˙˙जय मुक्ताई ..

Thursday, 3 November 2016

कळी काळ पाया पड़े

कळी काळ पाया पड़े
त्यागविरो ,दयाविरो ,विद्याविरो,महाविरो आणी धर्मविरो हे पाच विराचे लक्षण मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामात होती म्हणून त्यांना रघुविर असे म्हणतात
स्वातंत्र्यवीर शब्द आला की सावरकराच स्मरण होते
रणवीर शब्द आला की तानाजी मालुसरे आठवतात
धर्मवीर म्हटल की संभाजीराजे
महावीर जैन धर्मगुरू
दानवीर म्हणले की फक्त कर्णच
क्रांतीवीर म्हटल की नानासाहेब पाटील
कर्मवीर म्हणल की भाऊराव पाटलांचे स्मरण होते
शास्त्राच्या मतानुसार माऊली ज्ञानोबाराय ज्यांची इद्रियं आपल्या ताब्यात आहेत त्यानां वीर म्हणतात
तैसे विषयांचे घर!

इंद्रिया सांड़िता थोर!
युगांत ते वीर!
वीराग साहती!!

आपन इद्रियांच्या ताब्यात असतो
तर
संत महात्म्यांच्या इद्रियं ताब्यात असतात
म्हणून
संताना वीर म्हटले आहे
स्व इंद्रियावर ज्याचा ताबा आहे
कामक्रोधादी विकारावर ज्यांनी विजय मिळवत ज्यांनी देव ह्रदयात साठवला आहे
ज्याचे सतविचार स्थिर आहेत
असे ईश्वर भक्त सामान्य नव्हे
तर
जगाला खाणारा काळ सुद्धा त्यांच्या
वीर विठ्ठलाचे गाढे!

कळीकाळ पाया पड़े!!
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment