतांच्या भावनेचे कधीही अवमूल्यन होत नाही
कारन
संतांच्या भावनेला फार मोठे मुल्य असते
ज्याचे कधिच अवमूल्यन होणार नाही असी त्या संत वाङमया मागील सदभावना असते
संताचे शब्द साधे व व्यवहारील वाटत असले तरी त्यात अर्थ खुप महान असतो
तसेच
व्यवहारात काहीवेळा भाषा खुप मोठी वापरली जाते
पण त्यातला अर्थ मात्र शुन्य असतो
संतांची भाषा सोपी व रोजच्या बोलीभाषेतील जरी वाटत असली तरी त्या शब्दांचा अर्थ महान व महत्वाचा असतो
संतांच्या शब्दात जी शक्ती आहे ती त्या शब्दांची नाही तर तो शब्द ज्या पवित्र अशा मुखातून आलाय त्या महात्मांची शक्ती व तपश्चर्या त्या मागे असते
म्हणून तर संतांनी म्हटल आहे ना?
शब्दांचीच रत्ने करून अंलकार !तेणे विश्वंभर पुजीयेला!!

म्हणून
तर सातशेहून वर्षे लोटली तरीही संताची ज्ञानेश्वरी व अभंग नवीन चैतन्य देतात
संतांनी तर
जोड़ीले हे न सरे धन
संत महात्म्ये समाजालाही ज्याच कधिच अवमूल्यन होत नाही असा उपदेश करताना म्हणतात
तुका म्हणे पहा शब्दची हा देव
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment