˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

देखीला देखीला माये

देखीला देखीला माये
   पोहे म्हणजे सर्वांचा नाष्ट्याच बहु प्रचलित पदार्थ
बहुतेक श्रीमंतापासुन ते गरीबांपर्यत सर्वच पोहे खातात
पण पोह्याची गोष्ट जरी निघाली तरी आठवण होते ति सुदाम्याच्या पोह्यांची
कारण
ज्याला अमृताला अमृतत्व देता येते तो पोहे खातोय सुदाम्याची
म्हणून सुदाम्याच्या पोह्यांना मुल्य आहे
तसेच
बोर हा एक आबंट गोड़ मिश्रीत पदार्थ
लहानापासुन थोरापर्यंत सर्वच खातात
परंतु
बोर म्हटल की आठवते ति शबरी
आपन सर्वच लहानमुलांसह बोर खातो
परंतु आपली बोर खाल्लेले रामायणात येत नाहीत
काल कार्तिक वारी झाली
भगवान पढंरीनाथाचे लाखो वारकरी बांधवानी दर्शन घेतले
सर्वांचेच ड़ोळे भगवान परमात्माला पाहतात
परंतु

संत ज्ञानेश्वर महाराज आदी करून संतांनी भगवंताच जे स्वरूप पाहिले ते
ड़ोळा भरीयले रूप !चित्ती पायाचा सकंल्प!!
ज्यांनी भगवान परमात्माला ड़ोळे भरून पाहिले
त्यांना दुसरे काहीही दिसतच नाही
माऊली तर म्हणतात
देखीला देखीला माये देवांचा देव!फिटला संदेह निमाले दुजेपण!!
अथवा
तो हा रे श्रीहरि पाहिला ड़ोळेभरी!पाहता पाहणे दुरी सारोनीया!!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment